DEMAT INFORMATION MARATHI | डिमॅटची माहिती मराठी मधे

      शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सर्वात पहिली गरज लागते ते म्हणजे डिमॅट अकाउंट बऱ्याच जणांना डिमॅट अकाउंट म्हणजे काय याविषयी माहिती नसते. ऐकण्यात खूप वेळ आले असेल.  

            डिमॅट अकाउंट विषयी सर्व माहिती । डिमॅट अकाउंट समजून घेताना । ALL ABOUT DEMAT    

  1.  डिमॅट म्हणजे काय ? 
  2.  डिमॅट कसे काढले जाते ? 
  3. डिमॅट कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ? 
  4.  ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ? 
  5.  डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट मध्ये नक्की काय फरक आहे?  याविषयी बऱ्याचशा अनुभवी लोकांनाही  खास अशी माहिती नसते. खूप सार्‍य लोकांकडून मेसेज,  मेल , फोनवर याविषयी विचारणं केली गेली आहे म्हणूनच या सर्व प्रश्नांचे उत्तरे या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.  जे अनुभवी  आहे त्यांनी पुढे नाही वाचले तरी चालेल परंतु जे नवीन आहे त्यांच्यापर्यंत हे नक्कीच पोहोचवा. 

   डिमॅट म्हणजे काय ? । WHAT IS DMAT ?

             सुरुवातीच्या काळामध्ये एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे असते ते तर तुम्हाला ब्रोकर  करवी  किंवा स्वतः  NSE ( NATIONAL STOCK EXCHANGE ) किंवा BSE  ( BOMBAY STOCK EXCHANGE) मध्ये जाऊन ज्याच्याकडे ते  शेअर आहे त्याला पैसे देऊन त्याबदल्यात तुम्हाला शेअर मिळायचे म्हणजे त्या शेअरचे लेखी दस्तावेज तुम्हाला  मिळायाचे  याला फिजिकल शेअर असे म्हटले जायचे परंतु ही खूप मोठे प्रोसेस होती. यामधे वेळही  खूप जायचा त्याच बरोबर शेअर चे दस्तावेज गहाळ होण्याचे प्रमाण खूप होते.  कम्प्युटरचा वापर वाढत गेल्यानंतर शेअर इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये बदलण्यात आले  म्हणजे शेअर डी मटेरिअलाईज करण्यात आले  आणि ऑनलाईन  खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी ते शेअर साठवण्यासाठी ज्या अकाउंट ची गरज पडते त्याला डिमॅट ( DEMATERILAISE  ACCOUNT )   म्हणजे डी मटेरिअलाईज अकाउंट असे म्हणतात.  डिमॅट  मध्ये फक्त तुम्ही खरेदी केलेले शेअर असतात जे तुम्ही खरेदी केल्यानंतर T२ म्हणजे दोन दिवसानंतर जमा होतात.  आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल डिमॅट मध्ये जर फक्त शेअर च असतात तर खरेदी करण्यासाठी पैसे कुठून येतात ?  तर याचे उत्तर आहे ट्रेडिंग अकाउंट. 

ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय  ?  । WHAT IS TRADING ACCOUNT ?

            बरेचशे ट्रेडर्स याच गैरसमजुतीत असतात की ते ट्रेडिंग अकाउंट लाच डिमॅट अकाउंट समजत असतात. डिमॅट मध्ये तुमचे शेअर असतात तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुमचे पैसे असतात.  तुम्ही फक्त ट्रेडिंग अकाउंट ही काढू शकता ज्यामध्ये तुम्ही फक्त इंट्राडे व्यवहार करू शकता.  तुम्ही शेअर राखून ठेवू शकत नाही ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला ब्रोकर कडून दिले जाते,  तर डिमॅट अकाउंट तुम्हाला फक्त दोनच ठिकाण म्हणजे  सीडीएसएल (CDSL) CENTRAL SECURITIES DEPOSITORY LIMITED आणि एनएसडीएल ( NSDL ) NATIONAL SECURITIES DEPOSITORY LIMITED  यांच्याकडून दिले जाते.  खूप सारे ब्रोकर डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट दोन्ही बरोबरच काढून देतात त्यामुळे हा फरक समजून येत नाही आणि तसा तो जास्त गरजेच नाही.  फक्त जर तुमचा ब्रोकर पळून गेला तर मात्र तो  फरक किती महत्त्वाचा आहे हे समजेल.  असो तो आजचा विषय नाही.  या सर्वांवरती सेबी ( SEBI ) चे  नियंत्रण असते. 

