जपानी व्यापारी मोनेहीसा हुमा यांनी प्रथम हा पॅटर्न मांडला. तांदळाचा व्यापार करताना काही वर्ष त्यांनी त्याच्या किंमतींची नोंद ठेवली ज्यानुसार किमती ह्या मनमानी प्रकारे वाढत किंवा कमी होत नाहीत तर त्यामध्ये एक पॅटर्न असतो. हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी दोन प्रकारच्या कॅण्डल शोधून काढल्या. पुढे सर्व व्यापारात यांचा उपयोग सुरु झाला आणि शेअर बाजार सुरु झाल्यानंतर स्टॉक च्या किमतीही हा पॅटर्न पाळतात हे समजायला वेळ नाही लागला.
CANDLESTICK PATTERN – कॅण्डलस्टिक पॅटर्न
BULLISH CANDLESTICK –
यामधे बंदचा भाव (CLOSE ) हा सुरु ( OPEN ) भावापेक्षा जास्त असतो. या प्रकारची कॅण्डल ही तेजीचा संकेत देत असते.
BEARISH CANDLESTICK –
यामधे बंदचा भाव हा सुरु भावापेक्षा कमी असतो, या प्रकारची कॅण्डल ही मंदीचा संकेत देत असते.
सुरवातीला कॅण्डल ह्या काळा आणि सफेद या दोन रंगाच्या होत्या ज्यांचा रंग बुद्धिबळाच्या सोंगट्याच्या रंगावरून प्रेरित झालेला होता. यामध्ये सफेद ही तेजीची तर काळी कॅण्डल ही मंदीची दर्शक होती. सध्या जगभरामध्ये तेजीच्या कॅण्डल साठी हिरवा तर मंदीच्या कॅण्डल साठी लाल रंग वापरला जातो.
CANDLESTICK PATTERN |
कॅण्डलस्टिक पॅटर्न मध्ये मधे कॅण्डल आहेत यावरून काही प्रकार
- सिंगल कॅण्डलस्टिक पॅटर्न । SINGLE CANDLESTICK PATTERN
या प्रकारात येणाऱ्या कॅण्डलस्टिक पॅटर्न मध्ये तेजी किंवा मंदीचा संकेत देण्यासाठी फक्त एकच कँडल असते.
- डोजी
- हॅमर
- हँगिंग मॅन
- शूटिंग स्टार
- मारुबोजू
- डबल कॅण्डलस्टिक पॅटर्न । DOUBLE CANDLESTICK PATTERN
या प्रकारात येणाऱ्या कॅण्डलस्टिक पॅटर्न मध्ये तेजी किंवा मंदीचा संकेत देण्यासाठी दोन कँडल असतात. ज्यांची जोडी तेजी किंवा मंदीचा संकेत तयार करते उदा.
- हरामी
- इंगुलफिंग
शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट मध्ये तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला फंडामेंटल एनालिसिस आणि टेक्निकल एनालिसिस समजणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर टेक्निकल इंडिकेटर ही तेव्हडेच गरजेचे आणि हे सर्वांचे बेसिक आहे कॅण्डलस्टिक पॅटर्न म्हणून ते समजून घेऊ.
- डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न । DOJI CANDLESTICK PATTERN
डोजी या प्रकारचे कॅण्डल मध्ये सुरु भाव ( OPEN PRICE ) आणि बंद भाव ( CLOSE PRICE ) दोन्ही एक समान असतात. त्यामुळे या कॅण्डल ला कोणताही रंग नसतो. याचे दोन प्रकार आपण पाहू
१) ग्रेव स्टोन डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न । GRAVE STONE DOJI CANDLESTICK PATTERN
या प्रकारच्या कॅन्डल स्टिकचे नाव जपानी लोकांनी कबर वरती जो दगड लावला जातो त्यावरून ठेवले आहे. ही कॅण्डल दोन प्रकारे दिसू शकते चित्रांमध्ये ते दोन्ही प्रकार दर्शविले आहेत ग्रेव स्टोन डोजी कॅण्डल मध्ये सुरु भाव ( ओपन प्राईस ) आणि बंद भाव ( क्लोज प्राईस) हे समान असतात. हा कॅण्डल प्रकार ओळखण्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे
- यामध्ये वरचा शॅडो / विक खालच्या शॅडोच्या तुलनेने लांब असतो
- ग्रेव स्टोन डोजी मध्ये कोणताही रंग दर्शविला जात नाही, म्हणजे हिरवा किंवा लाल
ही एक मंदी दर्शक कॅण्डल आहे याचा अर्थ असा की ही कँडल चार्ट मध्ये दिसली तर समजून घ्या की, आता शेअर किंवा निर्देशांक मधील तेजी संपून मंदी येऊ शकते ही कॅण्डल चार्ट च्या सर्वोच्च स्तरावर बनायला हवी. स्विंग ट्रेड साठी कमीत कमी 25 दिवसाच्या सर्वोच्च स्तरावरती ही कँडल बनल्यानंतर मंदी करू शकता ट्रेडर्स ने एक गोष्ट कटाक्षाने पाळायची असते ती म्हणजे कन्फर्मेशन !
विक्री कशी कराल ?
ग्रेव स्टोन डोजी नंतरची कॅण्डल डोजी च्या खाली गेल्यानंतर विक्री करावी आणि स्टॉपलॉस हा डोजी कँडल च्या सर्वोच्च ( HIGH ) च्या वरती लावा, आणि टार्गेट जोपर्यंत ट्रेंड रिव्हर्सल चा संकेत मिळत नाही किंवा ट्रेंलिंग स्टॉपलॉस जात नाही तोपर्यंत असावे चार्टच्या मधे कुठेतरी ( सर्वोच्च स्तर सोडून ) बनत असेल तर त्याकडे सहसा दुर्लक्ष करावे.
२) ड्रॅगन फ्लाय डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न । DRAGON FLY DOJI CANDLESTICK PATTERN
आपल्याकडे पावसाळ्यात दिसणारा उडणारा किडा आठवतोय का ? आम्ही लहानपणी त्याला घोडा म्हणायचो, तुमच्याकडे काय म्हणतात ? अगदी त्याच्या वरूनच या कॅण्डल ला ड्रॅगन फ्लाय डोजी असे नाव जपानी लोकांनी दिले. जपानी पण ना !!!! ही कॅण्डल ग्रेव स्टोन डोजीच्या अगदी विरुद्ध आहे.
- या कॅण्डल मध्येही सुरु भाव ( ओपन प्राईस ) आणि बंद भाव ( क्लोज प्राईस ) सारखेच असतात.
- खालची शॅडो / विक वरच्या तुलनेत मोठी असते.
- ड्रॅगन फ्लाय डोजी या कँडलस्टीकला कोणताही रंग नसतो.
- ही एक तेजी दर्शविणारी कॅण्डल आहे म्हणजेच शेअर किंवा निर्देशांका मधील मंदी आता संपणार असून तेजीचे संकेत ही कॅण्डल चार्टच्या निम्नस्तर ( LOW ) वरती मिळाल्या नंतर मिळतात. म्हणजेच ही कॅण्डल चार्ट वरती LOW बनवताना मिळायला हवी.
- स्विंग ट्रेड किंवा हिस्टॉरिकल चार्ट पाहताना कमीत कमी 25 दिवसाचा निम्नस्तर ( LOW ) बनवत बनलेली ड्रॅगन फ्लाय डोजी कँडलस्टीक अपेक्षेप्रमाणे काम करते. चार्टच्या मधे बनलेल्या ड्रॅगन फ्लाय डोजी कडे दुर्लक्ष केलेलेच बरे.
खरेदी केव्हा करावे ?
ड्रॅगन फ्लाय डोजी बनल्यानंतरची कॅण्डल ही डोजीच्या सर्वोच्च स्तराच्या वरती गेल्यावर खरेदी करावी आणि स्टॉप लॉस ड्रॅगन फ्लाय डोजीच्या लो ( LOW ) च्या खाली लावा. आणि प्रॉफिट बुकींग ट्रेंड बदलत नाही किंवा ट्रेंलिंग स्टॉपलॉस हिट होत नाही तोपर्यंत करू नये.
३) हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न । HAMMER CANDLESTICK PATTERN
नावावरून लक्षात आलेच असेल हे नाव का तर ही कॅन्डल स्टिक दिसायला असते, हातोड्या सारखी पण काम तोडायचं नाही तर तेजी दर्शविण्याचे करते. म्हणजेच शेअर किंवा निर्देशांका मधील मंदी संपण्याची वेळ आलेली असून आता बाजार पुन्हा तेजीकडे वळणावर आहे, याचे संकेत ही कॅण्डलस्टीक चार्ट मध्ये दिसल्यावर मिळतात. खरेदीदार आणि विक्रेते यामध्ये खूप चढाओढ होते आणि शेवटी खरेदीदार बंद भाव सुरू भावाच्या जवळपास आणण्यात यशस्वी होतात तेव्हा हॅमर कॅन्डल स्टिक बनते.
- हॅमर मध्ये शॅडो / विक ही बॉडी पेक्षा जवळजवळ दुप्पट असते.
- तसे तर रंगाचे जास्त महत्त्व नाही, पण तेजी दर्शक आहे त्यामुळे हिरव्या रंगाची हॅमर बनत असेल तर उत्तमच.
- हॅमर ही चार प्रकारे बनते यामध्येही कन्फर्मेशन महत्त्वाचे एका उदाहरणावरून समजून घेऊ :- समजा कालची कॅण्डल हॅमर आहे आणि बंद भाव ११२० आहे. मार्केट आज वरती भाव ११३० ला उघडले आहे तर तुम्ही येथे खरेदी करावी. नफा किती असेल हे या हॅमर कॅण्डलच्या आधारे नक्की सांगता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला बाकीचे टेक्निकल एनालिसिस करावे लागेल. पण कन्फर्मेशन नंतर ट्रेड केलात तर निश्चितच चांगले परिणाम मिळतात डेली ( DAILY ), इंट्राडे ( INTRADAY TRADING ) विकली ( WEEKLY ) यामध्ये हॅमर उत्तम काम करते. हाय च्या वरती खरेदी आणि लो ( LOW ) च्या खाली स्टॉपलॉस हा नियम पाळावा.
४ ) इनव्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न । INVERTED HAMMER CANDLESTICK PATTERN
आता या कॅन्डल च्या नावाचेही तेच गणित, उलटा हातोडा ( समजून घ्या हे त्या जपानी लोकांनी ठेवलेली नावे आहेत यात आपला काही हात नाही. राग येत असेल तर तो त्या जपानी लोकांवर ठेवा बरं ) ही एक तेजी दर्शक कॅण्डल आहे. इनव्हर्टेड हॅमर ही कॅण्डल दोन प्रकारे बनते एक लाल इनव्हर्टेड हॅमर आणि दुसरी हिरवी इनव्हर्टेड हॅमर इथेही एक बाब लक्षात घ्या रंग कोणता हे जास्त महत्त्वाचे नाही काम तेजी दर्शविण्याचे आहे म्हणून हिरवा रंग असेल तर “सोने पे सुहागा” आणि नसेल म्हणजे लाल असेल तरीही चालतंय की ! महत्त्वाच्या बाबी :-
- ही एक लहान कॅण्डलस्टीक असते.
- खालची शॅडो / विक नसते आणि असेल तर ती खूपच छोटी असते.
- ही कॅण्डल नेहमी चार्ट च्या बॉटम ला असावी.
खरेदी कशी करावी ?
इनव्हर्टेड हॅमर बनवल्यानंतर दुसरी कॅण्डल वरती सुरू होऊन हॅमर च्या अगोदरच्या कॅन्डल च्या वरती गेल्यावर खरेदी करावी आणि हॅमर च्या लो ( LOW ) च्या खाली स्टॉप लॉस लावा.
५ ) हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न । HANGING MAN CANDLESTICK PATTERN
या नावातील चातुर्य पहा जपानी लोकांचे; फाशीवर झुलत असलेल्या माणसावरून या कॅण्डलस्टीकचे नाव हँगिंग मॅन असे ठेवले आहे, आणि आता माणूस लटकून मरणार म्हटलं की त्यावरून समजलच असेल ही एक मंदी दर्शविणारी कॅण्डल आहे. कँडल दिसली की समजून जा आता उधळणाऱ्या बैलाची तेजी संपून खाली मान घालून धावणारे अस्वल मंदी करायला येत आहे. ही दोन प्रकारे बनते एक लाल हँगिंग मॅन कॅण्डलस्टीक आणि दुसरी हिरवी हँगिंग मॅन कॅण्डलस्टीक नेहमीप्रमाणे यालाही रंगाचा खूप काही फरक पडत नाही. पण मंदी दर्शक आहे तर हिरवी पेक्षा लाल केव्हाही चांगलीच नाही का?
यामध्ये एक गोष्ट जरा लक्ष देऊन पहा की हँगिंग मॅन कॅण्डलस्टीक तिच्या मागच्या कॅण्डल च्या बंद भावाच्या बरोबर किंवा बंद भावापेक्षा वरती सुरू झाली पाहिजे.
विक्री कशी करावी?
हँगिंग मॅन कॅण्डलस्टीक चार्ट च्या टॉपला बनायला हवी आणि त्यानंतरच्या कॅंडलने गॅप डाऊन ( हँगिंग मॅन कॅण्डलस्टीक च्या बंद भावाच्या खाली ) सुरुवात करावी, म्हणजे विक्रीचे कन्फर्मेशन मिळाले असे समजावे आणि हँगिंग मॅन कॅण्डलस्टीकच्या मागच्या कँडल च्या खाली जाताना विक्री करावी हँगिंग मॅन कॅण्डलस्टीक च्या सर्वोच्च् भाव ( HIGH ) च्या वरती स्टॉपलॉस लावा. टार्गेट नेहमीप्रमाणे ट्रेंड रिव्हर्सलचा संकेत किंवा ट्रेंलिंग स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत होल्ड करावे.
६ ) SHOOTING STAR CANDLESTICK PATTERN | शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न
तूटता तारा यावरून नाव घेतलय बरं का या कॅन्डलस्टीकचे, हा आता तुटता तारा तर सर्वांनी पाहिलाच असेल आणि कधी ना कधी काहीतरी इच्छा ही मागितली असेल. पण चार्ट मध्ये हा निखळणारा तारा मंदी दर्शक आहे. ही कॅण्डल स्टिक नेहमी चार्ट च्या टॉप ला बनते ( तसे चार्ट च्या मधेही बनू शकते पण त्याकडे दुर्लक्ष करावे हा फसवा संकेत असू शकतो ) शेअर किंवा निर्देशांकात तेजी चालू असताना ही कॅन्डल स्टिक बनते. आणि तिथून मंदीची सुरुवात होणार असे संकेत मिळतात.
- शूटिंग स्टार मध्ये शॅडो / विक ही बॉडी पेक्षा दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त लांब असते. कधी कधी बॉडी च्या दहा पटही असु शकते.
- शूटिंग स्टार चार प्रकारे बनते चित्रात पाहू शकता या चारही प्रकारांचे काम सारखेच असते.
- ही कॅन्डलस्टीकही रंगभेद पाळत नाही. पण मंदी दर्शक आहे म्हणून मंदीचा बाजारातील सर्वमान्य रंग लाल असल्याकारणाने शूटिंग स्टार कॅण्डल स्टिक लाल असेल तर अधिक योग्यच.
ही कॅन्डल स्टिक डेली, इंट्राडे, विकली चार्ट मध्ये चांगले काम करते आणि महत्त्वाची बाब म्हणजे या कॅण्डल बरोबर व्हॉल्युम पहायला विसरू नका तो एक महत्त्वाचा भाग आहे या कॅण्डलच्या वापरासाठी.
विक्रीचा निर्णय कसा घ्यावा ?
शूटिंग स्टार नंतर ची कॅण्डल गॅप डाऊन सुरू झाली पाहिजे या कन्फर्मेशन नंतर शूटिंग स्टार कॅन्डल स्टिक च्या पाठीमागच्या कॅन्डल च्या LOW च्या खाली जाताना विक्री करावी आणि शूटिंग स्टार कॅन्डल च्या हाय ( HIGH ) च्या वरती स्टॉपलॉस लावा.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व कॅण्डल पासूनच बनतात चार्ट पॅटर्न जे ट्रेडिंग साठी खुप महत्वाचे असतात बर का ?
