- चार्ट पॅटर्न भाग -2 कप अँड हँडल चार्ट पॅटर्न । CHART PATTERN -2 CUP AND HANDE
- CHART PATTERN – चार्ट पॅटर्न
- कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | CUP AND HANDLE CHART PATTERN
- बुलिश कंटिन्युएशन कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | BULLISH CONTINUATION CUP AND HANDLE CHART PATTERN
- बेरीश कंटिन्युएशन कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | BEARISH CONTINUATION CUP AND HANDLE CHART PATTERN । रिवर्स कप अँड हँडल पॅटर्न । REVERSE CUP & HANDLE PATTERN
चार्ट पॅटर्न भाग -2 कप अँड हँडल चार्ट पॅटर्न । CHART PATTERN -2 CUP AND HANDE
शेअर बाजार मध्ये काम करायचे असेल तर फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस या दोन महत्त्वाच्या बाबी समजून घ्यायला हवे. याविषयी आपण अगोदरच्या लेखांमध्ये चर्चा केलेली आहे. टेक्निकल अनालिसिस हा ट्रेडर्स साठी तसा जास्त महत्त्वाचा भाग आहे. टेक्निकल अनालिसिस मध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न , टेक्निकल इंडिकेटर तसेच चार्ट पॅटर्न इत्यादी घटकांचा अभ्यास येतो. या विषयी माहिती असणे एका ट्रेडर्स साठी जरुरीचे असते टेक्निकल अनालिसिस या विषयातील कॅन्डल स्टिक पॅटर्न बरोबरच काही टेक्निकल इंडिकेटर्स याविषयी आपण या अगोदर माहिती घेतलेली आहे. आता आपण काही चार्ट पॅटर्न विषयी माहिती करून घेऊ या. चार्ट पॅटर्न हा मोठा विभाग असल्यामुळे आपण प्रत्येक लेखामध्ये एक किंवा दोन चार्ट पॅटर्न विषयची सविस्तर माहिती घेऊ. या सीरिजमध्ये कमीत कमी दहा चार्ट पॅटर्न विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चार्ट पॅटर्न समजण्यासाठी ची सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे कॅन्डलस्टिक म्हणजे काय ? ते कशा प्रकारे काम करतात याची माहिती असावी त्याविषयी जर तुम्ही माहिती घेतली नसेल तर हा लेख वाचण्याअगोदर त्याची माहिती घेऊन या. कॅन्डल स्टिक पॅटर्न भाग १ आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न भाग २
CHART PATTERN – चार्ट पॅटर्न
चार्ट पॅटर्न हा कॅन्डलेस्टीक पॅटर्न आणि अन्य कॅण्डल च्या समूहाने बनलेला असतो. तेजी मध्ये असणारा कॅण्डल चा समूह हा UPTREND तर मंदी मध्ये असणारा समूह हा DOWNTREND दर्शवितो. चार्ट पॅटर्न साठी वेळेची टाईम फ्रेम ची सिमा नसते तो एक दिवस , एक महिना किंवा एक वर्षातही बनू शकतो. यानुसार गुंतवणूकदाराला शेअरच्या भावामध्ये तेजी होणार की मंदिर होणार याचे संकेत मिळतात. त्यानुसार शेअर खरेदी करायचा कि विक्री करायचा याचा निर्णय घेता येतो. पॅटर्न पूर्ण झाल्यावर भाव वाढतो किंवा कमी होतो.
चार्ट पॅटर्न चे २ प्रकार आहेत
- कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न – CONTINUATION CHART PATTERN
यामध्ये शेअर किंवा मार्केट ची वाटचाल ज्या दिशेने चालू आहे त्याच दिशेने ती चालू राहण्याचे संकेत मिळतात म्हणजे जर एखादा शेअर अपट्रेन्ड मधे असेल तर तो अजूनही वरची लेवल गाठू शकतो. जर तो मंदीत असेल तर तो अजूनही खाली जाण्याची शक्यता आहे.
काही कॉन्टीनुएशन पॅटर्नची नावे
- FLAG – फ्लॅग
- CUP & HANDLE – कप अँड हँडल
2.रिव्हर्सल चार्ट पॅटर्न – REVERSAL CHART PATTERN
या प्रकारच्या चार्ट पॅटर्न मध्ये तेजी किंवा मंदी मधे असणारा शेअर किंवा इंडेक्स आपली दिशा बदलून विरुद्ध दिशेने वाटचाल सुरु होणार असल्याचे संकेत मिळतात. जसे की तेजी मध्ये जर रिव्हर्सल पॅटर्न बनला तर आता तेजी संपून मंदी सुरु होणार असा संकेत मिळतो अश्याच प्रकारे मंदीत ही रिव्हर्सल बनू शकतो. यामध्ये एक गोष्ट आहे लक्षात घेतली पाहिजे कि असे रिव्हर्सल पॅटर्न मिळाले की लगेच त्यामध्ये खरेदी किंवाा विक्री न करता बाकीचे टेकनिकल इंडिकेटर्सचा पण त्याबरोबर मेळ घालून पाहावा. उदा RSI, VOLLUME , MACD . यामध्ये शक्यतो भूतकाळातील पॅटर्न पुन्हा पाहायला मिळतो.