DMAT ACCOUNT

                 आता संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ.  ट्रेडिंग अकाउंट ला तुमचे बँक अकाउंट जोडलेले असते आणि डिमॅट अकाउंट ही जोडलेले असते .  एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी तुम्ही बँक अकाउंट मधील पैसे ट्रेडिंग अकाउंट मध्ये जमा करता.  जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता तेव्हा ट्रेडिंग अकाउंट मधील पैसे ज्याच्या कुणाकडे शेअर विक्रीसाठी  आहे त्याच्या ट्रेडिंग  अकाउंट मध्ये जातात आणि त्याच्या डिमॅट मधील शेअर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये येतात आणि जेव्हा तुम्ही डिमॅट अकाउंट मधील शेअर विकता तेव्हा तुमच्या डिमॅट मधील शेअर कमी होऊन  पैसे ट्रेडिंग अकाउंट मध्ये जमा होतात ही एकूण प्रक्रिया असते. वरती इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता. 

Click Open Free demat account – UPSTOX 

Click Open demat account  – ZERODHA 

आता आपण सर्व गोष्टी डिमॅट अकाउंट समजूनच सांगणार आहोत त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट ही आलेच दोन्हींचा मिळून उल्लेख डिमॅट अकाउंट असा करणार आहोत. 

डिमॅट अकाउंट साठी कोणत्या  कागदपात्रांची आवश्यकता असते ? | डिमॅट अकाउंट कसे ओपन करावे ? 

  •  पॅन कार्ड 
  • आधार कार्ड / मोबाइल नंबर जोडलेला हवा.
  • मतदान कार्ड  / ड्रायविंग लायसन्स 
  • ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट 
  • फोटो 

          या कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला डिमॅट अकाऊंट काढण्यासाठी लागते या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कोणत्याही ब्रोकर कडून तुम्ही ही डिमॅट अकाउंट काढून घेऊ शकतात मुख्यतः ब्रोकर चे तीन प्रकार असतात

  1.  फुल सर्विस  ब्रोकर फर्म 
  2.   डिस्काउंट ब्रोकर फर्म 
  3. बँक  ब्रोकर फर्म 

फुल सर्विस आणि बँक याचे चार्जेस जास्त असतात त्याप्रमाणे सेवा ही  दिली जाते. डिस्काउंट ब्रोकर चे चार्जेस आणि फी / शुल्क कमी असते तर लीवरेज / उधार ही काही पट दिले जाते ते ब्रोकर नुसार वेगळे असू शकते. 

डिमॅट ब्रोकरेज फर्म निवडताना काय पाहावे ?

अपस्टॉक्स  ( UPSTOX ) आणि झेरोधा ( ZERODHA ) हे भारतातील दोन आघाडीचे  डिस्काउंट ब्रोकरेज फर्म आहेत. या दोन्ही विषयी माहिती समजून सांगत आहे. तुम्ही ही माहिती बाकीच्या ब्रोकर बरोबर ही  पडताळून पाहू शकता, ती जवळपास सारखेच असते.  डिमॅट अकाउंट उघडणे अगोदर समजून घेण्याच्या बाबी  म्हणजे

