Stock market weekly prediction 19-23april | स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन १९ -२३ एप्रिल २०२१

 

Stock Market Weekly Prediction 19 – 23 APRIL 2021 |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन १९ -२३ एप्रिल २०२१

PREDICTION 04 :-

१२ एप्रिल ते १६ एप्रिल मार्केटचा आढावा :

        या वीक साठीचा आपला अंदाज बेरिश होता आणि तो तंतोतंत बरोबर आलेला आहे. हे आपले तीसरे prediction होते. ज्यामध्ये दोन बरोबर आणि एक आपल्या दिशेने गेले नाही परंतु विरुद्धची गेले नाही. मागील विक साठी आपण निफ्टी साठी 14400 आणि 14125 हे दोन टारगेट  दिले होते. निफ्टीने 14240 चा लो (low) बनवला. तर बँक निफ्टी साठी 31100 हे टार्गेट दिले होते, बँक निफ्टी ने 30500 हा लो(low) बनवला. तर निफ्टी फायनान्स सर्व्हिस साठी 15100 – 14825 आणि 14325 असे तीन टारगेट दिले होते. निफ्टी फायनान्स सर्विस ने 14600 हा लो ( low) बनवला. अशाप्रकारे तिन्ही इंडेक्स मधील आपले टारगेट पूर्ण झाले. तसेच ग्लोबल मार्केट विषयी तेजीत राहण्याचे संकेत केले होते तेही अगदी बरोबर आले बऱ्याच ग्लोबल मार्केट ने आपले सर्वोच्च स्तरावर ट्रेड करत आहेत. Prediction 3 या ठिकाणी जाऊन तुम्ही पाठीमागील वीक चा अंदाज पाहू शकता. आणि मार्केट मध्ये होणारे बदल आपण वेळोवेळी टेलिग्राम चैनल वरती अपडेट करत असतो
सर्व संकेत आणि टेक्निकल ऍनालिसिस पाहता या वीक साठी मार्केटचे अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत
 

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत: 

  1. आरबीआयकडून अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत सी पी आय ( CPI) 4% एवढा आहे 6% च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट साठी ते फायदेशीर आहे.
  2.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
  3. यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे त्यामुळेच युएस मार्केट बुलिश आहे.
  4.  निफ्टी फ्युचर 14645 वरती बंद आहे म्हणजेच 27 पॉईंट चा प्रीमियम आहे.
  5.  पाठी मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे जीएसटी कलेक्शन मार्चमध्ये 1.23 लाख करोड एवढे  झाले आहे.
  6.  इंडियन रुपया  74.54 या ठिकाणी आहे आणि तो या लेवल मध्ये सेटल झाल्या सारखा वाटतंय.
  7.  डॉलर इंडेक्स 91.53 एवढा आहे.
  8.  रिलायन्स जो बेरीश  झाला होता तो आता कन्सोलिडेशन  फेज मधे आलेला आहे.
  9.  सर्व ग्लोबल मार्केट अतिशय बुलिश आहेत, युरोपियन मार्केट कोविड च्या आगोदरच्या लेवल च्या वरती निघायला सुरुवात झाली आहे.
  10. डी आय आय एप्रिलमध्ये आत्तापर्यंत 1465 करोडची खरेदी केलेले आहेत आणि ते अजून खरेदी करण्याची शक्यता आहे.
  11. ज्याच्या भीतीमुळे मार्केट निगेटिव होण्याची शक्यता आहे अशा कोरोनाच्या लसीकरणाला वेग आलेला आहे आणि तो अजून वाढण्याचे सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
  12. कोरोनामुळे पूर्ण लॉक डाऊन न करता उद्योगधंद्यांना काही  प्रमाणात सूट देऊन काम सुरू ठेवण्याची मुभा दिलेली आहे.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत: 

