10 MAY 2021 Share Market Weekly Prediction | 10 मे 2021 शेअर मार्केट विकली प्रेडिकशन

 

Stock Market Weekly Prediction 10 – 14 MAY 2021 |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन 10 – 14 मे २०२१

PREDICTION 07 :-

03  मे ते 07 मे मार्केटचा आढावा : 

       03 मे ते 07 मे या आठवड्यासाठी चे आपले शेअर मार्केट विषयी  हे सहावे ( 6 वे) प्रेडिक्शन होते. जे की बुलिश होते. त्याचबरोबर बंगाल आणि इतर चार राज्यातील निवडणुकांचा निकाल आणि कोरोना रुग्ण्संख्या यामुळे मार्केट पहिले दोन दिवस त्या निकालांवरती प्रतिक्रिया म्हणून सूस्त राहण्याचे संकेत दिले होते. अगदी त्याप्रमाणेच सोमवार आणि मंगळवारी मार्केट खाली राहिले आणि नंतरचे तीन दिवस मार्केटने सतत तेजी दर्शविली आहे. मागच्या आठवड्याच्या बंद भावाच्या तुलनेत मार्केट 1.31% टक्के वरती बंद झाले म्हणजेच आपल्या पहिल्या रेजिस्टन्स जवळ बंद झाले. बँक निफ्टी ही आपल्या पहिल्या रेजिस्टन्स च्या वरती आणि दुसऱ्या रेजिस्टन्स जवळ 33927 या भावावर बंद झाली. तर निफ्टी फायनान्स सर्विसेस 15771 या आपण दिलेल्या पहिल्या लेवल जवळ बंद झालेली आहे. म्हणजेच या आठवड्यासाठी चा आपला तेजी चा अंदाज बरोबर आलेला आहे. परंतु आपले जे वीक साठी चे फायनल टारगेट होते ते पूर्ण झाले नाहीत. परंतु त्याचा अंदाज आपण लेखामध्ये व्यक्त केलेला होता आणि खालच्या बाजूच्या व्यक्त केलेल्या लेवल पासूनच मार्केट ने रिकवरी केलेली आहे. हे आपले सहावे परीक्षण होते त्यामध्ये पाच बरोबर आलेले आहेत तर एक चुकीचे नाही परंतु आपले टार्गेट आले नाही. निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्स सर्विस या तिन्ही इंडेक्समध्ये खालच्या लेवल पासून म्हणजेच आपण दिलेल्या सपोर्ट पासून चांगल्या खरेदीच्या संधी मिळाल्या याविषयी आपण वेळोवेळी टेलिग्राम चैनल मध्ये अपडेट करत असतो.
  • Nifty 50-  पहिली लेवल  पूर्ण 
  • Banknifty –  दुसरी लेवल पुर्ण
  • Nifty finance services- पहिली लेवल पुर्ण 

                 

        03 मे ते 07 मे या आठवड्याचा डेली चार्ट जर काढून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल आपण ज्या लेवल सहाव्या अंदाजात व्यक्त केल्या होत्या त्या लेवल वरती मार्केट ने काही काळ घालवलेला आहे म्हणजेच त्या ठिकाणी काही नवीन पोजीशन  बनवण्यासाठी च्या संधी तसेच असलेल्या पोजीशन मधून बाहेर पडण्याच्या संधी नक्कीच मिळाल्या असतील. टीप- वरती मार्केटची आकडेवारी  म्हणजे निफ्टीची असे गृहीत धरावे.
सर्व संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत. हा मे महिन्यातील दुसराा आठवडा आहे . 

