ऑप्शन ट्रेंडिंग हा डेरिव्हेटीव्ह मार्केटचा एक महत्वाचा भाग आहे.ऑप्शन हा एक प्रकारचा करार असतो ज्याला लाॅट साईज अणि एक्सपायरी देखील दिलेली असते.
ऑप्शन ट्रेंडिंग हा एक असा काॅन्ट्रॅक्ट असतो ज्याच्या दवारे आपणास कुठल्याही एका निश्चित तारखेपर्यंत निश्चित रक्कमेत आपल्या जवळील शेअर्सची खरेदी विक्री करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. अधिक माहितीसाठी आपले ऑप्शन ट्रेडिंग वरील पहिला भाग पहा .
ऑप्शन ट्रेड लाॅट म्हणजे काय ? Lot Size meaning in Marathi
लाॅट म्हणजे कुठल्याही कंपनीचे एक किंवा दोन शेअर्स विकत न घेता एकाचवेळी खुप जास्त प्रमाणात शेअर्सची खरेदी करणे यालाच लाॅट असे म्हटले जाते.
डेरिव्हीटीव्ह मार्केट मधील प्रत्येक शेअर्सची लाॅट साईज आधीपासून निर्धारित करण्यात आलेली असते.ऑप्शन मध्ये आपल्याला एक किंवा त्यापेक्षा अधिक लाॅट विकत घेता येतात.
ऑप्शन ट्रेडिंग एक्सपायरी म्हणजे काय? Expiry meaning in Marathi
एक्सपायरी म्हणजे ऑप्शन काॅन्ट्रॅक्टची समाप्ती असते.एक्सपायरी ही ती तारीख असते ज्या पर्यंत आपण घेतलेल्या शेअर्सचा लाॅट आपल्याजवळ ठेवू शकतो.
ऑप्शन ट्रेंडिंग मध्ये कंपनीच्या शेअर्सची एक्सपायरी किमान एक महिना अणि कमाल तीन महिने इतक्या कालावधीची असते.
इंडेक्सच्या लाॅटची एक्सपायरी शेअर्सच्या लाॅटच्या एक्सपायरी पेक्षा अलग असते.शेअर्सच्या लाॅटची एक्सपायरी एक महिना ते तीन महिने इतक्या कालावधीची असते.
इंडेक्सची लाॅट एक्सपायरी एक आठवडा ते तीन महिने इतक्या कालावधीची असते.ज्यात ही एक आठवडा,दोन आठवडा,तीन आठवडे,चार आठवडे,पाच आठवडे अशी एकूण तीन महिन्यांपर्यंत असलेली आपणास पाहावयास मिळते.
ऑप्शन मध्ये आपल्याला शेअर्सची पुर्ण किंमत भरण्याची आवश्यकता नसते यात आपणास फक्त प्रिमियम भरावा लागतो.
ऑप्शन मध्ये काम करत असताना सर्वप्रथम एक स्ट्राईक प्राईज निर्धारित करावी लागते.अणि ती निवडावी लागते.
प्रत्येक स्ट्राईक प्राईज करीता एक प्रिमियम निर्धारित करण्यात आलेला असतो.लाॅट साईज प्रमाणे प्रिमियम भरून आपणास आॅप्शन वर काम करता येते.
ऑप्शन ट्रेंडिंग उदाहरणादवारे समजून घेऊया-
उदा,राहुल नावाचा व्यक्ती आहे.ज्याला स्वताचा नवीन फ्लॅट विकत घ्यायचा असतो पण राहुलकडे सध्या पलॅट घेण्या इतके पैसे नसतात.पण पुढील महिन्यात त्याला त्याने केलेल्या गुंतवणुकीवर काही पैसे भेटणार आहेत.
राहुलचे बजेट २० साधारणतः लाखापर्यंत आहे.एकेदिवशी राहुलने पेपरमध्ये एक बातमी वाचली की त्याला त्याच्या बजेट मधील घर त्याला हव्या असलेल्या जागी २० लाखात मिळु शकते.
