म.. म….मार्केटचा

शअर बाजार समजून घेताना 

               2020 हे वर्ष इतर वर्षाप्रमाणेच संकल्प वगैरे करूनच बहुतेक जणांचे सुरु झाले . या नवीन वर्षाच्या पहाटेत एक काळोख दडलेला होता आणि वर्षाची सकाळ होता होता त्या CORONA / COVID-19 याने आपणा सर्वाना त्याच्या कवेत सामावून घेतलं होत खर तर याची पुसटशी कल्पना यायला सुरवात झाली होती पण कोणालाच अज्ञानात सुख असते, या उक्ती प्रमाणे त्याचे गांभीर्य जाणून घ्यायचे नव्हते. सर्व त्या शहामृगाप्रमाणे वाळूत मान खुपसून बसले होते . कोरोनामुळे टाळेबंदी । LOCKDOWN हा नवीन शब्दप्रयोग चलनात आला आणि आयुष्य जगण्यात ही बदल करून गेला यामध्ये खूप मोकळा वेळ आणि काही करण्याचे खूप कमी पर्याय यामुळे सर्वात जास्त लोक ज्याकडे आकर्षित झाले ते म्हणजे शेअर मार्केट यामागे सहज पैसे कमावणे  हे ही एक कारण होते .

                                मराठी माणूस आणि शेअर मार्केट हे तस न जमलेले समीकरणाचं पण या २०२० मध्ये खूप सारे मराठीजण यामध्ये आपला एक मोबाईल फोन  आणि UNLIMITED DATA ही हत्यारं घेऊन दाखल झाले . खरं तर स्टॉक म्हणजे काय हेच ज्यांच्या गावी नव्हते तेही  आता SUPPORT । सपोर्ट , RESISTANCE।रेजिस्टंस  च्या गोष्टी करू  लागलेत. NIFTY , BANKNIFTYहे कश्याशी खातात हे माहित नसलेले आज हजारोच्या किंमतीचे    PUT- CALLS रात्री घरी घेऊन जात आहेत . दोन मित्र आता सुख-दुःखापेक्षा RSI आणि MOVING AVERAGE चीच चर्चा करताना दिसतात . ज्यांनी शाळेत कधी  अक्षरांवर रेषा नाही मारल्या ते आज आडव्या तिडव्याट्रेंड लाईन मारून एखाद्या स्टॉक ची चाल ओळखायचा प्रयत्न करत आहेत . घरातील किराण्याच्या खरेदी कडे “हे काय माझे काम नोहे’ या तुच्छ भावनेनं कानाडोळा करणारे रोज रात्री FII/ DII च्या खरेदी विक्रीची आकडेमोड करत बसतात. 

म.. म….मार्केटचा

                            या वर्षाच्या सुरवातीलाच निफ्टी (NIFTY) तिच्या १२४३० या आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तराला ।lifetime high ला  पोहचली होती . मार्केट तेजीत होते पण जस CORONA । कोरोनाकहर पसरायला लागला तस SENSEX२५६४० , NIFTY ७५०० , BANKNIFTY१६११६ यांना घरघर लागली. आणि त्यांनी तळ गाठला. INVESTORS /गुंतवणूकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले . पण आता हीच संधी आणि खूप सारा मोकळा वेळ यामुळे ज्यांच्या गाठीला थोडाफार पैसा होता अश्यानी ट्रेडिंगला सुरवात केली. या गर्तेतून मार्केटने पुन्हा उभारी घ्यायला सुरवात केली ती अशी कि त्याने मागे वळून पहिलेच  नाही. मार्च मध्ये तळ पाहिलेल्या  मार्केट / निफ्टी ने नोव्हेंबर मध्ये पुन्हा नवा  विक्रम  केला.  नवीन LIFETIME HIGH 13145 बनवला . या मधल्या काळात पैसे लावलेल्यांचे  पैसे अक्षरश दुप्पट – तिप्पट झाले ओ ……. आणि नवीन लोकांचे आकर्षण अजूनच वाढले जणू पैश्याचे झाडंच सापडलं कि काय अशी अवस्था नवीन तथाकथित ट्रेडर्स ची झाली . जवळ जवळ सर्वच शेयर्स/ STOCKS ५० – १५०  % RETURNS/ परतावा दिला. त्यामुळे होतंय असं की  बरेच जण  आम्हाला मार्केटची किल्ली सापडली याच अविर्भावात वावरतायत. आणि शेअर मार्केट हे सुद्धा एक वेगळे क्षेत्र आहे आणि यासाठी पण योग्य अभ्यास आणि अनुभव याची आवश्यकता आहे हेच मुळी मान्य करायला तयार नाहीत .   

प्रवास शेअर बाजाराचा                       

     आपल्या मराठी  माणसाने शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी हीच आमचीही  इच्छा आहे, पण सर्व समजून उमजून  नाहीतर किमान मूलभूत माहिती तरी असावी. जसे शेअर्स म्हणजे काय ? फंडामेंटल अनालिसिस कश्याशी खातात ? टेक्निकल अनालिसिसचा  काय उपयोग होतो ? मार्केट मध्ये जो चड उतार होतो तो कश्यामुळे ?  अगोदरच स्टॉक मार्केट विषयी मराठी मधून अतिशय अल्प माहिती उपलब्ध आहे . मार्केट मधील हे DREAM RUN /तेजी कायम राहणार नाही . MARKET CORRECTIONS येत राहणारच आणि त्यावेळेस दोनच गोष्टी तुमची  गुंतवणूक ,तुमची जीवनभरची  कमाई  वाचवू शकतात आणि ते म्हणजे  १) अभ्यास  २) अनुभव  आणि शेअर मार्केट हा जुगार नसून लांब पल्ल्याची गुंतवणूक आहे हे लक्षात येईल . यातूनच भविष्यासाठीची योग्य गुंतवणूक करून कमाई करून एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. 

‘म्हणूनच या ठिकाणी आपण शेयर मार्केट विषयी चर्चा करणार आहोत ते ही मराठी मधूनच ‘ सर्व संकल्पना मराठी मधून समजून सांगण्याचा प्रयत्न असेल. 

अजून माहिती हवी असल्यास आणि ट्रेडिंग आइडीया साठी आमचा telegram channel subscribe  करु शकता..

तेव्हा भेटतच राहू  ……. 

16 thoughts on “म.. म….मार्केटचा”

  1. खुपच छान मी नाईलाजाने हिंदीत वाचत असे कारण त्यातील काही मजकूर कळत नसे पण मराठी मध्ये माहिती मिळतेय मी आवश्य आपल्या bolgची वाट पाहत जाईन.
    आपण लवकरात लवकर पूर्ण series बनवावी आम्ही वाचक वाट पाहत जाईन

    Reply
  2. अगदी बरोबर लिहिले आहे तुम्ही,बरेच जणं आम्हाला शेअर मार्केट पूर्ण समजलं या भ्रमातच आहेत,सोपं आहे शेअर मार्केट असंच वाटत आहे,वास्तवात तसं नाही आहे,सातत्याने अभ्यासाची गरज आहे. याची जाणीव करून देणारा तुमचा प्रयत्न त्सुत्य आहे,आणि तो ही मराठीमधून,खुपच छान तुमच्या प्रयत्नांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा… ॥ शुभं भवतू ॥

    Reply

Leave a Comment