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत: 

  1. आरबीआयकडून अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत सी पी आय ( CPI) 4% एवढा आहे 6% च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट साठी ते फायदेशीर आहे.
  2.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे . परंतु गेल्याच आठवड्यात अमेरिकन अर्थव्यवस्था ओवरहीटेड आहे त्यामुळे व्याजदराचा विचार करावा लागेल या अनुषंगाने चे निवेदन अमेरिकेत आले होते. ते पुन्हा मागेही घेण्यात आले. त्यामुळे अमेरिकन मार्केट काही प्रमाणात पडले निवेदन मागे घेण्याच्या घोषणेनंतर मार्केट मध्ये पुन्हा तेजी दिसून आली. जर हेच भारतीय मार्केटमध्ये झाले असते तर परिस्थिती काय असते ? याचा अंदाज तुम्ही लावू शकता.
  3. यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे.उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच युएस मार्केट बुलिश आहे. आणि ते आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कामकाज करत आहे.
  4. Covid-19 व्हॅक्सिनेशन यांची गती ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होती त्या प्रमाणात वाढ झालेली नसली तरी काही प्रमाणात लसीकरण चालू झालेले आहे. तसेच 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस भेटण्यास सुरवात झाली आहे.आणि जसे लसीकरण वाढत जाईल ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
  5. जीएसटी (GST) कलेक्शन एप्रिल साठी 1.41 लाख करोड झाले आहे. हे ऐतिहासिक उच्च कलेक्शन आहे. यामध्ये समजून घेण्यासारखा दुसरा पैलू म्हणजे कोरोना मुळे सर्व उद्योगधंदे प्रभावित झाले असताना जीएसटी गेले काही महिने वाढत चालला आहे. ( मार्च 1.21 लाख कोटी) म्हणजेच अर्थव्यवस्थेत काहीतरी सकारात्मक पणा येत आहे. याचा अर्थ कोरोना मधून बाहेर पडल्यानंतर अर्थव्यवस्था धावायला तयार आहे. हे येणाऱ्या काळात मार्केट साठीचे सर्वात सकारात्मक घटक असू शकतात.
  6. डॉलर इंडेक्स 90.20 आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  7. भारतीय रुपया 73.25 आहे. रुपयाचा भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी झालेला. परंतु एकंदरीत स्थिर असल्याकारणाने आयात-निर्यात खाते स्थिर आहे. त्यामुळे जास्त चढ-उतार न होणे हे मार्केट साठी चांगले संकेत असतात.
  8. रिलायन्स कन्सोलिडेशन ते बुलिश राहण्याची शक्यता आहे. जाहीर झालेला Q4 चा रिझल्ट हा रिलायन्स साठी अतिशय उत्तम होता. मागील वर्षाच्या तुलनेत 129 टक्के एवढी वाढ रिलायन्सने नोंदवलेली आहे. निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
  9. निफ्टी मधील बऱ्याचशा कंपन्यांचे Q4 रिझल्ट येत आहेत. ते खूपच चांगले येत नसले तरी अपेक्षा कमी असल्याकारणाने अपेक्षे पेक्षा ते बर्‍यापैकी चांगले लागत आहे. त्यामुळे हा एक मार्केट साठी चांगला संकेत आहे.
  10. निफ्टीचा बंद भाव 14823.15 हा आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव हा 14869.55 आहे म्हणजेच 46.40 पॉईंटचा प्रीमियम आहे. हा प्रीमियम हा मार्केट साठी सकारात्मक संकेत आहे
  11. मे महिन्यामध्ये झालेल्या वीक मधे डी आय आय ( DII) ने 2315 करोडची खरेदी केलेली आहे. ही खरेदी खूप जास्त नाही परंतु आकडे खरेदीचे असणे केव्हाही चांगलेच

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:

