03 may 2021 Stock Market Weekly Prediction | 03 मे 2021 स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन

 

Stock Market Weekly Prediction 03 – 07 MAY 2021 |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन ०३ – ०७ मे २०२१

PREDICTION 06 :-

26 एप्रिल  ते 30 एप्रिल  मार्केटचा आढावा :

           बरेच ॲनालिस्ट आणि टीव्ही चॅनल वरती मार्केटचा जो अंदाज सांगितला जात होता त्याच्या अगदी विरुद्ध असा या वीक साठीचा आपला अंदाज BULLISH होता. आणि तो तंतोतंत बरोबर आलेला आहे. हे आपले पाचवे  prediction होते. ज्यामध्ये चार बरोबर आणि एक आपल्या दिशेने गेले नाही परंतु विरुद्धही गेले नाही. मागील विक साठी आपण निफ्टी साठी 14550 ही पहीली लेवल तर 14660 ही दुसरी लेवल आणि 14925 ही तिसरी लेवल आणि या आठवडयासाठी टारगेट दिले होते.  निफ्टीने 15044 चा सर्वोच्च स्तर (high) या आठवडयासाठी बनवला. तर बँक निफ्टी साठी 32000 हे पहिले टार्गेट दिले होते,तर दुसरे 32325 आणि तिसरे तसेच आठवडयात 33125 हे टारगेट दिले होते . बँक निफ्टी ने  34287 हा सर्वोच्च स्तर (high ) बनवला. तर निफ्टी फायनान्स सर्व्हिस साठी 15510 ही पहिली लेवल, 15775/825 ही दुसरी  तर 16000 असे तीन टारगेट दिले होते. निफ्टी फायनान्स सर्विस ने 16297 हा हाय ( high ) बनवला. अशाप्रकारे तिन्ही इंडेक्स मधील आपले टारगेट पूर्ण झाले.
  • Nifty 50- टारगेट पूर्ण 
  • Banknifty – टारगेट पुर्ण
  • Nifty finance services- टारगेट पुर्ण 
Market weekly prediction
Majhemarket.com

 
      या आठवडाभरातचा जर चार्ट काढून पाहिला तर एक लक्षात येईल की प्रत्येक लेवल वरती मार्केटने काही काळ घालवलेला आहे. पहिल्या दोन लेव्हलच्या आसपासच पहिल्या दोन दिवसाचे बंद भाव होते.  म्हणजेच प्रत्येक लेव्हल वरती खरेदीची संधी मिळत होती. आपण वेळोवेळी सांगत असलेले निफ्टी फायनान्स सर्विस यामध्येही ट्रेडिंगच्या चांगल्या संधी बनताहेत. दिलेल्या लेवल पुन्हा एकदा तपासून पाहिल्या तर हे सर्व लक्षात येईल. टेलिग्राम चैनल वरती त्याविषयी वेळोवेळी सुचना ही दिल्या. तसेच रिलायन्स पॉझिटिव्ह् ब्रेकआऊट  देऊ शकतो आणि त्याप्रमाणे रिलायन्स पॉझिटिव राहिला.  Prediction 5 या ठिकाणी जाऊन तुम्ही पाठीमागील वीक चा अंदाज पाहू शकता.
सर्व संकेत आणि टेक्निकल ऍनालिसिस  आणि काही टेक्निकल इंडिकेटर्स चा अभ्यास करता या वीक साठी मार्केटचे अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत. हा मे महिन्यातील पहिला आठवडा आहे. म्हणजेच की मंथली एक्सपायरी ची सुरुवात होत आहे. मागील महिन्याचा रोल ओवर डेटा या आठवड्यातील कामकाजावर ती काही प्रमाणात परिणाम करत असतो.