पण ही आॅफर फक्त आजच्या एका दिवसासाठी ठेवण्यात आलेली असते.उदयापासुन फ्लॅटच्या किमती वाढणार असतात.अशावेळी राहुल पलॅट एजंटला जाऊन भेटतो.अणि त्याची सर्व परिस्थिती सांगतो.
अशा वेळी एजंट राहुलला एक आॅप्शन देतो की आत्ता फक्त पाच हजार रुपये इतके टोकन अमाऊंट भरा अणि तुमची बुकिंग निश्चित करून घ्या.म्हणजे मग पुढच्या महिन्यात २० लाख भरून तुम्हाला पलॅट तुमच्या नावावर करता येईल.
अशा प्रकारे राहुलला फक्त पाच हजार रुपये भरून आपल्या बजेट मधील किंमतीत हवा तो पलॅट मिळणार असतो.
ऑप्शन मध्ये हे उदाहरण सांगायचे म्हटले तर २० लाख शेअर्सची स्ट्राईक प्राईज आहे.अणि ५ हजार रुपये हे त्यांचे प्रिमियम अमाऊंट म्हणता येईल.
यात फायदा असा आहे की पुढच्या महिन्यात जर शेअर्सची स्ट्राईक प्राईज २० लाखावरून २५ लाख करण्यात आली तर पण राहुलने आधीपासून प्रिमियम अमाऊंट भरून ठेवला असल्याने पुढच्या महिन्यात देखील त्याला ते शेअर्स २० लाख इतक्या स्ट्राईक प्राईज मध्ये प्राप्त होतील.
म्हणजे राहुलला तब्बल पाच लाख इतका नफा झाला असे दिसुन येते.पण समजा काही कारणास्तव स्ट्राईक प्राईज १९ लाखावर आली तर अशा परिस्थितीत राहुल २० लाख इतकी स्ट्राईक प्राईज भरणार नाही.
कारण राहुलने ऑप्शन वर काम करण्यासाठी फक्त पाच हजार रुपये प्रिमियम अमाऊंट भरले आहे.अणि नवीन बुकिंग करून तेच शेअर्स त्याला १९ लाखापर्यंत मिळणार आहे.
म्हणजे फक्त पाच हजार रुपये तोटा सहन करून राहुलला ९५ हजाराचा नफा प्राप्त होतो आहे.
वरील हेच उदाहरण आपण टेक्नीकल पद्धतीने समजून घेऊया –
समजा बाजारात रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत २००० हजार रुपये इतकी आहे.अणि मार्केटचा अभ्यास केल्यावर आपल्याला लक्षात येते की दोन तीन दिवसांत रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत १०० ते २०० रूपयाने वाढणार आहे.
यानंतर आपण रिलायन्स कंपनीचे २ हजार स्ट्राईक प्राईज असलेले ऑप्शन आपण निवडले.अणि समजा त्या शेअर्सचे प्रिमियम अमाऊंट १० रूपये आहे.
रिलायन्सची लाॅट साईज २५० रूपये इतकी आहे.आपण हा लाॅट विकत घेतला अणि आपल्याला हा लाॅट अडीच हजार रुपये मध्ये मिळाला.
यानंतर जेव्हाही रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत २ हजार वरून २२०० वर जाईल तेव्हा दहा रूपयाला घेतलेल्या प्रिमियमची किंमत २१० इतकी होईल.
आता आपण एका लाॅटचा फायदा बघितला तर Lot size 250*200 points म्हणजे ५० हजारापर्यतचा नफा आपणास प्राप्त होईल.
पण याचठिकाणी रिलायन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत न वाढता १९०० पर्यंत खाली आली तर आपल्याला १०० पाॅईटचे नुकसान होईल.इथे आपल्याला शंभर गुणिला अडीचशे करावे लागत नाही.
कारण इथे आपल्याला फक्त भरलेल्या प्रिमियमच्या फक्त अडीच हजाराचा तोटा होईल.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर इथे नुकसान खुप कमी आहे पण फायदा भरपुर आहे.अशा पद्धतीने खुप कमी पैशात जास्त नफा आपल्याला डेरिव्हीटिव्ह ऑप्शन मध्ये प्राप्त करता येईल.
