Market Weekly prediction 12 – 16 apr 2021 | मार्केट विकली प्रेडिकशन १२ -१६ एप्रिल २०२१

Market Weekly Prediction 12 – 16 APRIL 2021 |  मार्केट विकली प्रेडिकशन १२ -१६ एप्रिल २०२१

5 एप्रिल ते 9 एप्रिल मार्केटचा आढावा :

                      या वीक साठीचा आपला अंदाज हा बुलिश  होता.  परंतु हा अंदाज चुकीचा ठरलेला आहे कोरोनाच्या रुग्णसंख्ये  मध्ये झालेल्या वाढीमुळे मार्केट वरती गेले नाही.  यु एस १० इयर बॉण्ड यील्ड  काही प्रमाणात कमी होऊन  आणि ग्लोबल मार्केट पॉझिटिव असूनही आपले मार्केट वरती गेले नाही.  परंतु त्या अंदाजामध्ये टेक्निकल एनालिसिस वर  दिलेल्या लेवल बरोबर आलेल्या आहेत.  मार्केट जरी 14400 टच केले असले तरी 14600 या सपोर्ट लेवलच्या  खाली बंद झाले नाही. मार्केट / निफ्टी ने  एका रेंज मध्ये काम केले, याबद्दल आपण अगोदरच सूचित केलेले होते. वरती ही 14950 च्या वरती क्लोजिंग दिले नाही.  म्हणून सर्व विचार करता मार्केटचे कामकाज अगदीच आपल्या विरुद्ध गेले नसेल तरीपण ५ ते ९ एप्रिल या आठवड्यासाठी चा मार्केटचा बुलिश असलेला अंदाज  चुकलेला आहे. परंतु वेळोवेळी होणारे बदल आपण टेलेग्राम चॅनेल वरती अपडेट करत होतो. तुम्ही तिथे नसाल तर भेट देऊ शकता.

 

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत: 

  1.  यु एस फेडची ( U.S FED ) झालेली बैठक त्यामध्ये व्याज  संदर्भात घेतलेले निर्णय. 
  2. आरबीआय  (RBI ) मॉनेटरी  पॉलिसीची झालेली बैठक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने झालेले निर्णय ज्यामध्ये सी पी आय ( CPI ) ४ टक्के ठेवण्याचा झालेला निर्णय. 
  3. यु एस चा $2.25 ट्रिलियन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन सादर झालेला आहे.  त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होण्याबरोबरच मार्केटमध्ये पैसा येईल. 
  4.  कोरोना व्हॅक्सिनेशन अतिशय जोरदारपणे चालू आहे, त्याने कोरोना वरती मात करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
  5. निफ्टी च्या फ्युचर इंडेक्स मध्ये 54 अंकांचे प्रीमियम आहे, म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह असण्याचा हा एक संकेत आहे. 
  6.  डॉलर इंडेक्स मागच्या महिन्यापेक्षा कमी होऊन 92.18 वरती आलेला आहे.
  7.  कमोडीटी मार्केटमध्ये क्रुड ऑईल चे भाव $67-68 डॉलर पर्यंत गेलेले होते, तिथून ते कमी होऊन $59.32 प्रती बॅरल वरती आलेले आहेत. हा एक वाढत्या इंधन किमतीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा घटक ठरू शकतो. 
  8. जवळ जवळ सर्व ग्लोबल  आणि अशियन मार्केट हे तेजी मध्ये असण्याचे संकेत देत आहेत.  डाऊ ( DOW JONES ) आणि काही युरोपियन मार्केट हे त्यांच्या सर्वोच्च भावाच्या जवळ ट्रेड करत आहेत.
  9.  डीआयआय | DII  म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टट्यूशनल इन्वेस्टर । DOMESTIC INSTITUTIONAL INVESTOR  करत असलेली खरेदी आणि त्यांना अजून खरेदी करण्याची असलेली गरज या महिन्यात डीआयआय ने  857 करोडची खरेदी केलेली आहे आणि ते अजून खरेदी करण्याची शक्यता आहे. 

