शेअर बाजार समजून घेण्यासाठी मुख्य दोन गोष्टीचा अभ्यास करणे आणि त्याचा योग्य वापर करणे खूप महत्वाचे आहे. बाजारात टिकून राहायचे असेल आणि त्याच बरोबर नफा कमवायचा असेल तर हे तुम्हाला आत्मसात करावेच लागेल.
WHAT IS TECHNICAL ANALYSIS ? | तांत्रिक विश्लेषण म्हणजे काय ?
तांत्रिक विश्लेषण म्हणजे बाजारातील भूतकाळातील माहिती , प्रामुख्याने किंमत आणि व्हॉल्युम ( VOLUME ) यांच्या अभ्यासानुसार वर्तमान आणि भविष्यातील किमतीच्या चढ – उताराचे पूर्वानुमान करण्यासाठीची एक विश्लेषण पद्धत. यामध्ये मार्केटने किंवा एखाद्या विशिष्ट स्टॉक / शेअर ने भूतकाळात कसे वर्तन केले यावरून आत्ताच्या परिस्थिती मधे किंवा येणाऱ्या भविष्यात ते कश्याप्रकारे वाटचाल करू शकतात याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून छोटया किंवा दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करू शकता. तांत्रिक विश्लेषण हे शेअर च्या किमतीवर काम करते ना की मूलभूत विश्लेषणा सारखे कंपनीच्या अंतर्गत मूल्यावर त्यामुळे यामधे शेअर ची चाल लवकर लक्षात येते.
HOW TECHNICAL ANALYSIS WORK ? | तांत्रिक विश्लेषण कसे कार्य करते ?
तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मार्केट किंवा एखाद्या शेअरचे चित्र जवळ जवळ स्पष्ट होते, ज्यानुसार शेअर वरती जाईल म्हणजे अपट्रेन्ड की खाली पडेल म्हणजे डाउन ट्रेंड असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या अभ्यासाने अपट्रेन्ड ( UPTREND ) मधे कुठे RESISTANCE आहे, तर DOWNTREND मधे कुठे SUPPORT हे समजते. या विश्लेषणामध्ये चार्ट वर जर कॅण्डलची स्थिती बदलली तर ट्रेंड मधेही बदल होतो. तांत्रिक विश्लेषण समजण्यासाठी चार्ट समजणे खूप महत्वाचे आहे.
चार्ट मुख्यतः तीन प्रकारचे असतात
- LINE CHART – लाईन चार्ट
- BAR CHART – बार चार्ट
- CANDLESTICK CHART – कॅन्डलेस्टीक चार्ट
LINE CHART –
यामधे प्रत्येक दिवसाचा फक्त बंद भाव दर्शविला जातो बाकी काही माहिती यामधे अंतर्भूत नसते जस की दिवसाचा सुरु भाव ( OPEN ), सर्वोच्च भाव ( HIGH ) , निच्चांकी भाव ( LOW ) यांचा समावेश नसतो . या चार्ट चा वापर कमी प्रमाणात केला जातो, ट्रेडर्स मधे या प्रकारचा चार्ट जास्त विश्वसनीय मानला जात नाही.
BAR चार्ट –
हा दिसायला सरळ दांड्यासारखा असतो , लाईन चार्ट पेक्षा यामधे जास्त माहिती अंतर्भूत असते त्यामुळे हा प्रकार जास्त विश्वसनीय मनाला जातो. यामधे प्रत्येक दिवसाचा सुरु भाव ( OPEN ) ,
बंद भाव ( CLOSE ) , सर्वोच्च भाव ( HIGH ) , निच्चांकी भाव ( LOW ) यांचा समावेश समावेश असतो. बऱ्याच ट्रेडर्स कडून विश्लेषणासाठी या चार्टचा वापर केला जातो.