काही रिव्हर्सल पॅटर्नची नावे
- HEAD & SHOULDER
- DOUBLE TOP / BOTTOM
- ROUNDING BOTTOM
या लेखामध्ये आपण कंटिन्युएशन चार्ट प्रकारांमधील कप अँड हँडल या चार्ट पॅटर्न विषयी माहिती घेणार आहोत.
कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | CUP AND HANDLE CHART PATTERN
हा एक कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न आहे. म्हणजे एखादा शेअर किंवा इंडेक्स च्या चार्ट वरती या प्रकारचा पॅटर्न बनला तर तेजी मध्ये असणारा शेअर किंवा इंडेक्स मधील तेजी पुढील काळातही चालू राहणार आहे. याउलट मंदीमध्ये असणारा शेअर किंवा इंडेक्स यामधील मंदी या पॅटर्न नंतर अजून काही काळासाठी राहणार असल्याचे संकेत मिळतात. काही ठीकाणी मंदी मधील कप अँड हँडल ला रिवर्स कप अँड हँडल असेही संबोधतात. कप अँड हँडल या चार्ट पॅटर्न चे नाव त्याचा आकार चहाच्या कपासारखा असतो यावरून पडलेले आहे. यात काही कॅण्डल स्टीकचा समूह असतो. यामध्ये किती कॅण्डल मिळून हा पॅटर्न बनू शकतो असे काही बंधन नाही, परंतु कमीत कमी एक महिन्याच्या म्हणजे 20 ते 30 कॅन्डल स्टिक असतील तर पॅटर्नमधील संकेत बरोबर असण्याची शक्यता जास्त असते.
कप अँड हँडल चार्ट पॅटर्नचे मुख्यतः दोन प्रकार पडतात
- बुलिश कंटिन्युएशन कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | BULLISH CONTINUATION CUP AND HANDLE CHART PATTERN
- बेरीश कंटिन्युएशन कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | BEARISH CONTINUATION CUP AND HANDLE CHART PATTERN
बुलिश कंटिन्युएशन कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | BULLISH CONTINUATION CUP AND HANDLE CHART PATTERN
शेअर किंवा इंडेक्समध्ये तेजी /अपट्रेंड चालू असेल आणि एका ठिकाणी जाऊन शेअरच्या किमती ला रेजिस्टन्स लागत असेल. त्या ठिकाणावरुन शेअरच्या किमती पुन्हा कमी व्हायला सुरुवात होतात आणि एका ठिकाणी सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जायला सुरुवात करतात आणि पुन्हा एका रेजिस्टन्स ला जाऊन कन्सोलिडेशन मध्ये जायला सुरुवात करतात. दुसरा रेजिस्टन्स हा पहिल्या रेजिस्टन्स बरोबर किंवा काही प्रमाणात कमी किंवा जास्त असू शकतो. पहिला रेजिस्टन्स आणि दुसरा रेजिस्टन्स मध्ये ज्या कॅन्डल स्टिक बनलेल्या असतात त्या जर सर्व जोडल्या तर त्यांचा आकार अर्धगोला प्रमाणे असतो. पहिला रेजिस्टन्स आणि दुसरा रेजिस्टन्स यांना जोडणारी एक ट्रेंड लाइन काढली असता, खालील अर्ध गोला मुळे याचा आकार कपा सारखा दिसतो. दुसरा रेजिस्टन्स नंतर शेअरची किंमत काही काळासाठी कन्सोलिडेशन मध्ये जाते. या फेज मधील कॅण्डल स्टिक काहीशा सपोर्ट च्या बाजूला जाताना दिसतात. ज्याप्रमाणे फ्लॅग पॅटर्नमध्ये फ्लॅग बनवला जातो तसंच या कन्सोलिडेशन मध्ये कॅण्डल स्टिक चा आकार चार्ट वरती काढला जातो. अगोदर बनलेला अर्धगोलाकार याला जसा कपाचा आकार असतो तसाच कन्सोलिडेशन मध्ये बनलेल्या कॅन्डल स्टिक या त्या कपाचा दांडा प्रमाणे दिसतात. जेव्हा यामधून किमती वरच्या बाजूने जायला लागतात तेव्हा तो कप अंड हँडल या चार्ट पॅटर्न चा ब्रेक आऊट आहे असं मानलं जातं. शेअरची किंमत या पॅटर्नचा ब्रेक आउट करत असताना किमतीमधील वोल्युम हा वाढलेला असायला हवा. कोणत्याही पॅटर्न चा अभ्यास करताना त्याबरोबर वोल्युम खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर शेअरचा किमतींमध्ये पुन्हा तेजी ला सुरुवात होते आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन रेजिस्टन्स असतात आणि कन्सोलिडेशन मध्ये गेलेला भाग हा दांड्या प्रमाणे दिसतो.