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत

  1. युएस 10 इयर बॉण्ड वरच्या स्तरावरून काही कमी झाला असला तरीही तो अजून 1.66  आहे हे भारतीय मार्केट साठी थोडी काळजी करण्याचे स्थिती आहे. 
  2. इंडिया विक्स । VIX  मागच्या आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात कमी होऊन 19.72 झालेला आहे. 
  3. मार्केटचा पी ई 33.3 आहे, पण अजून कमी होऊन 28 ते 30 च्या दरम्यान आला तर खरेदीसाठी एक चांगली संधी निर्माण होऊ शकते.  म्हणजेच आत्ताच्या स्थितीत पासून  तो अजून चार ते पाच अंकाने घसरण्याची शक्यता आहे. 
  4. पी सी आर । PCR  या आठवड्यासाठी 0.86 इतका आहे,  तर महिन्याचा पीसीआर हा 1.61 आहे.
  5.  टेक्निकल चार्ट वर अभ्यासता निफ्टीचा बंद भाव 14835 वरून जास्त अप साईड 1.11 टक्के तर डाऊन साईड 5.63% दिसते आहे.  म्हणजेच डाऊन साईड सपोर्ट WEAK आहे. 
  6. आपण पाठीमागच्या लेखांमध्ये रिलायन्स खूप दिवस एका रेंज मध्ये असल्याची सांगितले होते आणि रिलायन्स मध्ये ब्रेकआऊट  येण्याची शक्यता वर्तवली होती.  परंतु रिलायन्स रेजिस्टन्स ब्रेक करण्यात अपयशी ठरत आहे आणि त्यातच कोर्ट चा निकाल रिलायन्सच्या विरोधात गेलेला त्यामुळे रिलायन्स मध्ये पडझड होऊ शकते. आणि मार्केट वर याचाही परिणाम दिसू शकतो. 
  7. एफ आय आय । FII  फॉरेन इन्स्टट्यूशनल इन्वेस्टर करत असलेली विक्री गेल्या आठवड्यात त्यांनी 2100 करोडची विक्री केली मागील काही महिन्यात मिळून त्यांनी 1,87,102 करोड ची खरेदी केली होती आता इतिहास पहाता ते कमीत कमी एक चतुर्थांश सेलिंग करतील असा अंदाज आहे.  म्हणजे अजून ते जवळजवळ 35 ते 40 हजार करोडची ची विक्री करू शकतात. हा आता ते  एकदम सर्व विक्री करणार नाही, टप्या टप्याने हि विक्री होईल. 
  8. सर्वात महत्त्वाचे आणि चिंताजनक असणारे निगेटिव्ह पॉईंट म्हणजे covid-19 चे कोरोना सुरू झाल्यापासून चे दिवसाला सापडणारी रुग्णसंख्या सर्वोच्च स्तरावर आहे.  आत्ता दिवसाला 1.5 लाख रुग्ण सापडत आहे. मागच्या वर्षीचा दिवसाचा सर्वोच्च आकडा नव्वद हजाराच्या आसपास होता त्यापेक्षा आता जवळजवळ 60 हजार रुग्ण प्रति दिवस वाढले आहे. मार्केट मधील सर्व डेटा ला झाकून टाकण्याचे काम ही रुग्णसंख्या करू शकते. महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये LOCKDOWN सदृश्य परिस्थिती आहे. आज म्हणजे 11 एप्रिल 2019 रोजी लॉकडाउन संदर्भात बैठक होऊन निर्णय येण्याची शक्यता आहे.  याचा मार्केट वरती खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट  होऊ शकतो. 
  9. कोरोना च्या इलाजा मध्ये महत्त्वाचे असलेले रेमडिसीवीर । REMDESIVIR  या औषधाचा मोठ्या प्रमाणावर असलेला तुटवडा आणि प्रसारमाध्यमांवर ती दाखवल्या जाणाऱ्या याविषयीच्या बातम्या मार्केट सेंटीमेंट वर परिणाम करू शकतात. 

                          

         १२-१६ एप्रिल मार्केट दिशा:        

                        या आठवड्यासाठी चा अंदाज मार्केट साठीचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही मुद्द्यांचा वेळ बसल्यावरती असे लक्षात येईल ग्लोबल मार्केट जरी पॉझिटिव असले, आणि या आठवड्यात ते तेजीत करण्याचे संकेत असलेले तरी भारतीय मार्केट वर कोरोना वाढीचे खूप मोठे सावट आहे दीड लाखावरती गेलेली रुग्ण सख्या अचानक खूप कमी होण्याची शक्यता जवळ जवळ नाही. किंबहुना ती अधिक वाढण्याचा धोका असल्यामुळे जरी इंडस्ट्री, उद्योग बंद ठेवले जाणार नसले तरी त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता त्याचा परिणाम भारतीय मार्केट वर  दिसू शकतो म्हणजेच या आठवड्यात सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक बाबी वरचढ आहेत मुळे मार्केटचा या आठवड्याचा VIEW BEARISH  आहे