CANDLESTICK चार्ट –
हा सर्वात जास्त वापरला जाणारा चार्ट पॅटर्न आहे , यामधे प्रत्येक दिवसाचा
सुरु भाव ( OPEN ) , बंद भाव ( CLOSE ) , सर्वोच्च भाव ( HIGH ) , निच्चांकी भाव ( LOW ) यांचा समावेश समावेश असतो. बरेचसे ट्रेडर्स किंवा मार्केटचे अभ्यास करणारे तांत्रिक विश्लेषण या चार्ट पॅटर्न वरच अभ्यासतात
तांत्रिक विश्लेषणाचा आधार मागणी आणि पुरवठा हा आहे. जर मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल तर त्या शेअर चा भाव वाढत जातो म्हणजे तो UPTREND मधे आहे. याउलट जर पुरवठा जास्त आणि मागणी कमी अश्यावेळेस शेअरचा भाव कमी होत जातो म्हणजे तो DOWNTREND मधे असतो. आणि जर पुरवठा आणि मागणी जवळ जवळ सारखे असतील तर शेअर एका विशिष्ट किमतीच्या मधे व्यवहार करतो याला SIDEWAYS TREND असे समजले जाते.
TYPES OF TECHNICAL ANALYSIS | तांत्रिक विश्लेषणाचे प्रकार
- CANDLESTICK PATTERN कॅण्डलस्टीक पॅटर्न
- CHART PATTERN – चार्ट पॅटर्न
- TECHNICAL INDICATORS – तांत्रिक इंडिकेटर्स
जपानी व्यापारी मोनेहीसा हुमा यांनी प्रथम हा पॅटर्न मांडला ज्यानुसार किमती ह्या मनमानी प्रकारे वाढत किंवा कमी होत नाहीत तर त्यामध्ये एक पॅटर्न असतो. त्यांनी दोन प्रकारच्या कॅण्डल शोधून काढल्या
- BULLISH CANDLESTICK – यामधे बंदचा भाव (CLOSE ) हा सुरु ( OPEN ) भावापेक्षा जास्त असतो. ही कॅण्डल तेजीचे संकेत देते.
- BEARISH CANDLESTICK – यामधे बंदचा भाव हा सुरु भावापेक्षा कमी असतो, या प्रकारची कॅण्डल ही मंदीचा संकेत देत असते.
सुरवातीला कॅण्डल ह्या काळा आणि सफेद या दोन रंगाच्या होत्या ज्यांचा रंग बुद्धिबळाच्या सोंगट्याच्या रंगावरून प्रेरित झालेला होता. यामध्ये सफेद ही तेजीची तर काळी कॅण्डल ही मंदीची दर्शक होती. सध्या जगभरामध्ये तेजीच्या कॅण्डल साठी हिरवा तर मंदीच्या कॅण्डल साठी लाल रंग वापरला जातो
काही कॅन्डलस्टिक पॅटर्न ची नावे
चार्ट पॅटर्न हा कॅन्डलेस्टीक पॅटर्न आणि अन्य कॅण्डल च्या समूहाने बनतो . वरती जाणारा कॅण्डल चा समूह हा UPTREND तर खाली जाणारा समूह हा DOWNTREND दर्शवितो. चार्ट पॅटर्न साठी वेळेची सिमा नसते तो एक दिवस , एक महिना किंवा एक वर्षातही बनू शकतो. यानुसार गुंतवणूकदाराला शेअर चा भाव कोणत्या दिशेने जाणार आहे याचे संकेत मिळतात आणि त्यानुसार शेअर खरेदी करायचा कि विक्री करायचा याचा निर्णय घेता येणं सोप्प होते. पॅटर्न पूर्ण झाल्यावर भाव वाढतो किंवा कमी होतो.
चार्ट पॅटर्न चे २ प्रकार आहेत
- REVERSAL चार्ट पॅटर्न –
या प्रकारच्या चार्ट पॅटर्न मध्ये तेजी किंवा मंदी मधे आता ती चाल आपली दिशा बदलून विरुद्ध दिशेने वाटचाल सुरु होणार असल्याचे संकेत मिळतात. जसे की तेजी मध्ये जर BEARISH रिव्हर्सल पॅटर्न बनला तर आता तेजी संपून मंदी सुरु होणार असा संकेत मिळतो अश्याच प्रकारे मंदीत ही बुलिश रिव्हर्सल बनू शकतो. यामध्ये एक गोष्ट आहे लक्षात घेतली पाहिजे कि असे रिव्हर्सल पॅटर्न मिळाले की लगेच त्यामध्ये उडी ना घेता बाकीचे टेकनिकल इंडिकेटर्स पण त्याबरोबर मेळ घालून पाहावा उदा RSI, VOLLUME , MACD . यामध्ये शक्यतो भूतकाळातील पॅटर्न पुन्हा पाहायला मिळतो.
