- शाॅर्ट सेलिंग म्हणजे काय? | Short selling in Marathi
- शाॅर्ट सेलिंग काय असते हे उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया.
- शाॅर्ट सेलिंगचे काही अत्यंत महत्वाचे नियम कोणकोणते आहेत?
- सर्किट असेल तेव्हा शॉर्ट सेलिंग चे काय होणार ? | What happens to short selling when there is a circuit?
- शाॅर्ट सेलिंग मध्ये मर्यादित नफा प्राप्त होण्यासोबत अमर्यादित तोटा देखील होण्याची शक्यता असते.
शाॅर्ट सेलिंग म्हणजे काय? | Short selling in Marathi
शाॅर्ट सेलिंग ही एक शेअर मार्केट मधील एक महत्वाची संकल्पना आहे ज्यामध्ये आपण शेअर्सची किंमत खाली येत असताना देखील नफा प्राप्त करू शकतो.शाॅर्ट सेलिंग मध्ये शेअर्स खाली पडत असताना देखील आपण त्यातुन पैसे कमवु शकतो. शॉर्ट सेलिंग हा प्रकार जास्तीत जास्त डेरिव्हिटिव्ह यामधे उपयोगी पडतो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग.
साधारणतः आपण बाजारात शेअर्सची किंमत कमी असल्यावर त्याची खरेदी करत असतो अणि शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्यावर आपण त्या शेअर्सची विक्री करत असतो.
खरेदी केल्यापासून शेअर्सची विक्री होईपर्यंत जो काही फरक ठरत असतो त्यावर आपला नफा होईल किंवा तोटा हे ठरत असते.ज्या किंमतीत आपण शेअर्सची खरेदी करतो त्यापेक्षा जास्त किंमतीत शेअर्स विकला तर आपणास साधारणतः नफा प्राप्त होत असतो.
ज्या किंमतीत आपण शेअर्सची खरेदी करतो त्यापेक्षा कमी किंमतीत शेअर्स विकला गेला तर आपणास साधारणतः तोटा झाला असे म्हटले जात असते.पण शाॅर्ट सेलिंग मध्ये याच्याउलट असते.यात आपण शेअर्सची किंमत बाजारात कमी होत असताना नफा प्राप्त करू शकतो.
शाॅर्ट सेलिंग मध्ये आधी शेअर्सची विक्री करावी लागते मग त्याची खरेदी केली जात असते. खुप जणांना वाटत असेल की आपल्याकडे नसलेल्या शेअर्सची आपण विक्री कशी करू शकतो.
शेअर बाजार मधील शाॅर्ट सेलिंग मध्ये ही सुविधा आपणास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाॅर्ट सेलिंग मध्ये शेअर्सची किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा आपण तो शेअर सर्वप्रथम विकत असतो.अणि जेव्हा बाजारात त्या शेअरची किंमत कमी होत असते तेव्हा त्या शेअर्सची खरेदी करत असतो.
म्हणजे शेअर्सची किंमत दिवसेंदिवस खाली पडत असली तरी देखील आपण नफा प्राप्त करू शकतो.
शाॅर्ट सेलिंग काय असते हे उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया.
समजा एखादी चांगल्या कंडिशन मध्ये असणारी सेकंड हॅड कार आपल्याला चार लाखामध्ये मिळत आहे.अणि आपल्या मित्राला पण तीच कार आवडली आहे.अणि त्याला ती कार विकत घ्यायची आहे.
यासाठी तो आपल्याला पाच लाख रुपये द्यायला तयार आहे.अशावेळी आपण अट ठेवतो की आधी पाच लाख रुपये दे मग तुला कार देईल.
अशा परिस्थितीत आपल्याकडे नसलेली कार आपण आपल्या मित्राला पाच लाखात विकत असतो.अणि चार लाख रुपये विक्रेत्याला देऊन तीच विकत घेतलेली कार आपल्या मित्राला देतो.
ह्या सर्व गोष्टीत आपला एक लाखापर्यंतचा फायदा होत आहे.
शाॅर्ट सेलिंग मध्ये सुद्धा एकदम असेच आहे यात आपण आपल्याकडे नसलेला शेअर जास्त किंमतीत दुसरया व्यक्तीला विकु शकतो.अणि तोच शेअर्स कमी किंमतीत खरेदी करून नफा कमवू शकतो.