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत: 

  1. आरबीआयकडून अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत सी पी आय ( CPI) 4% एवढा आहे 6% च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट साठी ते फायदेशीर आहे.
  2.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
  3. यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे.उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच युएस मार्केट बुलिश आहे.
  4. Covid-19 व्हॅक्सिनेशन यांची गती वाढलेली आहे. तसेच 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस भेटण्यास सुरवात झाली आहे.आणि जसे लसीकरण वाढत जाईल ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
  5. जीएसटी (GST) कलेक्शन मार्च साठी 1.23 लाख करोड होते एप्रिल मध्येही असेच इकडे येण्याची शक्यता आहे.
  6. डॉलर इंडेक्स 91.28 तेवढा आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  7. भारतीय रुपया 74.05 आहे. रुपयाचा भाव स्थिर असल्याकारणाने आयात-निर्यात खाते स्थिर आहे. त्यामुळे जास्त चढ-उतार न होणे हे मार्केट साठी चांगले संकेत असतात.
  8. आपण पाठी मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे रिलायन्स कन्सोलिडेशन फेज मधून आता बुलिश झालेला आहे आणि कालच जाहीर झालेला Q4 चा रिझल्ट हा रिलायन्स साठी अतिशय उत्तम होता. मागील वर्षाच्या तुलनेत 129 टक्के एवढी वाढ रिलायन्सने नोंदवलेली आहे. निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
  9. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन अप रेशो 0.58 तर बँक निफ्टी साठी 2.38 एवढा आहे. म्हणजेच निफ्टी काहीसी खाली जाऊ शकते तर बँकेची वरच्या बाजूला जाण्याची शक्यता आहे. ही दोन्ही इंडेक्स साठी विरोधी शक्यता आहे. म्हणजे निफ्टी खाली जायला लागली तर बँक निफ्टी ही निफ्टी ला जास्त खाली जावू देणार नाही आणि निफ्टी जर वरच्या बाजूला जायला लागले तर बँक निफ्टी च्या आधारे निफ्टी थोडी जास्त वरती होऊ शकते.
  10. निफ्टी मधील बऱ्याचशा कंपन्यांचे Q4 रिझल्ट येत आहेत आणि ते बर्‍यापैकी चांगले लागत आहे. त्यामुळे हा एक मार्केट साठी चांगला संकेत आहे.
  11. निफ्टीचा बंद भाव हा आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव हा आहे म्हणजेच 29 पॉईंटचा प्रीमियम आहे. एप्रिल महिन्याच्या रोल ओवर नंतर हा प्रीमियम हा मार्केट साठी सकारात्मक संकेत आहे
  12. एप्रिल महिन्यामध्ये डी आय आय ( DII) ने 11089 करोडची खरेदी केलेली आहे.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:

  1. इंडिया वीक्स ( VIX) 23.02 एवढा आहे.
  2.  मार्केटचा पीई (PE) 32.21 एवढा आहे. पीई  दिसायला जरी कमी असला. तरी हा नवीन पद्धतीने मोजण्यात येणारा पीई आहे जर तो जुन्या पद्धतीने ऍडजेस्ट केला तर तो 40-41 च्या आसपास येईल.
  3.  यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.62 एवढा आहे.काही प्रमाणात कमी होत असलेला बॉंड़ यील्ड पुन्हा वाढत आहे हे मार्केट साठी एक चिंतेचे कारण असू शकते.
  4.  यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे.
  5. यु एस मधील कॉर्पोरेट गेन टैक्स ( CGT) वाढवण्याची तयारी चालू आहे.
  6. या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 0.68 एवढा आहे. तर मे महिन्याचा पीसीआर 1.56 एवढा आहे. आठवड्यासाठी चा पी सी आर जरी सकारात्मक असला तरी मेचा पीसीआर जास्त असल्याकारणाने आपण याला नकारात्मक संकेत मधे ठेवला आहे. परंतु या दोघांच्या तील फरक पाहिला तर जास्त नकारात्मक प्रभाव पडणार नाही असे दिसते
  7. पुन्हा या आठवड्यासाठी ही सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे तो म्हणजे कोरोना रुग्णसंख्या कालच्या आकडेवारीनुसार देशामध्ये प्रति दिवस चार लाखापर्यंत रुग्णसंख्या पोहोचलेली आहे तर दररोज साडेतीन हजारापर्यंत मृत्यू कोरोनामुळे देशात होत आहे महाराष्ट्र मध्ये 15 मे पर्यंत प्रतिबंध वाढवण्त आलेले आहेत तर इतर काही राज्य प्रतिबंध वाढवत आहेत हा मार्केट साठी सर्वात मोठा नकारात्मक बिंदू आहे. पश्चिम बंगालचा दोन मे रोजी निकाल लागल्यानंतर कोरोना चाचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर अजूनही जास्त भयावह कोरोना बाधितांची संख्या समोर येण्याची शक्यता आहे.
  8. क्रुड ऑईल ही काही प्रमाणात वाढत आहे. त्याचा बंद भाव $67.28 एवढा आहे. अगोदरच वाढलेल्या तेलाच्या किमतीत यामुळे वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसू शकतो.
  9. एप्रिल महिन्यामध्ये एफ आय आय ( FII) ने  12693 करोडची विक्री केलेली आहे. गेल्या काही महिन्यानंतर प्रथमच FII  कडून विक्री झालेली दिसते.