७ ) MARUBOZU CANDLESTICK PATTERN । मारूबोजू कॅन्डलस्टिक पॅटर्न
ही एक अशी कँडल आहे ज्याचं नाव जपानी लोकांनी दिसण्यावरून नाही ठेवले मारूबोजू या जपानी शब्दाचे दोन अर्थ होतात एक अर्थ टकला माणूस आणि दुसरा अर्थ डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व हाच या कॅण्डल चा मुख्य आधार आहे या कॅण्डलस्टिक मध्ये फक्त एकाच प्रकारच्या ट्रेडर्सचे ( खरेदीदार किंवा विक्रेते ) यांचे वर्चस्व असते. या प्रकारची कॅण्डल स्टिक कमोडिटी मार्केट ट्रेडिंग (COMMODITY MARKET TRADING ) करताना जास्त दिसून येतात. खास करून क्रूड ऑइल ( CRUDE OIL TRADING ) या कमोडिटी मधे.
- मारूबोजू कॅण्डल मध्ये शॅडो / विक बनत नाही आणि असेलच तर अगदी नगण्य.
- ही एक लांब कॅन्डल स्टिक असते जर छोट्या आकाराची मारूबोजू सारखी दिसणारी कॅन्डल स्टिक बनत असेल तर ती फसवी मारूबोजू ( FALSE MARUBOZU ) आहे हे समजून घ्यावे, तिला मारूबोजू कॅन्डल स्टिक मानता येणार नाही.
मारूबोजू कॅन्डल स्टिकचे दोन प्रकार आहेत
- बूलिश मारूबोजू कॅन्डलस्टिक | BULLISH MARUBOZU CANDLESTICK
सुरु भाव ( OPEN PRICE ) हाच निम्न भाव ( LOW ) असतो आणि बंद भाव ( CLOSE PRICE ) हाच सर्वोच्च भाव ( HIGH ) असतो. शेअर मध्ये अप्पर सर्किट ( UPPER CIRCUIT ) लागतात तेव्हा ही कॅण्डल पाहायला मिळते म्हणजेच या कॅण्डल वर खरेदीदार यांचे वर्चस्व दिसून येते.
2. बेरिश मारूबोजू कॅन्डलस्टिक | BEARISH MARUBOZU CANDLESTICK
या प्रकारा मध्ये सुरु भाव हाच सर्वोच्च भाव असतो आणि बंद भाव हा निम्न भाव असतो म्हणजेच यामध्ये विक्रेत्यांचे ( SELLERS ) वर्चस्व दिसून येते शेअरमध्ये लोवर सर्किट लागताना या प्रकारची कॅन्डल स्टिक दिसून येते
मारूबोजू कॅन्डल स्टिकही तेजी आणि मंदी दोन्ही दर्शविण्याचे काम करते बूलिश मारूबोजू कॅन्डल स्टिक हे तेजी दर्शविण्याचे तर बेरिश मारूबोजू कॅन्डल स्टिक हे मंदी दर्शविण्याचे काम करते.
ट्रेंड दर्शक कॅन्डल स्टिक म्हणून मारूबोजू दोन प्रकारे काम करते
- TREND CONTINUATION CANDLESTICK PATTERN | ट्रेंड कन्टीनुएशन कॅन्डलस्टिक पॅटर्न
या प्रकारात जो ट्रेंड चालू आहे तोच ट्रेंड पुढेही चालू राहणार आहे याचे संकेत मिळतात. उदाहरणार्थ जर शेअर मध्ये किंवा निर्देशांकामध्ये तेजी चालू असेल आणि चार्ट वर बूलिश मारूबोजू कॅन्डलस्टिक बनली तर तेजी अजून पुढे चालू राहू शकते. याउलट मंदीमध्ये बेरिश मारूबोजू कॅन्डलस्टिक बनली तर मंदी अजून चालू राहणार.
