LEADING 5 CRYPTOCURRENCY WALLET IN INDIA | भारतातील आघाडीचे ५ क्रिप्टोकरंसी वॉलेट

        भारतातील 5 बेस्ट क्रिप्टो करेंसी वॉलेट । 5 BEST CRYPTO WALLET IN INDIA | क्रिप्टोकरंसी वॉलेट माहिती मराठीमधे 

            कोरोना नंतर सध्या सर्वात जास्त ज्या गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे क्रिप्टो करेंसी बातम्यांमध्ये, चर्चांमधून आणि  मीम्स मध्ये सुद्धा सर्वात जास्त ट्रेंड मध्ये असणारे क्रिप्टो करेंसी म्हणजे नक्की आहे तरी काय ? हे बिटकॉइन | BITCOIN , ETHERIUM , DOGECOIN  नक्की आहे तरी काय ?  काही दिवसातच  50% 100%  वर- खाली जाऊन गुंतवणूकदाराला एकतर मालामाल करतायेत किंवा  देशोधडीला लावतात एलोन मस्क  बाबानी एकदा चिवचिवाट केला तरीही पूर्ण क्रिप्टो करेंसी मार्केट मध्ये हालचाल निर्माण होते. आता आपल्यासारखे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 5-10 टक्के परतावा मिळवण्यासाठी टेक्निकल अनलसिस, फंडामेंटल अनालिसिस,  कॅन्डल स्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न  यांची पार चिरफाड करत असतात. त्यातही जोडीला मनी कंट्रोल ( MONEY CONTROL)  स्टॉक एज ( STOCK EDGE)  आणि इतर काही ॲप्लिकेशन हे आहेतच. तेही पुरेसे नाही म्हणून कि काय? स्विंग ट्रेडिंग बी शिकायला हवय… आणि त्याचबरोबर इंडेक्स ऑप्शन सोडून कसं चालेल?  फ्युचर तर जीवन आवश्यकच.  परंतु या क्रिप्टो करेंसी मार्केटमध्ये रातोरात 50 – 60 टक्के परतावा येत आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या बऱ्याच लोकांचे डोळे विस्फारले आहेत. तेही यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत आहे. आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडतो. सेबीचा त्यावरती  कंट्रोल असतो. परंतु या क्रिप्टो करन्सी मार्केटवर तसे कंट्रोल ठेवणारा बोर्ड अजून अस्तित्वात आला नाही. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर गरज पडते क्रिप्टो करेंसी एक्सचेंजची आणि ते डिमॅट प्रमाणे एक क्रिप्टो वॉलेट गुंतवणूकदाराला उपलब्ध करून देतात.  त्यावरूनच आपण या क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक करू शकतो. भारतातील क्रिप्टो करेंसी ची स्थिती आणि भारत सरकारची भूमिका या विषय आपण अगोदरच माहिती दिलेली आहे .आणि त्यावेळेस गुंतवणुकीसाठी योग्य असणाऱ्या क्रिप्टो करेंसी ही सांगितल्या होत्या. त्यामधील डोजे कॉईन । DOGECOIN  ने  30 पट,  इथेरीयमने  ४ पट, ट्रॉन्स ।TRONS ने  ६ पट तर बीटीटी ।BTT  ने ५ पट परतावा दिलेला आहे . याविषयी सविस्तर टेलिग्राम चॅनेल ला पाहू शकता. तर आज आपण भारतातील काही महत्त्वाच्या क्रिप्टो वॉलेट विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

WHAT IS CRYPTO WALLET

क्रिप्टो करेंसी वॉलेट म्हणजे काय? । WHAT IS CRYPTO WALLET? 