आकृती मधे हिरव्या रंगात दर्शिविलेला ट्रेंड हा सुरवातीचा अपट्रेंड आहे. A आणि B हे दोन रेजिस्टन्स आहेत, या दोन्ही रेजिस्टंस च्या मधे जो फिकट पिवळसर रंगात जो अर्धगोलाकार बनलेला आहे तो पॅटर्न मधील कप आहे. तर फिकट निळसर रंगात खालच्या बाजूला झुकलेला आकार हा कपाचा दांडा आहे. गडद निळ्या रंगात जी उभी रेषा आहे ती हा पॅटर्न पूर्ण झाल्यावर किती टार्गेट असेल हे दाखवत आहे. हे टार्गेट आणि कपामधील निळी उभी रेषा हे अंतर सारखेच आहे.
कप अँड हँडल पॅटर्ननुसार खरेदी कशी करावी ?
चार्ट वरती हा पॅटर्न बनल्यानंतर जेव्हा कॅन्डल स्टिक या पॅटर्नमधील दांडा ( हँडल ) चा जो रेजिस्टंस आहे तिथून वरती जाताना किंवा कपाच्या आकारातील दुसरा रेजिस्टन्स च्या वरती जाताना खरेदी करावी आणि जी कॅन्डल स्टिक रेजिस्टन्स च्या वरती बंद झाली आहे, तिच्या लो / निम्नस्तर ( LOW ) च्या खाली स्टॉपलॉस लावावा. तर टार्गेट हे कपाचा आकार बनताना ज्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे, तो सपोर्ट आणि दोन्ही रेजिस्टन्स ना जोडणारी ट्रेंड लाईन यामधील जे अंतर आहे तेवढ्याच पॉइंटचे टार्गेट हे पॅटर्नच्या ब्रेक आऊट नंतर असेल. वरती जी आकृती/ IMAGE आहे त्यामध्ये टार्गेट कसे काढायचे आहे ते दिलेले आहे. स्टॉपलॉस आणि टार्गेट यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो हा जर योग्य असेल तरच ट्रेड करावा अन्यथा करू नये. याबरोबरच ब्रेक आउट होता ना वोल्युम वर अवश्य लक्ष द्यावे, ब्रेक आऊटला जर व्हॉल्युमची साथ असेल तर पॅटर्नचे टारगेट येण्याची शक्यता जास्त असते.
बेरीश कंटिन्युएशन कप अँड हँडल चार्ट पॅटर्न | BEARISH CONTINUATION CUP AND HANDLE CHART PATTERN । रिवर्स कप अँड हँडल पॅटर्न । REVERSE CUP & HANDLE PATTERN
हाही एक कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न आहे, यामधे शेअर किंवा इंडेक्स मध्ये चालू असणारी मंदी पुढे अजून काही काळासाठी चालू राहणार असल्याचे संकेत मिळतात. यालाच काही ठिकाणी रिव्हर्स कप अँड हँडल चार्ट पॅटर्न असे म्हणले जाते. कारण हा बुलिश कंटिन्युएशन कप अँड हँडल चार्ट पॅटर्नच्या अगदी उलटा दिसतो. हा दिसायला जमिनीवरती उपडा ठेवलेल्या कपासारखा दिसतो. वरती जी आकृती / IMAGE दिलेली आहे अगदी तसाच पॅटर्न इथे हि बनतो फक्त अपट्रेंड ऐवजी डाउनट्रेंड असतो तर कप हा त्याच्या उलट असतो बाकी टार्गेट हि वरील आकृती प्रमाणेच परंतु खालच्या बाजूला असते. जर याची वेगळी IMAGE हवी असेल तर COMMENT मधे किंवा TELEGRAM चॅनेल वर कळवा.
रिव्हर्स कप अँड हँडल चार्ट पॅटर्न कसा बनतो ?