- TREND REVERSAL CANDLESTICK PATTERN। ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न
या प्रकारात तेजी मध्ये असणाऱ्या शेअर किंवा निर्देशांकाच्या चार्ट वर जर बेरिश मारूबोजू कॅन्डल स्टिक बनली तर तो एक ट्रेंड रिव्हर्ससलचा संकेत असतो म्हणजे आता तेजीला ब्रेक लागून मंदी सुरू होणार आहे. याउलट मंदीच्या बाजारात जर बूलिश मारूबोजू कॅन्डलस्टिक बनली तर मंदीला ब्रेक लागून तेजी सुरू होणार.
मारूबोजू कॅन्डल स्टिक या प्रकारची कॅण्डल डेली, इंट्राडे, विकली, मंथली चार्टवर सुद्धा बनू शकते.
कॅन्डलस्टिक पॅटर्न विषयी अधिक माहितीसाठी हे पुस्तक वाचू शकता. टेक्निकल अनलसीस आणि कॅन्डलस्टिक मार्गदर्शन
शेअर बाजारामध्ये काम करताना खूप कॅन्डल स्टिक चे प्रकार पाहायला आणि ऐकायला मिळतील तुम्हाला सर्वच माहीत असायला हवेत असे काही नाही. वरती काही जास्त वापरले जाणारे सिंगल कॅण्डलस्टिक पॅटर्न ( SINGLE CANDLESTICK PATTERN ) विषयी आपण माहिती घेतली असेच काही महत्वाचे डबल कॅण्डलस्टिक पॅटर्न ( DOUBLE CANDLESTICK PATTERN ) विषयी आपण लेखात माहिती घेऊ शकता.
आपुलकीचा सल्ला–
तुम्ही जर आपला TELEGRAM चॅनेल FOLLOW करत असाल तर तुम्हाला लक्षात आले. असेल की या आठवड्याच्या लेवल विषयी आपले अंदाज कसे होते, आपण WEEKLY MARKET OVERVIEW वर सेरीज सुरु करत आहोत ज्याने तुम्हाला वीकली अंदाज आणि मागील आठवड्यात जे मार्केट मध्ये चढ उतार झाले त्याची कारण सांगण्याचा प्रयत्न असेल. स्विंग ट्रेड साठी कालच चॅनेलवर दिला आहे तो पाहावा.
शेअर मार्केट विषयी वाचण्यासारखे काही
अतिशय सुरेख लेखन आहे… candlestick patterns विषयी माहिती मराठी मधे मिळली खुप आभार…. स्तुत्य उपक्रम
Excellent work
खुपच सोप्या भाषेत
very important information all treders ,thank you so mucg
1 no..💫👌👌
very good info……..
आतिशय उपयूक्त
Very important stock market mahiti Marathi mdhe Awesome 👍 👌
Chhan
Very useful information to every one traders.
फार छान माहिती दिलीत… एक विनंती होती जर का या सोबत प्रत्येक पॅटर्न चा एक चार्ट दायग्रम दाखवता आला तर अजून सोपे होईल समजायला..
उत्तम!!! सोप्या भाषेत समजावलं आहे.. कॅण्डल स्टिक चे इमेज दिसत नाहीत. कुकीज ऑन आहेत तरीही. बाकी हे वाचत असताना मी एक एक कॅन्डल इमेज गुगल वरून बघून घेतलं आहे. तुमच्या शिकवण्याचा योग्य अभ्यास करण्याची पध्दत म्हणजे आधीचे charts बघत जाणे, तिथे तुम्ही सांगितलेल्या कॅन्डल बघता येतात. धन्यवाद सर…
धन्यवाद.. तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.
सोप्या भाषेत समजावलं आहे.. कॅण्डल स्टिक चे इमेज दिसत नाहीत. एक विनंती होती जर का या सोबत प्रत्येक पॅटर्न चा एक चार्ट दायग्रम दाखवता आला तर अजून सोपे होईल समजायला….
धन्यवाद..
Really enjoyed this article. Really thank you! Fantastic.
khup chan mahiti milali
cndle stick patarn shiknyat khup madat jhali
thank you
wecome .. visit youtube also
धन्यवाद.. तुमच्या सुचनांचे स्वागत आहे.