03 – 07 मे मार्केट दिशा:

     सर्व सकारात्मक आणि नकारात्मक संकेत पाहिल्यानंतर कोणते संकेत जास्त प्रभावशाली आहेत, आणि मार्केट वरती जास्त परिणाम करू शकतात यावरून आपण मार्केट ची दिशा ठरविण्याचा प्रयत्न करतो. सध्याला कोरोना हाच सर्वात मोठा संकेत आहे रुग्ण संख्या 4 लाख जवळ पोहोचलेली आहे.बरेच तज्ञ ही संख्या पश्चिम बंगालमधील चाचणीनंतर वाढू शकते असे अंदाज लावत आहेत. ही जरी चिंताजनक बाब असली तरी वाढणारे व्हॅक्सिनेशन दिलासादायक बाब आहे. 1 मे तारखेपासून सुरु झालेले 18 वर्षावरील सर्वांसाठी चे लसीकरण कोरोना ला आळा घालण्यातील  महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. परंतु या लसीकरणाचे यश सरकार लस किती प्रमाणात उपलब्ध करून देऊ शकते यावर अवलंबून आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यात (पूर्ण पडत नाही) सरकार यशस्वी ठरत आहे असे सध्याचे चित्र आहे. 
   
         याच बरोबर या आठवड्यासाठी  दुसरा सर्वात मोठा घटक म्हणजे देशातील पाच राज्यांचा निवडणुकीचा निकाल. त्यामध्ये खास करून पश्चिम बंगालचा निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा घटक मार्केट साठी ही खूप महत्त्वाचा ठरू शकतो पश्चिम बंगालमध्ये जर भाजपचा विजय झाला तर मार्केट खूप पॉझिटिव्ह संकेत देऊ शकते. परंतु जर ममता दीदींच्या तृणमुल काँग्रेसचा विजय झाला, आणि भाजपचा खूप मोठा पराभव झाला तर आठवड्याचे पहिले दोन दिवस मार्केटमध्ये सुस्ती  होऊ शकते. आणि जर भाजपचा पराभव झाला परंतु भाजपला 100 ते 125 च्या मध्ये जागा मिळाल्या तर मार्केट वरती त्याचा जास्त परिणाम होईल असे दिसत नाही. त्याच बरोबर केरळ, तामिळनाडू आणि आसामच्या निकालाकडे ही लक्ष असेल.
      दोन्ही बाजूच्या ट्रेड की संधी या आठवड्यात मिळेल युरोपियन मार्केट आणि यु एस मार्केट कन्सोलिडेशन मध्ये राहण्याची शक्यता आहे.
या आठवड्यासाठी मार्केटचा आपला VIEW BULLISH असणार आहे. फक्त या वेळेस थोडं सावधगिरीने ट्रेड करावा