  1.  ब्रोकरेज किती आहे.  म्हणजे तुम्ही केलेल्या ट्रेड वरती ब्रोकर किती फी वसूल करणार आहे याची अगोदर सर्व माहिती घ्या. 
  2.  तुम्हाला कोण कोणत्या घटकांबाबत सर्विस पुरवणार आहे जसे की इक्विटी, कमोडिटी,  फ्युचर अंड ऑप्शन,  करन्सी हे सर्व घटक तपासून पाहायचे आहे आणि तुम्हाला ज्यामध्ये ट्रेडिंग करायचे आहे ते सर्व घटक निवडायचे असतात . 
  3.  अकाउंट ओपनिंग ची किती फी आहे. प्रत्येक घटका प्रमाणे फी मध्ये काय बदल आहे. 
  4.  ब्रोकर महिन्याला किंवा वार्षिक किती मेंटेनन्स चार्ज घेतो आहे, हे तपासून पहावे. 
  5.  इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्स  साठी डिमॅट अकाउंट निवडताना सर्वात जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे  लीवरेज / उधार म्हणजेच ब्रोकर किती लीवरेज / उधार देतो हे तपासून पहा. ते प्रत्येक घटकासाठी वेगळे असु शकते.  लीवरेज / उधार म्हणजे तुम्ही जेवढे पैसे जमा करतात त्याच्या काही प्रमाणात  पैशाची तुम्ही खरेदी किंवा विक्री करू शकता हे प्रत्येक ब्रोकर प्रमाणे वेगवेगळे असते. ( उदा. अपस्टॉक्स  मधे इक्विटी साठी २० पट तर झेरोधा मधे १२-१५ पट काही ब्रोकर फर्म  ४० पट ही देतात. ) उधारीचा वापर शक्यतो कमीच करा. 

   डिमॅट मोबाईल अँप्लिकेशन चा वापर कसा करावा ?  HOW  DEMAT MOBILE APPLICATION HANDLE   ? 

   आता आपण अपस्टॉक्स च्या  मोबाईल ॲप्लिकेशन मधील सर्व महत्त्वाचे पर्याय कोणते तसेच  त्यांचा वापर आणि उपयोग समजून घेऊ. याबरोबरच झेरोधा मधे जे पर्याय वेगळे आहेत त्याची माहिती दिली आहे. 

         आकृतीत दाखवल्या प्रमाणे हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर पहिली स्क्रीन असेल त्यामध्ये खालच्या बाजूला पाच पर्याय दिसत आहे त्यामधील पहिला म्हणजे

  1.  वॉचलिस्ट  । WATCHLIST : 

                                                यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे त्या कंपनीचे शेअर जोडून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला त्यावरती लक्ष ठेवता येईल आणि योग्य किमतीला आल्यावर खरेदी किंवा विक्री करू शकता.  तसेच यामध्ये तुम्ही फ्युचर- ऑप्शन पण जोडून ठेऊ शकता, तसेच यामध्ये इंडेक्स जसे की निफ्टी, बँक निफ्टी हेही जोडून ठेवू शकता.  झिरोधा मध्ये अशाच प्रकारे वॉच लिस्ट असते ज्यामध्ये वेगवेगळ्या ५ लिस्ट बनवू शकता.

       2.  ऑर्डर्स । ORDERS 

                                      यामध्ये तीन प्रकारच्या ऑर्डर्स असतात. १)  ऑल । ALL-  म्हणजेच यामध्ये तुम्ही टाकलेल्या तसेच रद्द केलेल्या किंवा पूर्ण झालेल्या अशा सर्व ऑर्डर दाखवल्या जातात. २) ओपन । OPEN –  टाकलेले परंतु अजून पूर्ण न झालेल्या ऑर्डर दाखवल्या जातात. ३) क्लोज । CLOSE –  म्हणजे ज्या ऑर्डर पूर्ण झाल्या आहेत किंवा कॅन्सल केलेल्या आहेत अशा ऑर्डर यामध्ये दाखवल्या जातात.  झिरोधा मध्येही अशाच प्रकारे ऑर्डर्स असतात फक्त त्यामध्ये ओपन ऐवजी पेंडिंग । PENDING  तर क्लोज ऐवजी एक्झिक्युटेड । EXECUTED  हे शब्द वापरलेले असतात. 