ऑप्शन ट्रेंडिंगचे दोन प्रकार असतात
१) काॅल-
२) पुट –
कोणते ऑप्शन कधी निवडायचे?
कोणते ऑप्शन निवडल्यास कधी फायदा होईल?
वरील दोघे काॅल अणि पुट ऑप्शन आपल्याला बाय तसेच सेल करता येतात.
जेव्हा आपण काॅल ऑप्शन खरेदी करतो तेव्हा आपल्याला अशा वेळी नफा प्राप्त होईल जेव्हा मार्केट अपसाईड म्हणजे वर जाईल.
अणि जर आपण पुट ऑप्शन खरेदी केला तर आपणास तेव्हा नफा प्राप्त होईल जेव्हा मार्केट खाली येत असेल.
अणि समजा आपण सेलिंग मध्ये काॅल ऑप्शन सेल केले.तर आपल्याला तेव्हा फायदा होईल जेव्हा मार्केट खाली येईल.
सेलिंग मध्ये पुट ऑप्शन सेल केल्यावर आपल्याला तेव्हा फायदा होईल जेव्हा मार्केट वर जाईल.
नवोदितांनी पहिल्यांदा ऑप्शन ट्रेंडिंग कशी करायची? | How do beginners start option trending for the first time?
ऑप्शन ट्रेंडिंग करण्यासाठी आपल्याकडे एक डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे.म्हणुन सर्वप्रथम ऑप्शन ट्रेंडिंग करण्यासाठी आपण सर्वप्रथम UPSTOX APP जाऊन आपले डिमॅट अकाउंट ओपन करून घ्यायचे आहे.
डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर लाॅग इन करायचे आहे लाॅग इन केल्यावर आपणास एक प्रोफाईल नावाचे ऑप्शन राईट काॅर्नरला दिसुन येईल.त्यावर क्लिक करायचे आहे.
यानंतर UPSTOX मधील आपल्या बॅलन्स मध्ये पैसे जमा करायचे आहेत.यानंतरच आपणास ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करता येईल.
पैसे जमा करण्यासाठी ADD MONEY यावर क्लिक करायचे आहे.यानंतर आपल्याला आपल्या खात्यात जेवढे पैसे अॅड करायचे आहे ती रक्कम टाकुन घ्यायची आहे.
पैसे अॅड करण्यासाठी आपण युपीआय आयडीचा तसेच नेटबॅकिंग देखील वापर करू शकतो.यानंतर आपल्या वाॅलेट मध्ये पैसे अॅड झाल्यावर आपणास होम पेज वर येऊन ऑप्शन ट्रेडिंग करता येईल.
ऑप्शन ट्रेंडिंग आपण इंडेक्स मध्ये देखील करू शकतो.किंवा कुठल्याही एका विशिष्ट शेअर मध्ये देखील आपणास ऑप्शन ट्रेंडिंग करता येईल.
ऑप्शन ट्रेडिंग विषयी सविस्तर समजून घेण्यासाठी आपले त्यावरील लेख ज्यामध्ये ऑप्शन प्रीमियम , ऑप्शन ग्रीक याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे . भेट देवून वाचू शकता. त्याचबरोबर तुमचे काही अभिप्राय असतील , कोणत्या विषयांवरील माहिती हवी असेल तर आम्हाला comment करून नक्की कळवू शकता.
आपुलकीचा सल्ला :- ट्रेडिंग हा प्रकार तसा जोखमीचा आणि त्यातही ते ट्रेडिंग हे ऑप्शन या डेरीवेटिव प्रकारात असेल तर जोखीम अजूनच वाढते. परंतु ऑप्शन या प्रकारात परतावा ही भरमसाठ देण्याची क्षमता आहे. म्हणूनच यामधे हात घालण्या अगोदर योग्य ज्ञान घ्या आणि नंतर सुरवात करा.
रोजचे मार्केट विषयी अनॅलिसिस खास करून इंडेक्स साठी आपला youtube channel ला भेट द्या. आणि रोजचे स्टॉक अपडेट आणि इतर माहितीसाठि majhemarket या telegrame channel बरोबर जोडून घ्या.