डेरिव्हेटिव्ह प्रकारातील ऑप्शन मग तो कॉल असो की पुट याच्या किमतीमध्ये (प्रीमियम) मध्ये बदल घडवून आणणारे घटक म्हणजेच ऑप्शन ग्रीक होय

एकूणच पाच ऑप्शन ग्रीक आहेत. यातील प्रत्येकाचे काम आणि त्याचा ऑप्शन प्रीमियम वरती होणारा परिणाम ही वेगवेगळा आहे.

 ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये बदल घडवणाऱ्या या घटकांची नावे संज्ञा या ग्रीक भाषेत आहेत. म्हणूनच याचे नावही ऑप्शन ग्रीक असेच आहे

1. डेल्टा ।  DELTA

अंडरलाईन ॲसेट म्हणजेच स्टॉक किंवा इंडेक्स यांच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलानुसार त्यांच्या विशिष्ट स्ट्राईक प्राईस च्या ऑप्शन प्रीमियम मध्ये किती बदल होऊ शकतो हे दर्शविण्याचे काम डेल्टा करत असतो

2. गॅमा  । GAMMA

अंडरलाईन ॲसेट  च्या अनुषंगाने डेल्टा मध्ये जो बदल होतो, त्या डेल्टाच्या बदलाचा दर म्हणजे गॅमा होय

3. थिटा । THETA

सर्व घटक स्थिर असतील तर एखाद्या ऑप्शनचा प्रीमियम प्रत्येक दिवसागणिक  किती कमी करावा हे ठरवण्याचे काम थिटा करत असतो. यालाच टाईम डिके असे म्हणतात

4. वेगा  । VEGA

अंडरलायिंग ॲसेट मधील अस्थिरतेमुळे ( VOLATILITY ) ऑप्शन प्रिमियम मध्ये किती बदल होऊ शकतो हे ठरविण्याचे काम वेगा करत असतो

5. रो  । RHO

व्याज दरातील बदलामुळे ऑप्शन वर किती परिणाम होणार आहे हे सर्व रो । RHO वरती अवलंबून असते

या सर्व ग्रीक्स चा उपयोग योग्य अभ्यासानंतरच होणार आहे त्यामुळे अगोदर बेसिक समजून घ्या आणि नंतरच ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करा