निफ्टी 03 ते 07 मे अंदाज:

  • पी सी आर ( PCR ) 0.68 आहे.
  •  निफ्टी चा पी ई ( PE)  32.21 एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे.
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 15000 च्या कॉल (CE) वर 3030252 एवढा आहे. तर 14,900  च्या कॉल  (CE) वर 2115150 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 14500 च्या पुट(PE)  वर 1851825 तर 14000 PE वर 2503725 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • मे महिन्याचा ओपन इंटरेस्ट पाहिला तर 14800 कॉल वर 8,20,350 तर 15000 कॉल वर 21,98,250 आहे. तसेच 14500 पुट वर 17,89,050 तर 14000 पुट वर 31,34,925 हा आहे.
  • ओपन इंटरेस्ट (OI) वरुन 15000 हा रेजिस्टंस तर 14000 हा सपोर्ट ही 1000 पॉइंट ची रेंज या महिन्याच्या बंद साठी दिसत आहे.
  • निफ्टीचा बंद भाव हा 14631.1 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 14660.35 आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम  29 पॉइंट एवढा आहे.
  •  अपसाईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भाव 14631.10 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 14870 हा आहे. आणि हीच आपली पहिली लेवल आहे यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर आपली दुसरी लेवल 15050/100 ही येऊ शकते. यावरती एक दिवस बंद राहिल्यानंतर आपली तिसरी लेवल आणि या आठवड्यासाठी चे टारगेट 15375/430 हा ऐतिहासिक सर्वोच्च स्तर पुन्हा एकदा निफ्टी प्राप्त करू शकते.
  • डाउन साईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर तिचा पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 14500 हा असेल जोपर्यंत एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद होत नाही तोपर्यंत खालची लेवल येण्याची शक्यता कमी आहे. तरी पण दुसरी लेवल 14200 ही असण्याची शक्यता आहे.हीच या आठवड्यासाठी चे खालचेे टारगेट असू शकते.  खूपच नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 13960 पर्यंत जाऊ शकते पण ही शक्यता खूपच कमी आहे.
  • NIFTY 50 @ 14341.35

          R1- 14870    R2 – 15050/100  R3- 15375/425-WT


          S1 – 14500     S2- 14200 WT     S3- 13960


बँक निफ्टी 03 ते 07 मे अंदाज:

  • बँक निफ्टी पीसीआर या वीक साठी 0.74 तर मंथली 1.17 आहे.
  • बँक निफ्टी चा पीई ( PE) 24.18 एवढा आहे.
  • बँक निफ्टी चा बंदभाव 32781.80 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 32824.90 एवढा आहे म्हणजेच प्रिमीयम 43 पॉईंट चा आहे.
  • ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी 33000 CE   कॉल वरती 492275  तर 33500 कॉल वर 477850 आणि 34000 CE वर 756150 आहे. तर 32500 PE वर 289225 आणि 32000 PE वर 481475  ओपन इंटरेस्टआहे.
  • मे महिन्याचा ओपन इंटरेस्ट 33000 कॉलवर 1,21,650 तर 34000 कॉलवर 1,36,700 आहे. तसेच 32500 च्या पुटवर 82,700 तर 32000 पुट वर 2,06,375 आहे.
  • बँक निफ्टी अप साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 32781.80 पासुन वरती जायला सुरुवात केली तर पहिला रेजिस्टन्स 35500 ही लेवल असेल. यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 34100/125 ही दुसरी लेवल असेल आणि या वरती जर एक तासाची किंवा एक दिवसाची कॅण्डल स्टिक बंद झाली तर 35100/125 ही लेवल येऊ शकते, आणि हे आपले या आठवड्याचेही टारगेट असेल.
  • बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  32781.80  खाली जायला सुरुवात केली, तर पहिला सपोर्ट  32425/375 या लेवल वरती आहे. जर या खाली एक तासाची कॅण्डल बंद झाली. तर दुसरी लेवल 31975/25 ही असेल याखाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, आणि एखादी वाईट बातमी आली तरच 30900 ही लेवल येण्याची शक्यता असेल परंतु याठिकाणी येण्याची शक्यता फार कमी आहे.