  1. इंडिया वीक्स ( VIX) 20.8 एवढा आहे.
  2.  मार्केटचा पीई (PE) 30.23 एवढा आहे. पीई  दिसायला जरी कमी असला. तरी हा नवीन पद्धतीने मोजण्यात येणारा पीई आहे जर तो जुन्या पद्धतीने ऍडजेस्ट केला तर तो 38-40 च्या आसपास येईल. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय तो सतत कमी होत आहे.
  3.  यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.57 एवढा आहे.काही प्रमाणात कमी होत असलेला बॉंड़ यील्ड आहे.
  4.  यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे.
  5. यु एस मधील कॉर्पोरेट गेन टैक्स ( CGT) वाढवण्याची तयारी चालू आहे. 4-5  हे दोन मुद्दे गेल्या दोन तीन आठवड्यापासून सतत येत आहे. मार्केट ने या दोन्ही वरती रिअक्शन दिलेली आहे. परंतु हे मुद्दे अजूनही पूर्णत्वाला गेले नाहीत, ते कधीही निर्णय होऊ शकतात आणि पुन्हा मार्केट मध्ये त्या अनुषंगाने बदल होऊ शकतो म्हणून पुन्हा पुन्हा देत आहोत.
  6. या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 1.05 एवढा आहे. तर मे महिन्याचा पीसीआर 1.52 एवढा आहे. आठवड्यासाठी चा पी सी आर जरी काहीसा सकारात्मक असला तरी मेचा पीसीआर जास्त असल्याकारणाने आपण याला नकारात्मक संकेत मधे ठेवला आहे. परंतु या दोघांच्या तील फरक पाहिला तर जास्त नकारात्मक प्रभाव पडणार नाही असे दिसते
  7. पुन्हा या आठवड्यासाठी ही सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे तो म्हणजे कोरोना रुग्णसंख्या कालच्या आकडेवारीनुसार देशामध्ये प्रति दिवस 4,12,000 रुग्णसंख्या पोहोचलेली आहे तर दररोज 4000 पर्यंत मृत्यू कोरोनामुळे देशात होत आहे. महाराष्ट्र मध्ये 15 मे पर्यंत प्रतिबंध वाढवण्त आलेले आहेत तर इतर काही राज्य प्रतिबंध वाढवत आहेत हा मार्केट साठी सर्वात मोठा नकारात्मक बिंदू आहे. 
  8. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन अप रेशो 4.66 तर बँक निफ्टी साठी 0.83 एवढा आहे. निफ्टी साठी ही सर्वात जास्त चिंताजनक बाब आहे निफ्टी मध्ये अपसाईड अपेक्षा डाउन साईड खूप जास्त दिसत आहे.
  9. क्रुड ऑईल ही काही प्रमाणात वाढत आहे. त्याचा बंद भाव $68.28 एवढा आहे. अगोदरच वाढलेल्या तेलाच्या किमतीत यामुळे वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसू शकतो.
  10. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात  एफ आय आय ( FII) ने  5092 करोडची विक्री केलेली आहे. एप्रिल महिन्यातील विक्री नंतर पुन्हा FII  कडून विक्रीचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.

10 – 14 मे मार्केट दिशा:

     सर्व सकारात्मक आणि नकारात्मक संकेत पाहिल्यानंतर कोणते संकेत जास्त प्रभावशाली आहेत, आणि मार्केट वरती जास्त परिणाम करू शकतात यावरून आपण मार्केट ची दिशा ठरविण्याचा प्रयत्न करतो. सध्याला कोरोना हाच सर्वात मोठा संकेत आहे रुग्ण संख्या प्रतिदीवस  4.15 लाख जवळ  पोहोचलेली आहे. मृत्यू संख्या झपाट्याने वाढत आहे. लसीकरणा मध्ये होणारा उशीर आपण तिसरा लाटेला आमंत्रण देतो की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. ऑक्सिजनची कमतरता अजूनही जाणवत आहे सध्या जरी मार्केट यावर ती खूप जास्त निगेटिव्ह आरक्षण देत नसले तरी पण मार्केटला वरती जाण्यात खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे सर्व ग्लोबल मार्केट तेजीत आहेत आणि येणाऱ्या आठवड्यात हे ते खूप तेजीत राहण्याचे संकेत आहेत परंतु आपली परिस्थिती पाहता आपले मार्केट खूप तेजी करू शकेल अशी अपेक्षा सध्या तरी नाही परंतु लसीकरणाबाबत असलेली असलेली आस आणि ग्लोबल मार्केट ची तेजी यामुळे आपले मार्केट खूप खाली जाईल ही शक्यताही नाही पण जर ग्लोबल मार्केटमध्ये काही बातमी आली आणि ते निगेटिव्ह झाले तर मात्र भारतीय मार्केटमध्ये मोठी पडझड होऊ शकते कोणाची रुग्ण संख्या कमी होईल किंवा स्थिर होईल आणि लसीकरणाला वेग येईल या अपेक्षेने मार्केट वरती टिकून आहे
या आठवड्यासाठी मार्केटचा आपला VIEW SIDEWAYS  असणार आहे. 