समजा एखाद्या बातमीमुळे एखाद्या गोष्टीच्या परिणामामुळे एखाद्या कंपनीच्या १०० रूपये किंमत असलेल्या शेअर्सची किंमत कमी होणार आहे असे आपणास कळते तेव्हा आपण हा शेअर्स बाजारात चालु असलेल्या किंमतीत विकुन टाकतो.अणि ९० रूपयाला आल्यावर तो खरेदी करतो.ज्यामुळे आपल्याला त्या शेअर मागे दहा रूपये इतका नफा प्राप्त होईल. पण त्याच शेअर्सची किंमत १०० वरून १२० रूपयांवर गेली तर इथे आपण आधी विक्री केलेली असल्याने शेअर वर गेला तरी आपणास २० रूपये पर्यंतचा तोटा सहन करावा लागेल.
शाॅर्ट सेलिंग मध्ये शेअर वर जात असताना तोटा होण्याची शक्यता असते म्हणून आपला स्टाॅप लॉस सेलिंग प्राईजच्या वर असणे आवश्यक आहे.आपले ध्येय सेलिंग प्राईजच्या खाली असले पाहिजे.म्हणजे आपण शंभर रूपयांचा शाॅर्ट केला असला तर इथे आपला स्टाॅप क्राॅस ११० रूपये असायला हवा.यात टार्गेट ७० रूपये धरू शकतो.
शाॅर्ट सेलिंगचे काही अत्यंत महत्वाचे नियम कोणकोणते आहेत?
- इक्विटी मार्केट मध्ये शाॅर्ट सेलिंग ही फक्त इंट्रा डे मध्ये केली जात असते.सकाळी ९ वाजुन १५ मिनिट ते दुपारचे ३ वाजुन ३० मिनिट ह्या मार्केट वेळात आपण शाॅर्ट सेलिंग करू शकतो.
- इंट्रा डे साठी आपण आपली आॅडर दुपारी साडे तीन पर्यंत ठेवू शकत नाही.आपल्याला आपली आॅडर दुपारी ३.२० च्या आत स्क्वेअर आॅफ करावी लागते.
- शाॅर्ट सेलिंग मध्ये स्क्वेअर आॅफ करणे म्हणजे विकलेला शेअर खरेदी करणे असा होतो.एखादी आॅडर मार्केट मध्ये सुरू असताना त्यातुन बाहेर पडणे याला आॅडर स्क्वेअर आॅफ करणे असे म्हटले जाते.
- जर आपण दुपारी ३.२० च्या आत आपली आॅडर स्क्वेअर आॅफ नाही केली तर चालु असलेल्या किंमतीत आपल्या शेअर्सची खरेदी केली जाते अणि त्यानूसार आपला नफा होईल किंवा तोटा होईल हे ठरत असते.
- इक्विटी मार्केट मध्ये आपण शाॅर्ट सेलिंगची आॅडर ही कॅरी फॉरवर्ड करू शकत नसतो.म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त कालावधी करीता ती ठेवू शकत नसतो.
- पण डेरिव्हिटिव्ह मार्केट मध्ये शाॅर्ट सेलिंग करण्यात आलेल्या शेअर्सला कॅरी फॉरवर्ड करता येते पण जास्त पैसे लागतात. कारण यात आपणास एक दोन शेअर विकत घेता येत नाही शेअर्सचा पुर्ण लाॅट विकत घ्यावा लागतो.
- डेरिव्हिटीव्ह मार्केट मध्ये शाॅर्ट सेलिंग करण्यात आलेला शेअर तीन महिने इतक्या कालावधी पर्यंत होल्ड करून ठेवता येतो.
- शाॅर्ट सेलिंग मध्ये सर्वप्रथम सेलची ऑर्डर पडते त्यानंतर त्याच्या टार्गेटची ऑर्डर खरेदीची ऑर्डर म्हणून पडत असते.
- शाॅर्ट सेलिंग मध्ये स्टाॅप लाॅसची ऑर्डर देखील खरेदीची ऑर्डर असते.
सर्किट असेल तेव्हा शॉर्ट सेलिंग चे काय होणार ? | What happens to short selling when there is a circuit?