  • 3. पोर्टफोलिओ । PORTFOLIO : 

                                           ज्यासाठी हा सर्व खटाटोप आहे तो म्हणजे हा पोर्टफोलिओ हाच पर्याय आहे जो ठरवतो तुम्ही मार्केट मध्ये राहणार की कोल्ह्याला द्राक्ष आंबट होणार. तुम्ही  खरेदी किंवा विक्री केलेल्या शेअर किंवा ऑप्शन ची यादी दाखवलेली असते. त्याचबरोबर त्यामधील नफा किंवा तोटाही  या ठिकाणी असतो.  नफा  असेल तर हिरव्या रंगात आणि तोटा असेल तर लाल रंगात दर्शविला जातो.  पोर्टफोलिओ मध्ये पुन्हा दोन प्रकार असतात.  1) पोझिशन । POSITION – पोझिशन मध्ये इंट्राडे किंवा विकली किंवा मंथली एक्सपायरी साठी घेतलेले शेअर्स आणि फ्युचर ऑप्शन्स दर्शविले जातात.      २) होल्डिंग । HOLDINGS –  गुंतवणुकीसाठी किंवा  स्विंग ट्रेडिंग साठी खरेदी केलेले शेअर्स दाखवले जातात जे T २  म्हणजे दोन दिवसाने डिमॅट मध्ये जमा झालेले असतात.  यामधील शेअर विकण्यासाठी आता तुम्हाला टीपीन । TPIN ची गरज लागते. हा  टीपीन हा तुम्हाला तुमच्या डिपॉझिटरी कडून दिला जातो.  तुमचा आवडता रंग कोणताही असु द्या पण पोर्टफोलिओ पाहायला सुरवात केली की तो हिरवा झालाच म्हणुन समजा. 

  • 4. फंडस् । FUNDS :  

                                      ट्रेडिंग अकाउंट मध्ये किती पैसे शिल्लक आहेत हे या ठिकाणी दर्शविले जाते.  तसेच इंट्रा डे साठी तुम्ही किती पैशाचा वापर केलेला आहे हेही याठिकाणी दर्शविले जाते.  तुम्हाला जर ट्रेडिंग अकाउंट मध्ये पैसे जमा करायचे असतील किंवा ट्रेडिंग अकाउंट मधील पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये काढायचे असतील. तर ते या घटकातून करता येते एक गोष्ट लक्षात ठेवा डिमॅट अकाउंट ओपन करताना ज्या बँकचे  अकाउंट डिटेल्स भरलेले असतात त्याच बँक अकाऊंट मध्ये पैसे काढता येतात किंवा त्यामधूनच पैसे ट्रेडिंग अकाउंट मध्ये जमा करता येतात.  पैसे जमा करण्यासाठी यूपीआय पेमेंट, इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधा उपलब्ध असतात ते तुम्ही सोईप्रमाणे आणि लागणाऱ्या चार्जेस प्रमाणे ठरवू शकता. 

  • 5. इन्वेस्ट । INVEST : 

                                         अपस्टॉक्सने हा  नवीन पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.  यामधून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी किंवा विक्री करू शकता.  तसेच आयपीओ साठी चा अर्ज या पर्यायांमधून करू शकता.  याबरोबरच म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही या पर्यायाचा उपयोग होतो. 

डिमॅट मधे शेअर्सची खरेदी किंवा विक्री कशी करावी 

        वॉचलिस्ट  मध्ये जोडलेल्या एखादा  शेअर समजा मदरसन सुमी.  मदरसन सुमी वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील आकृतीप्रमाणे दिसेल आता यामधील पर्यांया विषयी माहिती घेऊ. 

  1. OVERVIEW :

                        यामध्ये शेअरचा एका  दिवसामधील सर्वोच्च आणि निम्नस्तर दर्शविला जातो. त्याच प्रमाणे एका वर्षांमधील  ( ५२ वीक ) सर्वोच्च आणि निम्नस्तर दर्शविला जातो.  तसेच त्या शेअर साठी असणारे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट या विषयी माहिती दिलेली असते. 

