Its Happening | घडलय-बिघडलंय

शेअर मार्केट तेजीला ब्रेक 

शेअर मार्केट विषयी बेसिक माहिती  खरं तर हाविषय हवा होता आजचा नव्हे तसा लेख तयार ही होता परंतू पहिल्या भेटीत म..म..मार्केटचा  आपण मार्केट मधील DREAM RUN | स्वप्नवत तेजी विषयी जी शंका व्यक्त केली होती तसंच काहीतरी घडतंय आणि त्यामुळे नवीन तथाकथित सर्वज्ञानी ट्रेडर्सच जे बिघडलंय ते समजून घेण्यासाठी हि आडवाट. 

                                शुक्रवारी नवीन विक्रम प्रस्थापित  NIFTY – 13760 करणारं मार्केट आज काही वाईट संकेत घेऊन सुरु नाही झाले थोडे फार खाली कामकाज करत होते. बहुतांश लोकांना मार्केट मध्ये बैल सुसाट धावतोय ( BULL RUN ) यावर पक्का विश्वास आणि पहिल्या तासा दोन तासात अगदी तसंच घडलंही ७०-८० पॉईंट च्या पडझडी नंतर मार्केट ने पुन्हा वरचा रस्ता धरला होता. गेल्या दीडेक महिन्यापासून सवय लागल्याप्रमाणे मार्केटची चाल चालू होती . बरेच जण खालच्या स्तरावर संधी मिळाली म्हणून खुश होते तर ऑर्डर काहीच पॉईंटनी  हुकलेले ऐन वेळेला नकार मिळालेल्या मुलासारखे हळहळत होते . काही दिवसापासून लुप्त होण्याच्या मार्गावर असलेली जमात SHORT SELLERS । शॉर्ट सेलर्स कपाळावरील घाम पुसत आजही मागचे पाढे पंच्चावन्न म्हणत मनातून चरफडत होते. यातच निफ्टी ने नवीन विक्रम १३७७७ बनवला पण , अचानक कसं काय ते अस्वल कुठून तरी मधे घुसले मग सुरु झाले नवीन ट्रेडर्स चे  दुःस्वप्न त्यांना काय होतंय हे समजायच्या आताच पावसाळ्यातील हिरवळ पाहत असलेला PORTFOLIO फुलाने बहरलेला लालेलाल गुलमोहर बनला होता. ही हालचाल एवढी वेगाने होत होती की आता सर्वोच्च स्तरपाहिलेली NIFTY। निफ्टी कधी १३१५० च्या खाली पोहचली हे समजलं देखील नाही. अंदाज यावरूनच येईल कि जो चड उतार निफ्टी मध्ये पूर्ण आठवडा ( weekly candle) तर कधी कधी अगदी महिन्याभरात  ( monthly candle ) पाहायला नाही मिळत तो फक्त १५ मिनटात दिसला . एक वेळ तर अशी होती nifty – ५२५ , बॅंकनिफटी – १६०० तर  SENSEX – २००० पॉईंट ने खाली होते दिवसाच्या HIGH वरून विचार केला तर अजूनच चिंताजनक स्थिती होती.

शेअर मार्केट मधील चड उतार 

                                 NSE वरती जवळ जवळ १५९५ स्टॉक हे लाल तर फक्त १७३ हिरवे  बंद झालेत . NIFTY  आणि  BANKNIFTY  अलीकडील आपले सर्व सपोर्ट तोडून त्याखाली बंद झाली आहेत. गेले ३०-३५ ट्रेडिंग सेशन  दोन्ही हाताने भरभरून देणारे FII ( -३२३ cr ) ने पण हात आखडता घेतलाय . एवढ्या पडत्या काळात ही  त्यांनी खूप काही विकलं नाही हीच काय ती जमेची बाजू, तर DII (४८६cr ) ची खरेदी केली.  

                              मार्केट म्हणजे असे CORRECTION , चढ उतार  येतच राहणार. अभ्यासू आणि अनुभवी लोकांनी आपल्या गुंतवणुकीला स्टॉप लॉस नावाचा बांध लावून या पडझडीत ही  आपले भांडवल सुरक्षित ठेवले किंबहुना काहींनी तर फायदा पण करून घेतला. आता खरी काळजी त्यांची वाटतिये , स्टॉप लॉस वगैरे सब झूट है , ‘ मार्केट यहाँ से झिरो नही होगा उपर हि जायेगा‘ असले फिल्मी डायलॉग ऐकून आलेले  आणि प्रेमळ सल्ला देणाऱ्या अनुभवी  लोकांना गेल्या २-३ महिन्यात कमीत कमी ५० वेळा ‘तुम्ही स्टॉप लॉस का लावता रे ?? मार्केट फक्त तो ट्रिगर करायलाच येत आणि पुन्हा वर जातंय, लय घाबरता बुवा तुम्ही!!!!! हे ऐकविणाऱ्या नवं परिपूर्ण ट्रेडर्सच काय झालं असेल. त्यात अव्वाच्या सव्वा मार्जिन घेऊन काम करायची लागलेली सवय. SWING TRADE । स्विंग ट्रेड, स्वस्तातील शेअर यावर थेंबे थेंबे साचलेली घागर आज पूर्ण रीती झालेली बरेच असतील . वरतून असा डाउन फॉल कधीच न पाहिलेला त्यामुळे उडालेला गोंधळ वेगळाच ३. ३० ला हिरवं पाहायची सवय झाल्यानं आजचा लाल त्यांना नक्कीच अधिक गडद दिसला असेल. महिन्यापूर्वी जेव्हा FUTURE RETAIL ला UPPER CIRCUIT होते तेव्हा योग्य स्टॉप लॉस लावा सांगितले तेव्हा तुच्छतेने पाहणारे अजून तो खरेदीच्या किमतीला येण्याची वाट पाहत आहेत तसेच BURGER KING २१३ ला खरेदी करणारे पण आहेत . 

                              लंडन मधील LOCKDOWN । टाळेबंदीहे ही  कारण आहे आजच्या पडझडी साठी पण खरंच फक्त तेवढंच कारण आहे का? कोरोनानंतर असा कोणता फॉर्मुला सापडला सर्व कंपन्यांना की  मार्केट या वेगाने वरती गेले. यावर आपण येणाऱ्या लेखांमध्ये चर्चा करणार आहोतच. आज गडगडलंय म्हणून खूप काही वाईट बोलायला पाहिजे असं नाही. गुंतवणूक करू नका असं माझे मत नक्कीच नाही. हेतू हाच की तुम्हाला योग्य खरेदी केव्हा करावी  आणि PROFIT BOOKING । प्रॉफिट बुकिंग जमायला पाहिजे. स्वतःची तयारी हवी, तरच तुम्ही मार्केट मध्ये पाय रोवून उभे राहू शकता. मग ते बुल मार्केट / तेजी चे मार्केट  असो की BEAR MARKET । मंदी  मार्केट. त्यासाठी मार्केट समजून घेणं खूप महत्वाचे आहे.  MONEY MANAGEMENT । पैस्याचे योग्य व्यवस्थापन, स्टॉप लॉस , टार्गेट  यागोष्टी समजायला पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिस्त पाहिजे काम करतांना. नाहीतर जसं गेल्या १३ दिवसाची तेजी मार्केटने १ दिवसात खाल्ली तसेच भांडवल नफ्यासहीत केंव्हा गिळंकृत करेल कळणार ही नाही. 

                  “सोचते ही रहोगे तो कुछ ना कर पाओगे 

                   गर करके सोचा तो भी क्या पाया ‘

6 thoughts on “Its Happening | घडलय-बिघडलंय”

Leave a Comment