कधी कधी शेअर बाजारात एखाद्या शेअरची जास्त खरेदी किंवा जास्त विक्री झाल्याने अप्पर तसेच लोअर सर्किट लागत असते.अशावेळी आपल्याला शाॅट सेल केलेली ऑर्डर दुपारी ३.२० पर्यंत स्क्वेअर ऑफ करता येत नसते.कारण शेअरवर सर्किट लागलेले असल्याने त्यावर आपण कुठलीही ऑर्डर टाकु शकत नसतो.अशा वेळी आपण काम करत असलेल्या डिमॅट अकाउंट वरील ब्रोकरला एक सुविधा प्रदान करण्यात आली आहे.तो दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान आपला शाॅर्ट सेल केलेला शेअर आपल्या वतीने स्क्वेअर ऑफ करू शकतो.
ह्या वेळेत मिळेल त्या किंमतीत ब्रोकर आपल्या शेअर्सला स्वेवेअर ऑफ करत असतो.अणि याचप्रमाणे आपला नफा तसेच तोटा बुक होत असतो.दुपारी ३.३० ते ४ दरम्यान केल्या जात असलेल्या खरेदी विक्रीला आफ्टर ट्रेडिंग सेशन असे म्हटले जाते.यात ऑर्डर टाकण्याची सवलत फक्त ब्रोकरला दिली जाते.
सर्किट असेल तेव्हा शॉर्ट सेलिंग चे काय होणार ?
शाॅर्ट सेलिंग मध्ये मर्यादित नफा प्राप्त होण्यासोबत अमर्यादित तोटा देखील होण्याची शक्यता असते.
समजा एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत शंभर रूपये सुरू आहे.हया शेअर्सला शाॅर्ट सेल केल्यास त्यातुन आपणास जास्तीत जास्त १०० रूपये इतका होईल.कारण तो शेअर जास्तीत जास्त शंभर रूपयांनी खाली येईल.पण याचठिकाणी तो शेअर वर गेला तर तो कितीही वर जाऊ शकतो त्याला कुठलीही मर्यादा नसते.तो दोनशेपासुन हजारांपर्यंत त्याहुनही जास्त वर जाऊ शकतो.असे झाल्यास शंभर रूपयांच्या नफ्यासाठी आपणास दुप्पटीने तोटा सहन करावा लागेल.झालेला तोटा ब्रोकर आपल्याकडून वसुल करत असतो.
जेव्हा आपण गुंतवणूक केल्यापेक्षा जास्त तोटा आपल्याला झाला तर ब्रोकर आपले डिमॅट अकाउंट चेक करतो.त्यात जर तोटा झालेल्या किंमती एवढा बॅलन्स शिल्लक असेल तर त्यातुन झालेल्या तोट्याची किंमत वसुल केली जाते.
अणि समजा डिमॅट अकाउंट मध्ये शिल्लक नसेल आपण घेतलेले लाॅग टर्म शेअर्स विकुन ही किंमत वसुल केली जाते.यातुनही किंमत वसुल करता नाही आली तर ब्रोकरला त्याने दिलेल्या वेळात आपल्याला है पैसे द्यावे लागतात.
ब्रोकरला वेळेवर पैसे न दिल्यास तो मोठा दंड आकारू शकतो.अणि आपल्या नावावर असलेल्या अॅसेटसवर देखील हक्क दाखवू शकतो.म्हणुन ही किंमत वेळेवर भरणे आवश्यक असते.
ही पॅनलटीची रक्कम आपल्याला भरावी लागु नये यासाठी आपण इंट्रा डे अणि पोझिशनल ट्रेडिंग मध्ये शाॅर्ट सेलिंग करत असताना स्टाॅप लाॅसचा वापर करायला हवा.
याने आपल्याला होत असलेल्या मोठ्या नुकसानापासुन आपण बचाव करू शकतो.
आपुलकीचा सल्ला :- ट्रेडिंग हा प्रकार तसा जोखमीचा आणि त्यातही ते ट्रेडिंग हे ऑप्शन या डेरीवेटिव प्रकारात असेल तर जोखीम अजूनच वाढते. परंतु ऑप्शन या प्रकारात परतावा ही भरमसाठ देण्याची क्षमता आहे. म्हणूनच यामधे हात घालण्या अगोदर योग्य ज्ञान घ्या आणि नंतर सुरवात करा.
रोजचे मार्केट विषयी अनॅलिसिस खास करून इंडेक्स साठी आपला youtube channel ला भेट द्या. आणि रोजचे स्टॉक अपडेट आणि इतर माहितीसाठि majhemarket या telegrame channel बरोबर जोडून घ्या.