  •  मार्केट डेप्थ । MARKET DEPTH :  

                                                        म्हणजे खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खरेदीदारांची यादी ही डाव्या बाजूला तर उजव्या बाजूला विक्री करणाऱ्या ची संख्या दर्शविलेली असते.  यावरून खरेदीदार आणि विक्री करता यामधील फरक तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.  झेरोधा मधील  मार्केट डेप्थ मध्ये स्टॉप पेक्षा जास्त म्हणजे 20 ऑर्डर पर्यंत मार्केट डेप्थ दर्शवली जाते. 
    

           2. चार्ट | CHART : 

                   चार्ट मध्ये तुम्हाला त्या शेअरचा वेगवेगळ्या टाइम फ्रेम  वरती चार्ट पाहता येतो.  त्यामध्येही तुम्ही कॅन्डल स्टिक चार्ट ,  लाईन चार्ट याप्रमाणे तुम्हाला सोयीस्कर असा चार्ट पाहू शकता .  तसेच वेगवेगळे इंडिकेटर चा उपयोग ही  करू शकता कॅन्डल स्टिक चार्ट समजायला सोपा आणि नवीन लोकांसाठी उपयोगी आहे कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आपले पूर्वीचे लेख वाचू शकता. कॅन्डल स्टिक भाग १ आणि कॅन्डल स्टिक भाग २.  काही महत्वाचे इंडिकेटर विषयी ही आपण यापूर्वीच या लेखांमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन ती घेऊ शकता.  टेक्निकल इंडिकेटर भाग १ आणि टेक्निकल इंडिकेटर भाग २.  त्यापुढे पर्याय आहे ते नवीन लोकांना तितकीशी गरजेचे नाही ते तुम्ही अनुभवाने समजून घेऊ शकता त्यामुळे त्याची याठिकाणी चर्चा करत नाही.  चार्ट हे अपस्टॉक्स पेक्षा झेरोधा मधे  जास्त सुटसुटीत आणि समजायला सोपे असतात. 

BUY / SELL । खरेदी /विक्री : 

                   सर्वात खालच्या बाजूला बाय आणि सेल असे दोन पर्याय उपलब्ध असतात. गुंतागुंत होऊ नये म्हणून सरळ आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे.   इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्ही खरेदी आणि विक्री दोन्ही करू शकता. बाय हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर खालील फोटो प्रमाणे स्क्रीन येईल हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे

  1. कॉन्टिटी । QUANTITY –  मदर सन चे तुम्हाला किती शेअर्स खरेदी करायचे आहे ते ह्या पर्यायांमध्ये तुम्हाला नमूद करावे लागते
  2. ऑर्डर कॉम्प्लेक्सिटी । ORDER COMPLEXITY  –  तुम्ही कोणत्या प्रकारातील ऑर्डर लावायचे ते या पर्यायातून ठरवू शकता या पर्यायांमध्ये तुम्हाला चार पर्याय उपलब्ध होतात. 
  • सिम्पल । SIMPLE –  तुम्हाला साध्या पद्धतीचे ऑर्डर लावायचे असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता यामध्ये तुम्हाला तुमची ऑर्डर एक्झिक्युट झाल्यानंतर स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावावे लागेल. आणि बाहेर पडण्यासाठी स्वतः एक्सिट करावे लागेल. 
  • कवर ऑर्डर । COVER ORDER – कवर याचा याचा अर्थ संरक्षण देणे. या पर्यायात तुमच्या ऑर्डर ला सुरवातीलाच स्टॉप लॉस चे संरक्षण प्रदान केले जाते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हा पर्याय निवडता त्यावेळेस खरेदी किमती बरोबरच स्टोपलॉस हि लावावा लागतो. यामुळे खरेदी करताना ठरलेल्या लॉस पेक्षा जास्त लॉस होत नाही. आणि स्वतः बाहेर पडताना  मार्केट किमतीला बाहेर पडावे लागते. झेरोधा मधे हा पर्याय CO असे नमूद केलेले असते. या प्रकारच्या ऑर्डर साठी जास्त लीवरेज मिळते.
  • ओसीओ ऑर्डर । OCO ORDER । ONE CANCELS OTHER –  कवर ऑर्डर  ही एक बाजूचे कवर ऑर्डर असते परंतु यामध्ये दोन्ही बाजू कवर केलेले असतात. म्हणजेच तुमचा स्टॉप लॉस आणि टारगेट हे तुम्हाला ऑर्डर लावतानाच द्यावे लागते.  तुमची ऑर्डर एक्झिक्युट झाल्यानंतर आपोआप स्टॉप लॉस आणि टारगेट असा 2 लिमीट ऑर्डर ऑर्डर पेंडिंग या पर्याय मध्ये तयार होतात.  टारगेट किंवा स्टॉप लॉस यापैकी एक ऑर्डर हिट झाल्यानंतर दुसरी अपोआप रद्द होते. यामध्येही कवर ऑर्डर प्रमाणे जास्त लीवरेज मिळते.  हवे असल्यास मध्येही एका पेंडिंग ऑर्डर मध्ये जाऊन तुम्ही तुमचा व्यवहार पूर्ण करू शकता झिरोधा मध्ये यालाच ब्रॅकेट ऑर्डर ( BO )  असे संबोधले जाते. 
  • एएमओ  ऑर्डर । AMO । AFTER MARKET ORDER ।आफ्टर मार्केट ऑर्डर – मार्केट बंद असताना येणाऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या मार्केट साठी तुम्ही अगोदर ऑर्डर लावून ठेऊ शकता म्हणजे मार्केट सुरू झाल्यानंतर तुमच्या किमतीला शेअर किंमत आली  तर खरेदी करू शकता याचा फायदा असा होतो की  प्रि-ओपनिंग म्हणजे ९:०८ मिनिटांनी मार्केट जर तुमच्या खरेदी किमतीच्या खाली सुरू झाले तर तुम्हाला त्याच किमतीला शेअर मिळतो. यासाठीची वेळ  मार्केट बंद झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी मार्केट सुरू होण्याअगोदर तुम्ही ही ऑर्डर लावू शकता. खरेदी झाली तर मार्केट सुरु झाल्यावर स्टॉप लॉस किंवा टार्गेट   लावावे लागेल. 

           3. ऑर्डर टाइप | ORDER TYPE –  तुम्ही कोणत्या प्रकाराचे ऑर्डर लावू इच्छिता याचे पर्याय या ठिकाणी मिळतात.

  1.  लिमिट | LIMIT –  तुम्ही जी खरेदी किंमत लावता त्याच किमतीला आल्यानंतर तुमची खरेदी झाली पाहिजे. 
  2.  मार्केट | MARKET –  याचा अर्थ जी किंमत दिसत आहे, म्हणजे LTP ( LAST TRADING PRICE )  त्याच किमतीला तुम्हाला खरेदी करायचे असेल. तर मार्केट ऑर्डर लावली जाते. याठिकाणी समजण्याची बाब म्हणजे जी किंमत दिसत आहे त्यापेक्षा ज्या ठिकाणी विक्रेता उपलब्ध आहे हे जास्त योग्य ठरेल.  याविषयीची माहिती तुम्हाला मार्केट डेप्थ या ठिकाणी मिळेल. 
  3. स्टॉप लॉस लिमिट । STOPLOSS LIMIT –  याचा उपयोग शक्यतो स्टॉपलॉस बनवण्यासाठी केला जातो म्हणजे या किमतीला आल्यावरती तुम्ही त्या शेअरची विक्री करून बाहेर पडता. 
  4. स्टॉप लॉस मार्केट । STOPLOSS MARKET –  हा पर्यायही बरेचदा स्टॉप लॉस साठी वापरला जातो.  यातील फरक म्हणजे लावलेल्या किमतीला शेअर आल्यानंतर ज्या ठिकाणी विक्रेता उपलब्ध असेल त्या किमतीला तुमचा शेअर विकला जातो.  हा पर्याय इंडेक्स ऑप्शन मध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो म्हणजेच जास्त VOLATILE असणाऱ्या ठिकाणी हा पर्याय वापरावा. 