  1. यु एस मध्ये बायडन गवर्मेंट कार्पोरेट टॅक्स 21 ते 28 टक्के वाढवण्याच्या तयारीत आहेत.
  2.  यु एस 10 इयर बॉंड़  अजूनही 1.59 एवढा आहे तो अजूनही चिंतेचे कारण बनू शकते.
  3.  वीक्स ( VIX)  20.4 एवढा आहे.
  4.  पी ई ( PE) 32.84 एवढा आहे.
  5.  सी पी आय ( CPI ) मार्च साठी चा 5.52 आहे. आयआयपी  (IIP) फेब्रुवारी साठी -3.6. 
  6. भारतीय मार्केट गेले 1 वर्ष बुलिश आहे. त्यामूळे थोडे ही नेगेटिव बाब मोठया प्रॉफीट बूकिंग ला आमंत्रण असु शकते. मार्केट ओवर व्हॅल्यू आहे.
  7. विकली पीसीआर (PCR) 1.03 आहे. तर मंथली पी सी आर 1.35 एवढा आहे.
  8. या वीक साठी सर्वात महत्त्वाचे आणि चिंताजनक बाब म्हणजे वेगाने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आहे. शनिवारचे आकडे पाहता प्रतिदिन अडीच लाखा पर्यंत रुग्णसंख्या पोहोचलेली आहे. आणि अजूनही पश्चिम बंगालचे इलेक्शन संपल्यानंतर ती रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. काही राज्यांमध्ये निर्बंध  लाधले आहेत तर काही राज्य निर्बंधाच्या तयारीत आहेत.
  9. कमोडिटी मार्केटमध्ये क्रुड ऑईल चे भाव $67 च्या जवळ पोहोचले आहेत.
  10. टेक्निकल चार्ट पाहता निफ्टी जास्तीत जास्त 2.5% वरती जाऊ शकते तर साडेचार टक्के पर्यंत खाली येऊ शकते म्हणजेच अप आणि डाऊन रेशो 1.7 एवढा आहे. याचा अर्थ अप साईड पेक्षा डाउन साईड जास्त आहे.
  11. एफ आय आय ( FII) ने एप्रिल मध्ये आत्तापर्यंत 3250 करोडची विक्री केलेली आहे. आणि ते अजून विक्री करणे चे संकेत आहेत.

१९-२३ एप्रिल मार्केट दिशा:  

     मार्केट विषयी च्या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक संकेत पडताळून पाहिले असता, मार्केट कोरोणाच्या सावटाखाली कामकाज करत आहे. हे लक्षात येईल ग्लोबल मार्केट जरी बुलिश असले तरी भारतीय मार्केटची अपसाईड खूप थोडी आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भारतात वाढत असलेले कोरोनाची रुग्णसंख्या परंतु आत्ता जी रुग्णसंख्या आहे त्याला मार्केटने पचवले आहे असे चिन्ह दिसत आहे. परंतु रुग्ण संख्या कमी होत नाही तोपर्यंत मार्केट खूप वरती जाण्याची शक्यता नाही. आणि रुग्ण संख्या आहे त्यापेक्षा जास्त वेगाने वाढल्या नाहीतर मार्केट जास्त खाली जाण्याची शक्यताही नाही. मार्केटला वरती जाण्यापासून कोरोना तर खाली जाण्यापासून ग्लोबल मार्केट रोखत आहे. तसेच या कोरोनाच्या सावटा मध्येही एफ आय आय  FII म्हणावे तशी विक्री करत नाहीत. त्यामुळे या विक साठीचे अंदाज हा काहीसा साईड वेज ते बेरिश  असाच असेल. त्यामुळे या आठवड्यात ट्रेडिंग करताना वरती गेल्या नंतर विक्री तर खाली आल्यावर खरेदी हा दृष्टिकोन असू द्यावा.

मार्केटचा या आठवड्याचा VIEW SIDEWAYS TO BEARISH  आहे

निफ्टी 19 ते 23 एप्रिल अंदाज:

  • पी सी आर ( PCR ) 1.03 आहे.
  •  निफ्टी चा पी ई ( PE)  32.84 एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे.
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 15000 च्या कॉल (CE) वर 26,81,550 एवढा आहे. तर 14,500  च्या पुट (PE) वर 19,20,375 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 14000 च्या पुट  वर 22,75,425 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • निफ्टी ने या वीक मध्ये बुलिश  हरामी कँडलस्टिक पॅटर्न बनवला होता. कँडलस्टिक पॅटर्न समजुन घ्या
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट वरून 15000 रेजिस्टंस लेवल, तर 14000 आणि 14,500 ही सपोर्ट लेवल दिसून येत आहे.
  • निफ्टीचा बंद भाव 14618 आहे, तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव 14645 एवढा आहे म्हणजेच 27 पॉइंट चा प्रीमियम आहे.
  •  अप साईड लेवल: निफ्टी तिचा बंद भाव 14618 यापासून जर भरती जाण्याला सुरुवात केली तर पहिला रेजिस्टन्स 14750 आहे. याच्या वरती जाऊन जर एक दिवसाचा क्लोजिंग आलं तर 15030 ही लेवल येऊ शकते हा दुसरा रेजिस्टन्स आहे.
  • डाऊन साईड लेवल निफ्टी तिच्या बंद भावापासून खाली जायला सुरुवात झाली तर पहिला सपोर्ट 14450 हा आहे हीच आपली पहिली  लेवल असेल, या खाली जर 1तासाचे कॅण्डल बंद झाली तर 14240 हा मागच्या आठवड्याचा लो( low) महत्त्वाचा सपोर्ट असू शकतो. हीच आपली दुसरी लेवल आणि आठवड्याचे टारगेट असेल. कोरोना च्या केसेस जास्तच वाढल्य तर 1450/125 ही लेवल येऊ शकते.
  • Nifty 50     R1 – 14750  R2 15030