शेअरच्या किमती मध्ये चालू असलेल्या मंदीमध्ये किमती एका ठिकाणी सपोर्ट घेतात आणि पुन्हा वरच्या दिशेने कामकाजाला सुरुवात करतात .वरती जात असताना किमतीला पुन्हा एकदा रेजिस्टन्स लागतो आणि त्या ठिकाणावरून किमती पुन्हा खालच्या दिशेने म्हणजे मंदीच्या दिशेने कामकाजाला सुरुवात करतात पुन्हा एकदा किमती सपोर्ट घेतात. हा सपोर्ट पहिल्या सपोर्ट पेक्षा काही प्रमाणात खाली किंवा वरती असू शकतो. किंवा पहिल्या सपोर्टच्या बरोबर ही असू शकतो. पहिला सपोर्ट ते दुसरा सपोर्ट या सर्व कॅन्डल्सला जोडले असता हा आकार उलट्या अर्धगोला सारखा बनतो, म्हणजेच हा उलट्या कपासारखा दिसत असतो. या दुसरा सपोर्ट पासून शेअर काही प्रमाणात कन्सोलिडेशन फेजमध्ये जातो यावेळच्या कॅन्डल्स काही प्रमाणात रेजिस्टन्स च्या बाजूला जाताना दिसतात. या सर्व कॅन्डल स्टिक अगोदरच्या अर्धगोलाला जोडुन पाहिले असता त्या कपाच्या दांड्या ( हँडल ) प्रमाणे भासतात. याप्रमाणे ने पूर्ण कप अँड हँडल चार्ट पॅटर्न शेअर च्या चार्ट वरती तयार होतो. कन्सोलिडेशन फेजमध्ये गेलेल्या किमतीच्या कॅन्डल स्टिक पुन्हा एकदा सपोर्ट तोडताना या पॅटर्नचा ब्रेक डाउन झाला असे समजावे. यावेळेस व्हॉल्युम ही वाढलेला असतो. वाढलेला व्हॉल्युम हा मोठ्या उताराचा संकेत देत असतो.
रिव्हर्स कप अँड हँडल चार्ट पॅटर्न नुसार विक्री कशी करावी?
जेव्हा वाढत्या वोल्युम सहित पॅटर्नचा ब्रेक डाऊन होतो त्या कॅन्डल स्टिक मध्ये सपोर्ट तोडताना विक्री करावी आणि स्टॉपलॉस हा त्या कॅन्डल स्टिक च्या हाय / सर्वोच्च स्तरावर ( HIGH ) लावा आणि टार्गेट हे जो पॅटर्नमध्ये कप बनलेला आहे त्यासाठीचा रेजिस्टन्स आणि दोन्ही सपोर्टला जोडणारी ट्रेंड लाईन यामधील जेवढे अंतर आहे तेवढेच पॉईंट हे ब्रेक डाऊन नंतरचे टारगेट असेल. जर स्टॉप लॉस आणि टारगेट यामधील रिस्क रिवॉर्ड रेशो हा योग्य असेल तरच विक्री करावी अन्यथा दुर्लक्ष करावे.
कप अँड हँडल चार्ट पॅटर्न हा सर्व टाईम फ्रेम मध्ये जरी बनत असला तरी स्विंग ट्रेड किंवा शॉर्ट टर्म साठी याचा चांगला उपयोग होतो. जर योग्य वोल्युम सहित ब्रेक आऊट तेव्हा ब्रेकडाऊन मिळत असेल, तर रिस्क रिवॉर्ड रेशो चे पालन करून खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात. येथे लक्षात घेण्यासाठी एक बाब म्हणजे ब्रेक आउट किंवा ब्रेक डाऊन होणाऱ्या कॅन्डल स्टिक मध्ये लगेच व्यवहार न करता त्यानंतरच्या एका कँडलस्टिक ची वाट पाहून पॅटर्न चा ब्रेक आऊट किंवा ब्रेक डाउन हा फसवा नसल्याची खात्री करून घेतल्यास बरोबर येण्याची शक्यता अजून वाढू शकते. ब्रेक आऊट ला बुलिश मारूबोझु किंवा इतर बुलीश कँडलस्टिक पॅटर्न बनत असेल तर उत्तमच, याउलट ब्रेक डाऊन चे ही आहे, जर बेरिश कँडलस्टिक पॅटर्न बनत असेल तर सोने पे सुहागा. यासाठी अगोदर कॅन्डल स्टिक पॅटर्नस समजून घ्या. ज्याविषयी अगोदरच्या लेखांमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
खूपच छान, मराठीतून शेअर मार्केटची खूपच छान माहिती दिली आहे,
what is web development ?
खूप छान माहिती
खूप महत्त्वपूर्ण माहिती…. हा उपक्रम सुरू ठेवा…. मराठी मधे माहितीची गरज आहे.
महत्वाची महिती सर