प्रॉडक्ट PRODUCT : 

                यामध्ये दोन पर्याय उपलब्ध असतात डिलेवरी आणि इंट्राडे यालाच झेरोधामध्ये अनुक्रमे सीएनसी (CNC )  आणि एमआयएस ( MIS )  असे निर्देशित केलेले असते. नावावरूनच लक्षात आली असेल. 

  • डिलेवरी । DELIVERY –   म्हणजे तुम्ही शेअर खरेदी करून तुम्हाला हवे तेव्हा विकू शकता हा पर्यायी फक्त खरेदीसाठी उपलब्ध असतो विक्रीसाठी नाही.  
  • एमआयएस/ इंट्राडे । INTRADAY –  या पर्याय अंतर्गत केलेली खरेदी किंवा विक्री चा व्यवहार त्याच दिवशी साडे तीन पर्यंत पूर्ण करावा  लागतो. हा पर्याय खरेदी किंवा विक्री या दोन्हींसाठी ही उपलब्ध असतो. 

यानंतर रिव्यू करून तुम्ही बाय ( BUY )  या पर्याय वरती क्लिक केले की तुमची ऑर्डर प्लेस होते आणि तुम्हाला ऑर्डर या सेक्शन मधील पेंडिंग मध्ये दिसते. 

           इंट्राडे मध्ये तुम्ही अगोदर सेल म्हणजेच विक्री करू शकता आणि साडे तीन पर्यंत खरेदी करून व्यवहार पूर्ण करू शकता.  यासाठी तुमचा डिमॅट ब्रोकर तुमच्यासाठी मध्यस्थी करत असतो या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही सेलही  करू शकता. त्यासाठी वरील सर्व पर्याय अगदी सारखेच असतात.  फक्त हे लक्षात ठेवा अनुभवाने तुम्हाला पुढील गोष्टी लक्षात येतील. 

Click Open Free demat account – UPSTOX 

Click Open demat account  – ZERODHA 

या लेखाचा उद्देश फक्त डिमॅट विषयी बेसिक माहिती आणि ब्रोकरच्या ॲप्लिकेशनची तोंडओळख  हाच होता त्यामुळे काही बाबींविषयी शंका असेल किंवा अजून माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये तसे नमूद करा आपण त्यावरती वेगळा लेख लिहू.  लेख खूपच मोठा होत असल्यामुळे सर्वच विषयांचे सविस्तर माहिती देणे शक्य नाही त्यामुळे मुळे काही बाबी थोडक्यात मांडल्या आहे. 

एक विनंती – आम्ही अगोदर कोणताही लेख SHARE करा असे सांगितले नाही परंतु हा लेख नवीन लोकांना पाठवा. जे मार्केटमधे नुकतेच येत आहेत त्यांना याचा फायदा होईल सुरवातीचा जो काळ सर्व पर्याय समजून घेण्यात जातो तो थोडा सोपा होईल. 

आपुलकीचा सल्ला : मार्केट मधे गुंतवणूक करायच्या आगोदर सर्व माहिती मिळावा. फक्त कोणी आम्हाला कुठे खरेदी आणि विक्री सांगेल आणि त्यातून आम्ही रग्गड पैसे कमावू असे होत नाही. काही शंका असतील. सूचना असतील तर COMMENT करा. किंवा टेलिग्राम जॉईन करा आणि FACEBOOK , TWITTER वर FOLLOW करू शकता. 

5 thoughts on “DEMAT INFORMATION MARATHI | डिमॅटची माहिती मराठी मधे”

  1. खुप सुंदर माहिती…. नवीन लोकंसाठी उपयुक्त…

    Reply

Leave a Comment