  • BANK NIFTY @ 32781.80

    R1- 33500       R2- 34100/125    R3- 35100/125 – WT


    S1-  32425/375      S2- 31975/25- WT   S3- 30900


वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.


निफ्टी फायनान्स सर्वीस 03 ते 07 मे अंदाज:

NIFTY financial services: @ 15560.10

R1 – 15850   R2- 16200/50 – WT       R3- 16400 
S1 – 15400      S2- 15175/125 WT       S3- 14650/600

    यावेळेस लेवल पाहताना एक गोष्ट लक्षात आली असेल की दोन्ही बाजूला विकली टारगेट दिलेले आहे. आपला अंदाज जरी बुलिश  असला तरी या आठवड्यात असणारे काही घटक मार्केटला खालीही घेवून येवू शकतात. त्यासाठी तयार रहावे या उद्देशाने त्या लेवल दिलेल्या आहेत. जर वरचे टार्गेट आले तरच आपला अंदाज बरोबर आहे असे  मानले जाईल परंतु डाऊन साईड ची ही तयारी असावी.

 

महत्त्वाच्या बाबी: 

आठवड्यासाठी कोरोना बरोबरच पाच राज्यांचे निकाल हे खूप महत्त्वाचे घटक आहे हे आर्टिकल लिहून होण्यापर्यंत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार बनत आहे अशी परिस्थिती होती. ज्यामध्ये तृणमूल 202 तर भाजप 77 जागांवर ती पुढे होते निकाल लागल्यानंतर मी इथे अपडेट करेल.
ता.क – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 213 तर भाजप ला 77 जागा मिळल्या आहेत. तर आसाम मधे 60 जागा मिळवुन  भाजप सत्तेत आले आहे.
   कोरोनाच्या परिस्थितीतून अजूनही बाहेर पडलेलो नाही त्यामुळे इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस शिस्तीने पाळत चला. जो सेटअप बनत आहे त्यानुसार या आठवड्यात देखील दोन्ही बाजूचे ट्रेड मिळण्याची शक्यता आहे. आठवड्यासाठी चा अंदाज जरी बुलिश  असला तरी काहीवेळा शॉर्ट सेलींग ची संधी मिळू शकते यावेळेस आपण टेलिग्राम चैनल ला अपडेट करत असतो. ओव्हर नाइट ट्रेड करताना SPREAD   किंवा HEDGE चा  आधार घेऊन ट्रेड करा. प्राप्त डेटा वरून आपण हा अंदाज व्यक्त करत असतो काही बातमी आली तर मार्केट डेटा चा विरुद्ध काम करण्याची जोखीम लक्षात घेऊन कामकाज करावे.

DISCLAIMER :  वरील सर्व एनालिसिस दिसणार्‍या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. 

एक विनंती: आपण लवकरच चार्ट पैटर्न विषयी माहिती आपल्या ब्लॉग वरती देणार आहोत .तरीपण कोणत्या चार्ट पॅटर्न विषयी माहिती हवी आहे हे कमेंट मध्ये नमूद करावे. तसेच आपले विकली प्रेडिकशन विषयी 
 मतेही कृपया मला पर्सनली मेसेज न पाठवता कमेंट मध्येच नमूद करावेत यांनी आम्हाला आमच्या चुका सुधारायला मदत होते.

 

 

2 thoughts on “03 may 2021 Stock Market Weekly Prediction | 03 मे 2021 स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन”

  1. Sir VIX,PCR तसेच ADX indicator,ichimoku cloud indicator याबद्दल अधिक लेख प्रसिद्ध करावेत ही विनंती🙏🙏🙏

    Reply
  2. Please give all basic information about orders placing and meaning of option giving in brokers application

    Reply

Leave a Comment