निफ्टी 10 मे ते 14 मे अंदाज :

  • पी सी आर ( PCR ) 1.05 आहे.
  •  निफ्टी चा पी ई ( PE)  30.23 एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे.
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 15000 च्या कॉल (CE) वर 2466825 एवढा आहे. तर 15100  च्या कॉल  (CE) वर 2164200 तर 15200 CE 2886375 ओपन इंटरेस्ट आहे. तसेच  14800 PE वर 2151075 तर 14700 PE 1969725 आणि 14500 PE 2821575 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • मे महिन्याचा ओपन इंटरेस्ट पाहिला तर 15000 कॉल वर 2599500 आहे. तसेच 14500 पुट वर 2481075  हा आहे. मागच्या आठवड्याशी पडताळून पहा. 
  • ओपन इंटरेस्ट (OI) वरुन 15000 हा रेजिस्टंस तर 14000 हा सपोर्ट ही 1000 पॉइंट ची रेंज या महिन्याच्या बंद साठी दिसत आहे.
  • निफ्टीचा बंद भाव हा 14823.15 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 14869 आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम  46 पॉइंट एवढा आहे.
  •  अपसाईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भाव 14823.15 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15000/50 हा आहे. आणि हीच आपली पहिली लेवल आहे यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर आपली दुसरी लेवल 15125/150 ही येऊ शकते. हेच या वीक साठी टारगेट येत आहे वरच्या दोन्ही लेवल  पाहून लक्षात आले असेल की वरती जाण्यात निफ्टी ला किती अडथळा येऊ शकतो. त्यामुळेच अगदी 100 पॉईंट मध्येच दुसरी लेवल दिलेली आहे. शक्यता कमी आहे परंतु 15150 वरती एक तासाची किंवा एक दिवसाची कॅन्डल स्टिक बंद झाली तर तिसरी लेवल  15275/325 हा  स्तर पुन्हा एकदा निफ्टी प्राप्त करू शकते.
  • डाउन साईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर तिचा पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 14630 हा असेल जोपर्यंत एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद होत नाही तोपर्यंत खालची लेवल येण्याची शक्यता कमी आहे. तरी पण दुसरी लेवल 14500/475 ही असण्याची शक्यता आहे.हीच या आठवड्यासाठी चे खालचेे टारगेट असू शकते. नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 14250/200 पर्यंत जाऊ शकते पण ही शक्यता कमी आहे. समजून घेण्याची गोष्ट म्हणजे 14200 हा निफ्टी साठी खूपच महत्त्वाचा सपोर्ट आहे.

  • NIFTY 50 @ 14823.15

          R1- 15050    R2 – 15125/150-WT   R3- 15275/325


          S1 – 14630    S2- 14500/475- WT     S3- 14200

बँक निफ्टी 10 ते 14 मे अंदाज:

  • बँक निफ्टी पीसीआर या वीक साठी 0.82 तर मंथली 1.21 आहे.
  • बँक निफ्टी चा पीई ( PE) 22.43 एवढा आहे.
  • बँक निफ्टी चा बंदभाव 32904.50 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 33005.05 एवढा आहे म्हणजेच प्रिमीयम 100.55 पॉईंट चा आहे.
  • ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी 33000 CE   कॉल वरती 821400  तर 33500 कॉल वर 688425 आणि 34000 CE वर 846550 आहे. तर 32500 PE वर 478250 आणि 32000 PE वर 694700  ओपन इंटरेस्टआहे.
  • मे महिन्याचा ओपन इंटरेस्ट  34000 कॉलवर 241050 आहे. तसेच  32000 पुट वर 285950 आहे. हा ओपन इंटरेस्ट तुम्ही मागच्या वीकशी पडताळून पहा बऱ्याच बाबी लक्षात येतील. 
  • बँक निफ्टी अप साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 32904.5 पासुन वरती जायला सुरुवात केली तर पहिला रेजिस्टन्स 33100/150 ही लेवल असेल. यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 33775/850 ही दुसरी लेवल असेल आणि हे या आठवड्यासाठीचे वरचे टारगेट असे निफ्टी प्रमाणे बँक निफ्टी मध्येही लेवल जवळ जवळ आहेत. या वरती जर एक तासाची किंवा एक दिवसाची कॅण्डल स्टिक बंद झाली तर 34200/250 ही लेवल येण्याचीही शक्यता आहे परंतु ती कमी आहे.
  • बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  32904.5  खाली जायला सुरुवात केली, तर पहिला सपोर्ट  32525/475 या लेवल वरती आहे. जर या खाली एक तासाची कॅण्डल बंद झाली. तर दुसरी लेवल 32125/100 ही असेल . हे या वीक साठीचे टारगेट असेल आणि जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, आणि एखादी वाईट बातमी आली तरच 31000 ही लेवल येण्याची शक्यता असेल परंतु याठिकाणी येण्याची शक्यता फार कमी आहे.