                        S1- 14450/75  S2 – 14240   S3- 14050/125

बँक निफ्टी 19 ते 23 एप्रिल अंदाज:

  • बँक निफ्टी पीसीआर या वीक साठी 0.87 आहे तर मंथली पीसीआर हा 0.98 एवढा आहे
  • बँक निफ्टी चा बंदभाव 31977 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 32023 एवढा आहे म्हणजेच प्रीमियम 46 पॉईंट चा आहे.
  • ओपन इंटरेस्ट चा विचार करता मध्ये आठवड्यासाठी 32500  कॉल वरती 570375  तर 33500 कॉल वर 729450 आणि 31000 च्या पुट वर 650850 आहे.
  • बँक निफ्टी अपसाईड लेवल बंद भाव 31977 पासून वरती जायला सुरुवात केली तर पहिला रेजिस्टन्स 32300 हा आहे हीच आपली पहिली लेवल असेल यावरत जर एक तासाची टेंडर बंद झाली तर 33000 हा दुसरा रेजिस्टन्स आहे हीच आपली दुसरी लेवल असेल आणि या आठवड्यासाठी चे अपसाईड टार्गेटही.
  • बँक निफ्टी डाऊन साइड लेवल बंद भावापासून बँक निफ्टी खाली जायला सुरुवात झाली 31450/400 हा पहिला सपोर्ट आणि लेवल असेल. या खाली जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर तर 30700 हा दुसरा सपोर्ट आणि आठवड्याचे टार्गेट असेल. कोविड च्या केसेस वाढल्या तर 29800 ही लेवल हि दिसू शकते.
  • Banknifty  31977 : R1 32300    R2 33000/100

                            S1- 31400/450     S2- 30700   S3-29800

निफ्टी फायनान्स सर्वीस 19 ते 23 एप्रिल अंदाज:

  Nifty fin service 15362: 
         R1 – 15750     R2 16000/100

        S1 – 15125    S2- 14800/850 (WT)   S3 – 14450/500

महत्त्वाच्या बाबी:

        सध्याची कोरोना ची परिस्थिती पाहता अपसाईड लिमिटेड झालेली आहे. त्यामुळे मार्केट  वरती आल्यावर विक्री आणि मार्केट खाली आल्यावर खरेदी याप्रमाणे ट्रेडिंग करावे. ज्यांना हे करणे जमत नसेल त्यांनी आपली कॉन्टिटी कमी करून ट्रेडिंग करावे, किंवा इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करणे टाळून, स्टॉक मध्ये गुंतवणुकीचे विचार करावा. या आठवड्यासाठी चा अंदाज हा sideways to bearish असा आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या लेव्हल येत असतील, किंवा काही बदल झाले तर टेलिग्राम चैनल ला अपडेट केले जाईल.

DISCLAIMER :  वरील सर्व एनालिसिस दिसणार्‍या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. 

आपुलकीचा सल्ला :  कोरोना ची परिस्थिती गंभीर होत आहे तरी सर्वांनी काळजी घ्या. कोरोना परिस्थितीमुळे आम्ही गावी असल्याकारणाने मोबाईल वरती हे आर्टिकल लिहीत आहे. काही चूक आढळल्यास कमेंट मध्ये मेन्शन करा सुधारण्याचा प्रयत्न करेेन.

1 thought on “Stock market weekly prediction 19-23april | स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन १९ -२३ एप्रिल २०२१”

  1. आज सर्व लेख वाचले… मराठी भाषा….. स्तुत्य उपक्रम….. Weekly seriese level best….

    Reply

Leave a Comment