HISTORICAL BULL RUN | सेन्सेक्स ५० हजारावर

                             सेन्सेक्स ने आज ऐतिहासिक ५०००० चा टप्पा गाठला तर निफ्टी आणि बँक निफ्टी हि अनुक्रमे १४७५० आणि ३२८०० या सर्वोच्च स्तरावर विराजमान होत या HISTORICAL BULL RUN मधे सहभागी झाले.  गेले काही महिने उधळणारा बैल आजूनही सुसाटच धावत आहे. त्याची वेसणच जणू कोणी काढून त्याला मोकाट होण्याची मुभाच दिली कि काय अशी आज मार्केटची स्थिती आहे. काही नवीन विक्रम नाही असा दिवस क्वचितच मार्केट मधे येत आहे. FII या बैलाला अगदी पौष्टिक खाद्य पुरवत असल्या कारणाने त्याचा वेग धडकी भरवणारा आहे. अस्वलाची निद्रा हि चिरनिद्रा बनते कि काय अशी शंका यायला वाव आहे इतपत मंदी करणारे धास्तावले आहेत. 

RETURNS  IN SENSEX & NIFTY :- शेअर मार्केट मधील परतावा 

            FEB २००६ मधे सेन्सेक्स ने १०००० चा टप्पा गाठला तिथपासून ते आज २१ JAN २०२१ ला सेन्सेक्स ५०००० आहे म्हणजे तब्बल ५०० %  परतावा आणि ते पण फक्त १५ वर्षात, तुम्ही याची तुलना इतर गुंतवणुकीशी करून पाहू शकता. यामधील काळात बरेच चढ उतार पाहणारे मार्केट आज शिखरावर उभे आहे. OCT २००७ मधे २०००० , MAR २०१५ – ३०००० आणि MAY २०१९ – ४०००० अशा पद्धतीने सेन्सेक्सने हा HISTORICAL BULL RUN कायम ठेवला आहे.  या बरोबरीनेच २००६ मधे ३००० असणारी निफ्टी हि आज १५००० कवेत घेऊ पाहत आहे  या सर्व घडामोडी मध्ये गुंतवणूकदारांना फायदाच झाला आहे पण झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापायी आलेल्या ट्रेडर्स ना आपली झोळी रिकामी झालेली पाहावी लागली आहे. 

तुम्ही सतर्क अहात का ??? 

             काही दिवसापूर्वी एक बातमी शेअर मार्केटशी संबंधित सर्वाना धक्का देऊन गेली. खरं तर मार्केटच्या जाणकारांना याबाबतचा अंदाज लावणे सहज शक्य होत आणि तसा तो असेलही. एका प्रस्थापित TV CHANNEL वर काही स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला जात होता. नवं ट्रेडर्स कसलीही शहनिशा ना करता ते STOCKS खरेदी हि करत होते. पण या भाबड्या ट्रेडर्सना याची कल्पना नव्हती कि जे स्टॉक तो निवेदक खरेदी करा म्हणून भरीस घालत आहे ते तो अगोदरच पत्नी व आईच्या नावे खरेदी करून बसला आहे. आता जशी  नवं उत्साहित लोकांनी खरेदीला सुरवात केल्यामुळे तयार VOLLUME  मधे ते निवेदक महाशय आपले स्टॉक विकून मोकळे झाले. आणि झटपट पैसे या स्वप्नात मग्न असलेले कधी मार्केटला जुगाराचं नाव देत कंगाल झाले कळलंच नाही,  SEBI  ने त्या महाशयांवर बंदी घातली पण आता झालेले नुकसान थोडाच भरून येणार आहे आणि सल्ले देणारे का कमी आहेत या देशात ? बरं कष्टाशिवाय फळ चाखण्याची इच्छा तर सर्वानाच आहे त्यामुळे हे पुन्हा पुन्हा घडत राहणार … तुम्ही घेताय का कोणाचा फुकटचा सल्ला ? की करताय अभ्यास मार्केट समजून घेण्यासाठी 

IPO या महिन्यात :- IPO IN HISTORICAL BULL RUN :-

IRFC  हा यावर्षातील पहिला IPO यामध्ये LISTING GAIN तसेच जास्त कालावधी साठी गुंतवणूक करू शकता. हा IPO  १८ ते २० JAN पर्यंत खुला होता 


INDIGO PAINTS  हा IPO २० – २२ JAN   पर्यंत खुला आहे आणि १४८८ – १४९० या किमतीवर 10 LOT SIZE वर  आवेदन करू शकता. इथे हि LISTING GAIN किंवा गुंतवणूंक करू शकता. 

SOURCE  : GROWM 

HOME FIRST FINANCE  २१ -२५ JAN  पर्यंत खुला आहे तर ५१७ – ५१८ ही किंमत मर्यादा तर LOT SIZE २८ आहे. लिस्टिंग गेन साठी यामधें  गुंतवणूक करू शकता. 

IPO, SEBI  विषयी जाणून घ्या SHARE MARKET IN MARATHI

आणि हो IPO विषयी सल्ला नाही तर माहिती आहे तुम्ही अभ्यासपूर्ण निर्णय घेताल या आपेक्षेसह !!!!

1 thought on “HISTORICAL BULL RUN | सेन्सेक्स ५० हजारावर”

Leave a Comment