  • BANK NIFTY @ 32904.50

    R1- 33100/150       R2- 33775/850-WT     R3- 34200 


    S1-  32525/475      S2- 32125/100- WT   S3- 31000


वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्वीस 10 ते 14 मे अंदाज:

NIFTY financial services: @ 15771.05    
future @15816.95

R1 – 15875/925   R2- 16150/200 – WT       R3- 16400 
S1 – 15525       S2- 15250/1 WT       S3- 14650/60

महत्त्वाच्या बाबी:

                         पूर्ण विश्लेषण समजून घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल यावेळेस च्या वीकमध्ये अतिशय कमी रेंज मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन आहेत.  ग्लोबल मार्केट तेजीत आहेत परंतु भारतीय मार्केट साठी लोकल गोष्टींच्या नकारात्मक प्रभावा मुळे  मार्केट वर जायला तयार नाही. उलट मार्केटमधील डाउन साईड काही प्रमाणात जास्त  दिसायला लागलेली आहे. 
                      जर लवकरच कोरोना च्या परिस्थितीमधून आपण सावरलो नाही, तर मार्केटमध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन – चार आठवड्यात मार्केट 14208 ते 15200 या रेंज मध्येच काम करत आहे आता जर ही रेंज कोणत्या ही बाजूला तोडण्याचा प्रयत्न झाला. तर मोठी चाल येण्याची शक्यता आहे. चुकून जर सपोर्ट तुटला गेला तर मार्केट मधील मोठ्या मोठ्या लोकांची ज्या ठिकाणी नजर आहे ते निफ्टीतील 13000 आणि बँक निफ्टी तील 28000 या लेवल ही येऊ शकतात. शेअर बाजारामधे काम करताना टेक्निकल, फंडामेंटल आणि बातम्या पाहत असताना मोठे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स काय विचार करत आहेत याकडेही लक्ष ठेवत चला. त्यामुळे सर्वांनी पुढील काही दिवस  ट्रेडिंग करताना सावध राहा. पोर्टफोलिओ  मध्ये असणाऱ्या स्टॉक मधील स्टॉप लॉस ट्रेल करत राहा. याविषयी आपण telegram channel वर बोलणारच आहोत. 
DISCLAIMER :  वरील सर्व एनालिसिस दिसणार्‍या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.

सेबी विषयी एक सूचना:  

                सेबीकडून नवीन सूचना आले त्याप्रमाणे बर्‍याच जणांना हा प्रश्न पडलाय की सप्टेंबर पासून इंट्राडे ट्रेडिंग बंद होणार का? आणि सेबीच्या सूचनेचा रिटेल इन्वेस्टर वरती काय परिणाम होईल? याविषयी खूप जणांचे मेसेज आले आहेत आपण लवकरच त्याविषयीचे सविस्तर विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. तसेच खूप सारे नवीन ट्रेडर्स डिमॅट अकाउंट विषयी विचारणा करत असतात त्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी डिमॅट अकाउंट विषयी आणि ब्रोकरच्या एप्लीकेशन मधील ट्रेडिंग साठीच्या सर्व घटकांचे विश्लेषण पर माहिती लवकरच प्रकाशित केले जाईल.

2 thoughts on “10 MAY 2021 Share Market Weekly Prediction | 10 मे 2021 शेअर मार्केट विकली प्रेडिकशन”

  1. खूप छान माहिती सहज आणि सोप्या शब्दात दिली.खूप खूप धन्यवाद सर

    Reply

Leave a Comment