निफ्टी 12 ते 16 एप्रिल अंदाज

  •   पी सी आर 0.86
  •  निफ्टी PE 33.3, 
  • ओपन इंटरेस्ट पहिले तर 15000 ce वर 3230550 आणि 14500 pe वर 2094450 हा या आठवड्या साठी तर महिन्यासाठी  15000 ce वर 2123100 आणि 14500 pe वर 3148050 हा ओपन इण्टरेस्ट आहे.
  •  निफ्टीचा बंद भाव आहे 14835 निफ्टी फ्युचर चा बंद भाव आहे 14889 म्हणजे 54 अंकांचा प्रीमियम आहे.
  •  डीआयआय 857करोड  खरेदी तर एफआयआय 2100 करोड ची विक्री 
  • निफ्टी जर इथून वरती जायला सुरुवात केली तर तिच्यासाठी पहिला रेजिस्टन्स असेल 15060 जर याच्या वरती एक तास किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली ( कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय ? ) .  तर  15280 ही लेवल या आठवड्यात येऊ शकते
  •  आता निफ्टीची खालच्या बाजूची वाटचाल सुरू झाली तर 14660 हे पहिली लेवल आणि जर त्याच्याखाली एक दिवस क्लोज झली. तर 14400 ही लेवल येऊ शकते. आणि त्याच्याही खाली 14125 ते 13950 हे या आठवड्याचे टारगेट असू शकतात.
  •  म्हणजेच निफ्टी मध्ये डाऊन साईड जास्त आहे लेवल जास्त लांब वाटत असले तरी कोविड ची परिस्थिती पाहता ते येण्याची शक्यता जास्त आहे. 

बँक निफ्टी 12 ते 16 एप्रिल अंदाज

  •  बँक निफ्टी चा पीसीआर या आठवड्यासाठी 0.66 आणि महिन्यासाठी 0.85 एवढा आहे.
  •  32448 हा बँक निफ्टीचा बंद भाव आहे तर बँक निफ्टी फ्युचर चा बंद भाव 32611 आहे म्हणजेच प्रीमियम 163 अंकांचा आहे. 
  • बँक निफ्टी बंद भावापासून वरती जायला सुरुवात केली तर 33100 या पहिल्या लेवल आहे. यावरती एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 33750 / 850 या भावा पर्यंत जाऊ शकते. आणि हेच या आठवड्याचे वरचे टार्गेट असू शकते. 
  •  बँक निफ्टी जर खाली जायला सुरुवात केली आणि 32100 च्या खाली एक दिवस बंद राहिले तर त्यानंतर 31000 ही लेवल येऊ शकते हे या आठवड्याचे टारगेट असेल परंतु COVID-19 ची परिस्थिती गंभीर झाली तर 29000 / 750 या लेवल पर्यंतही बँक निफ्टी जाऊ शकते. 

        

महत्त्वाच्या बाबी 

                 सध्याला कोरोना आणि त्यावरचे उपाय यांची कशा पद्धतीने सांगड घातली जाते यावरती लक्ष ठेवावे.  मार्केट वरती अचानक परिणाम करणारे हाच घटक आहे जर निफ्टी / मार्केट ने या खालच्या लेवल ला आले . तर  कोरोना ची परिस्थिती सुधारल्यानंतर मार्केट एक मोठी अपसाईड दाखवण्यासाठी तयार होईल.  त्यावेळेस त्या टारगेट बाबत अपडेट केले जाईल. 
निफ्टी आणि बँक निफ्टी बरोबरच तिसरा ज्यामध्ये ट्रेडिंग सुरुवात झाली आहे तो म्हणजे निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस । NIFTY FINANCIAL SERVICE त्याकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही आपण त्याचेही विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये फक्त लेवल देत आहोत विश्लेषण नंतर सुरू करण्यात येईल

NIFTY FIN CLOSE @ 15412  UPSIDE 15800 -16200 DOWNSIDE 15100 -14850 – 14325  

DISCLAIMER :  वरील सर्व एनालिसिस दिसणार्‍या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. 

आपुलकीचा सल्ला : मार्केट विषयी बेसिक माहिती मिळवूनच शेअर मार्केट मध्ये ट्रेड करा. काही बदल असतील तर टेलिग्राम वर अपडेट केले जाते. तुम्ही जॉईन करू शकता, मार्केटविषयी चढ उतार आणि शेअर च्या बाबतीत येणाऱ्या बातम्यांची माहिती तिथे अपडेट करत असतो. काही सूचना किंवा तक्रार असेल तर जरूर कमेंट करून सांगू शकता. 

4 thoughts on “Market Weekly prediction 12 – 16 apr 2021 | मार्केट विकली प्रेडिकशन १२ -१६ एप्रिल २०२१”

Leave a Comment