सर्वात अनिश्चततेचे वर्ष २०२० अखेर संपले. एव्हाना सर्वांची या वर्षाची गोळा बेरीज करून झाली असेल या वर्षातील अर्धा अधिक काळ हा फक्त जिवंत राहणे या उद्देशातच गेला. त्यामुळे जमेच्या बाजूत या वेळेस काही अधिक असण्याची अपेक्षाच नव्हती. पण यामध्ये अजून एक अनिश्चततेचा शिलेदार असलेले शेअर मार्केट मात्र शिलकीच्या रकान्यात खूप काही अधिक घेऊन नवीन वर्षात प्रवेशते झाले. आज SHARE MARKET २०२० याचा आढावा आणि SHARE MARKET IN 2021 मधील संधी याविषयी चर्चा करणार आहोत.
SHARE MARKET 2020 :- शेअर मार्केट २०२० चे
cedit:alexsl |
याविषयी आपण काही प्रमाणात अगोदर बोललो आहेच म.. म.. मार्केटचा. विक्रमी तेजीत सुरवात आणि त्या तेजीला ही लाजवेल असा विक्रमी शेवट असा एका वाक्यातील प्रवास पण त्यामध्ये एक दिव्य दडलंय. सुरवातीचा उधळणारा बैल COVID- १९ च्या आघाताने कधी अस्वलाच्या पायाखाली आला कळलेही नाही. निफ्टी १२४३० वरून घसरून ७५११ तर सेन्सेक्स ४२२६३ वरून २५६४० असा गडगडला. SHARE MARKET 2020 मध्ये दोन्ही निर्देशांक २०१६ च्या किमतीला जाऊन पोहचले साडेतीन ४ वर्षात जे कमविले ते फक्त २ महिन्यात स्वाहा झाले. गुतंवणूकदार आणि ट्रेडर्स यांचे खूप नुकसान झाले. ज्या सर्वोच्च स्तरावरून घसरलोय तो स्तर पुढचे ५-१० वर्ष पुन्हा पाहायला मिळत नाही अश्या चर्चा आणि नैराश्य मार्केट मध्ये पसरलं होत. पण मार्केट ने तळातून पुन्हा उभारी घेतली आणि अनपेक्षित पणे V- SHAPE RECOVERY ने वर्षा अखेर मार्केट पुन्हा नवा विक्रम प्रस्तापित करत निफ्टी १४००० नजीक आणि सेन्सेक्स ४८००० नजीक बंद झाले.
RETURNS IN SHARE MARKET 2020:- शेअर मार्केट २०२० परतावा
यावर्षी गुंतवणूकदार तब्बल ३२.४९ लाख कोटी ने श्रीमंत झाले. त्यामुळे वेळोवेळी सांगतोय ‘गुंतवणूकदार बना’ सेन्सेक्स मध्ये १५.७५% तर निफ्टी मध्ये १४.९०% वार्षिक वाढ झाली. हा गेल्या ३ वर्षातील सर्वोत्तम परतावा आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी गेली सलग ५ वर्ष वाढीव परतावा ( POSITIVE RETURN ) देत आहे. यावरून मार्केटची “बैलदौड” ( BULL RUN ) तुमच्या लक्षात येईल. २०२० मध्ये सेन्सेक्स ६३०० तर निफ्टी ८०० अंकाने सुधारले. निफ्टीने डिसेंबर मध्ये ८% परतावा दिला. नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये FII ने तब्बल ५० हजार कोटीची खरेदी केली. या सर्व धामधुमीने BSE वरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण भागभांडवल १८८.०३ लाख कोटी झाले .
गेल्या दशकात NIFTY – १७३% तर SENSEX – १६९% वाढले
YEAR OF IPO:- वर्ष IPO चे
२०२० हे खऱ्या अर्थाने IPO चे वर्ष ठरले. काही IPO मधील पैसे अक्षरश दुप्पट झाले. यावर्षी BURGER KING, HAPPIEST MIND, ROUTE MOBILE , ANTONY WEST, MAJGAON DOCK आणि अजूनही इतर IPO बाजारात आले १००-२०० च्या पटीत भरलेही आणि भरमसाट परतावा ही दिला. असेच बरेच IPO २०२१ मध्ये पण येण्याच्या तयारीत आहे त्याविषयी त्यावेळी माहिती घेऊ.
SHARE MARKET IN 2021:- मार्केट २०२१ मधील अपेक्षा आणि सावधानता
credit:alexsl |
सावध ऐका पुढच्या हाका !!! मागील पाऊलखुणा पाहताना पुढचा धोका आणि संधी या दोन्ही गोष्टींची कल्पना नक्कीच येत असते. त्यामुळे या २०२१ ला आयुष्यातील खूप काही बदललेल्या संकल्पनेने सुरवात करत आहोत मार्केट मधे ही हे लागू होते. ज्या प्रमाणे तेजी चालू आहे त्यानुसार लवकरच सेन्सेक्स वर ५०००० आणि निफ्टी वर १४५०० पाहायला मिळाले तर नवल नाही. पण त्याच बरोबर CONSOLIDATION साठी तयार राहायला हवे. ते किमतीचे किंवा वेळेचे असू शकते. २०२१ मधे FINANCE SECTOR , INSURANCE , PHARMA हे काही लक्ष ठेवण्यासारखी सेक्टर्स आहेत जे छान परतावा देऊ शकतात.
FINANCIAL SERVICE NIFTY INDEX IN OPTION TRADING:- वायदा बाजारात नवा इंडेक्स
२०२१ सुरवातीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे NIFTY FIN SERVICE हा NIFTY आणि BANKNIFTY बरोबर तिसरा INDEX FUTURE आणि OPTION मधे ट्रेडिंग साठी ११ JAN पासून दाखल होत आहे. याविषयी महत्वाची माहीती संधी आणि धोके यावर लवकरच घेऊन येणार आहोत. त्याआधी मार्केटची बेसिक माहिती जाणून घ्या SHARE MARKET ALL INFORMATION IN MARATHI
SHARE MARKET २०२० हेच MARKET २०२१ साठी मार्गदर्शक ठरणार आहे म्हणून त्याची थोडक्यात माहिती.
तेव्हा पुन्हा भेटू NIFTY FIN SERVICE ची सर्वांग माहीत मराठीत या लेखासह
👌👌
Phar Sunder
👍
खुप सुंदर माहिती…… nifty fin service वरील माहितीची वाट पाहत आहोत…..
खुप छान माहिती…… पुढच्या लेख लवकरच येइल ही अपेक्षा….