About

आम्ही  फिरीस्ते आहोत भटकत राहणे हाच आमुचा पिंड मग ते रानावनात असो की नवनवीन विषयात असो. अशीच मुसाफीरी करताना ओळख झाली शेअरबाजाराशी आणि लक्षात आले . मराठी माणुस हे ही करु शकतो पण मराठी भाषेमध्ये माहिती खूपच कमी…… म्हणूनच हा सर्व खटाटोप…

हे का ?

   एक दिवस अशीच गप्पांची मैफिल रंगली असताना एक जण मात्र स्वतःच्याच विचारात गुरफटलेला दिसत होता. चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, मागील काही दिवसात हे नित्याचे झाले होते. आज खरं कारण काय ते समजून घ्यायचं म्हणून बाकीचे सर्व गेल्यावर त्याला खोदून खोदून विचारले तेव्हा कुठे त्याचा भावनांचा बांध फुटला. आणि ऐकून आम्हालाही धक्का बसला… आमच्या मित्राने शेअर बाजारांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान करून घेतले होते. खूप वेळ चर्चेनंतर याचे एक कारण आमच्या लक्षात आले ते म्हणजे पूर्ण अभ्यासाशिवाय मार्केटमध्ये काम करणे होय आणि हे त्याने असे का केले यावरून आम्हाला वास्तवाची जाणीव झाली. ते म्हणजे शेअर मार्केट विषयी आपल्या मायबोली मध्ये असलेला माहितीचा अभाव ! इंग्रजी किंवा हिंदी मध्ये बऱ्यापैकी माहिती उपलब्ध आहे. परंतु मराठी माणसाला या ठिकाणी भाषेची अडचण निर्माण होते. आता मित्राचे झालेले नुकसान तर आम्ही भरून देऊ शकत नव्हतो परंतु पुढे कोणाबरोबर असे होऊ नये म्हणून मार्केट विषयाची माहिती मराठी मधून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही तिघांनी घेतला. 

            आम्ही शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे शेतकर्‍यांच्या घरातील नवीन पिढीला याचा फायदा कसा होईल या दृष्टीनेच शक्यतो आमचे लिखाण असण्याचा प्रयत्न करत आहोत. 

आम्ही कोण:

अमोल :

            शैक्षणिक पात्रता इंजीनियरिंग आता हे इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही सर्व क्षेत्रात काम करू शकता याच लायसन्स आहे !!!!  नोकरी करणे हा सर्वसामान्य मराठी माणसाचा गुणधर्मच नाही हे पहिल्यापासून मनात असल्यामुळे नोकरी करण्याचे प्रसंग आले नाही.  इंजिनिअरिंग नंतर तब्बल  सहा महिने नोकरी केली. हाच काय तो प्रचंड नोकरीचा  अनुभव. नंतर पूर्णवेळ मार्केटमध्ये काम करायला सुरुवात केली.

        गेली दहा वर्ष मार्केट मध्ये काम करत आहोत. मार्केटचे चढ-उतार नफा नुकसान स्वतः अनुभवलेले आहेत. या क्षेत्रातील काही अनुभवी लोकांकडून मार्केटमधील बारकावे समजून घेणे ही या काळात चालू होते आणि ते अजूनही चालूच आहे. स्विंग ट्रेडिंग हा सर्वात आवडता ट्रेडिंग प्रकार त्याचबरोबर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करणे.

 या ठिकाणाची लेखनाची जबाबदारी जवळजवळ माझ्यावरच आहे. त्यामुळे यामध्ये काही चुका होत असतील तर त्या सर्वास मी पामर जबाबदार आहे.

अनिल : 

     डिप्लोमा करून एका प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करून पाया मजबूत करणे यावर विश्वास असलेले व्यक्तिमत्व.  फायनान्शिअल प्लॅनिंग यामध्ये अतिशय काटेकोर नियोजन त्यामुळे मार्केट विषयी सकारात्मक असले तरी कमाईचे इतरही मार्ग असावे हे ठाम मत.

 आमच्यामध्ये मार्केट विषय सर्वात अनुभवी आणि हुशार. मार्केटमधील आमच्या बेसिक पासून तर इथपर्यंतचा प्रवासात सतत आम्हाला मार्गदर्शन, एक प्रकारे मार्केटमध्ये हेच गुरु आहेत. फंडामेंटल अनालिसिस वर विश्वास आणि हातखंडा. इथे लिहिले जाणारे सर्व लेखांची रूपरेखा यांच्या नजरेतून तयार झालेली आहे चार्ट रिडींग यामधील बारकावे आणि प्राईज ऐक्शन  या विषयी सखोल ज्ञान. 

   या ब्लॉग मधील सर्व माहितीच्या केंद्रस्थानी असणारे आणि नवीन होणारे बदल लक्षात आणून त्याविषयीची माहिती मिळविण्यास अग्रेसर.

शिवाजी :

         शिक्षणाने शिक्षक ,  स्पर्धा परीक्षेची तयारी …. आमच्यापैकी मार्केटमध्ये सर्वात नवीन भिडू.  परंतु अतिशय वेगाने सर्व माहिती मिळवून त्यामध्ये पारंगत होण्याची कला.

         या ब्लॉग मध्ये अगदी लिखाणा  पासून तर एनालिसिस पर्यंत आणि  नवीन विषयांचे ओळख पासून तर मार्केटिंग पर्यंत सर्व विषयात वावर. नवीन येणाऱ्या ट्रेडर्स साठी कोणते विषय मांडले पाहिजे यामध्ये नेहमी आग्रही भूमिका. ब्लॉगमध्ये होणारे नवनवीन बदल यांच्या डोक्याची कुरापत असते बर का!!