काही रिव्हर्सल पॅटर्नची नावे
२. CONTINUATION चार्ट पॅटर्न –
यामध्ये शेअर किंवा मार्केट ची वाटचाल ज्या दिशेने चालू आहे त्याच दिशेने ती चालू राहण्याचे संकेत मिळतात म्हणजे जर एखादा शेअर अपट्रेन्ड मधे असेल तर तो अजूनही वरची लेव्हल गाठू शकतो . आणि जर तो मंदीत असेल तर तो अजूनही गडगडण्याची शक्यता आहे.
काही कॉन्टीनुएशन पॅटर्नची नावे
टेकनिकल इंडिकेटर्स हे कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न मध्ये जास्तीची अचूकता आणण्यासाठी वापरले जातात. हा तांत्रिक विश्लेषणाचा खूप महत्वाचा भाग आहे. इंडिकेटर्स सर्व वेळ सर्व ठिकाणी काम करत नाहीत त्यामुळे स्वतःच्या अभ्यासाने कोणत्या परिस्थितीमधे कोणता इंडिकेटर काम करेल हे आत्मसात करावे लागेल . यासाठी तुम्हाला तांत्रिक विश्लेषणा मधे पारंगत व्हावे लागेल त्यासाठी गरज आहे सर्व काही समजून अभ्यासण्याची
इंडिकेटर्स चे २ प्रकार आहेत
- LEADING इंडिकेटर्स – कमी अवधीच्या ट्रेडिंग साठी उत्तम संकेत देते , खरेदी आणि विक्री दोन्ही बाजूचे संकेत असतात. यामधे जोखीम हि जास्त असते OVER BOUGHT , OVER SOLD , RSI , OSCILLATOR हे काही LEADING इंडिकेटर्स आहेत.
- LEGGING इंडिकेटर्स – ट्रेंड नुसार चालणारे इंडिकेटर्स असतात, हे दीर्घ कालावधी साठी उपयुक्त असलेले सपोर्ट आणि रेसिस्टन्स कुठे आहे ते दर्शवितात. एकसमान वाढणाऱ्या किंवा पडणाऱ्या मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात. MOVING AVERAGE , MACD हे काही लेगिंग इंडिकेटर्स आहेत .
या तीन प्रकारे TECHNICAL ANALYSIS केले जाऊ शकते पण यामध्ये कोणता हि एक प्रकार खूप महत्वाचा आणि इतर कमी महत्वाचे असे नाही . मार्केट मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तिन्ही प्रकारचा अभ्यास करावा लागेल आणि त्यांची योग्य सांगड घालणे पण आत्मसात करून घ्यावे लागेल. हे सर्व प्रकार आपण एक एक करून समजून घेणार आहोत
तांत्रिक विश्लेषणाचे महत्व –
शेअर किंवा मार्केटची चाल समजून घेण्यासाठी अगोदर चार्ट समजने गरजेचे आहे. या गोष्टींचा अभ्यास ना करता जर गुंतवणूक केली तर तुम्ही तुमचे भांडवल गमावून बसाल. पण जर तांत्रिक विश्लेषण समजून घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक केली तर तुम्ही तुमचे नुकसान कमीत कमी करून ज्यासाठी मार्केट मध्ये आलात तो नफा वाढवू शकता. यासर्वांबरोबर तुम्हाला स्टोपलॉस सुद्धा कळणे महत्वाचे आहे .
आपुलकीचा सल्ला :- आपण अभ्यासण्यासाठी दिलेला POWERGRID ने २० % पेक्षा जास्त परतावा दिलेला आहे . तसेच यावेळेस TV TODAY BUY @२५५ स्टॉपलॉस २३८ याचे तुम्ही TECHNICAL ANALYSIS करू शकता अधिक माहितीसाठी
TELEGRAM CHANNEL जॉईन करा.
मार्केट मधील रोजच्या उपडेट साठी तुम्ही आपले MAJHEMARKET YOUTUBE CHANNEL ला भेट देऊ शकता
सर candal stick ची जरा विस्तृतपणे माहिती पुढच्या लेखामध्ये दिली तर बरं होईल
अप्रतिम माहिती सर
yes sir