                       हे आपल्या मोबाइल वॉलेट सारखेच असतात. ज्यामध्ये आपण आपले पैसे साठवतो आणि त्यापासून व्यवहार करतो. क्रिप्टो करेंसी वॉलेट मध्ये आपल्याकडे काही क्रिप्टो करेंसी असतात ज्यांची आपण खरेदी विक्री करू शकतो. हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असते जे आपल्याला आपले क्रिप्टो करेंसी साठवून ठेवण्यासाठी आणि वेळोवेळी त्यांचा मागोवा घेण्यासाठी मदत करते. ही वॉलेट पासवर्ड  आणि सिक्युरिटी कि ( security key) ने संरक्षित केलेली असते. क्रिप्टो करेंसी मधील ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी ही विस्तारित आणि एकमेकांना शेअर केलेली असते. त्या विपरीत क्रिप्टो करेंसी वॉलेट संरक्षित असते आणि फक्त मालका द्वारे चालवले जाऊ शकते. बिटकॉइंन हीच सर्वात प्रचलित क्रिप्टो करेंसी असल्यामुळे क्रिप्टो वॉलेट चा उल्लेख काही ठिकाणी  बिटकॉइंन वॉलेट असाही केला जातो. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना ज्याप्रमाणे डिमॅट अकाउंट ची गरज असते, अगदी तसेच काहीसे काम क्रिप्टो करेंसी ट्रेडिंग मध्ये क्रिप्टो वॉलेट चे असते. ज्यामध्ये पैसे जमा करणे, खरेदी – विक्री करणे आणि पुन्हा पैसे आपल्या बँक अकाउंट मध्ये विड्रॉल करणे हे पर्याय असतात. आपण या लेखामध्ये भारतातील काही महत्वाचे 5 क्रिप्टो करेंसी वॉलेट विषय थोडक्यात माहिती देणार आहोत जे क्रिप्टो करेंसी ट्रेडिंग मध्ये उपयुक्त आहेत.

 क्रिप्टो वॉलेट केवायसी वेरिफिकेशन आणि साइन अप : CRYPTO WALLET KYC AND SIGN UP

        क्रिप्टो करेंसी वॉलेट मध्ये अकाउंट बनवणे आणि व्हेरिफाई करणे सर्व वॉलेट साठी जवळपास सारखेच आहे. त्यामुळे एकदाच त्याची प्रक्रिया सांगितले आहे.

  1.  ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर ई-मेल ऍड्रेस ने  आणि पासवर्ड  तयार करून साइन अप करावे पासवर्ड कोणाबरोबरही शेअर करू नये.
  2. दिलेल्या इमेल वरती एक मेल येईल त्याद्वारे व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
  3. आपला मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्यावा.
  4. केवायसी डिटेल यामध्ये पॅन कार्ड मध्ये असलेले पूर्ण नाव पॅन कार्ड,  आधार कार्ड हे भरावे आणि जिथे गरज असेल तिथे त्यांचे फोटो अपलोड करावे.
  5. ज्या बँक अकाउंट मधून पैसे जमा करायचे आहेत किंवा त्यामध्ये पुन्हा विड्रॉल करायचे आहेत त्या बँक अकाउंट चे डिटेल्स द्यावे लागतील.
  6.  ज्या पद्धतीने डिमॅट अकाउंट साठी कागदपत्र गरजेचे असतात तीच कागदपत्रे या ठिकाणी हे लागतात. परंतु शेअर मार्केट वरती जसे सेबी हा रेग्युलेटरी बोर्ड आहे तसा क्रिप्टो करेंसी वरती नाही. त्यामुळे पूर्ण माहिती नंतरच त्या ठिकाणी ट्रेडिंग करायचा विचार करा

खाली फक्त क्रिप्टो वॉलेट विषयी माहिती देत आहोत लेखाच्या शेवटी दिलेल्या सर्वांचे फी आणि इतर चार्जेस विषयीचे तुलनात्मक रकाना दिलेला आहे.

1) वझीर एक्स । WAJIRX 

                         2010 मध्ये बनलेले हे भारतातील सर्वात मोठे क्रिप्टो करेंसी वॉलेट आहे. वापरकर्त्यांच्या संख्येनुसार ही वझीर एक्स (WAJIRX) हे सर्वात जास्त वापरले जाणारे वॉलेट आहे. यामध्ये रियल टाईम ओपन ऑर्डर बुक, चार्ट , डिपॉझिट आणि विड्रॉल यासारखे पर्याय मिळतात. नवीन वापरकर्त्यास  समजेल अशाप्रकारे यांच्या ॲप्लिकेशनचा इंटरफेस आहे. हे ॲप्लिकेशन अँड्रॉइड तसेच IOS सर्वात महत्वाचे म्हणजे पियर टु पियर ( P2P) ट्रांजेक्शन करणारे हे भारतातील एकमेव क्रिप्टो वॉलेट आहे.

सकारात्मक पर्याय:

  • या एक्सचेंजमध्ये डिपॉझिट आणि विड्रॉल भारतीय चलनात करता येते.
  •  क्रिप्टो करेंसी खरेदी किंवा विक्री साठी वजीर एक्स पियर टु  पियर चा उपयोग केला जाऊ शकतो.
  •  त्यामध्ये ट्रांजेक्शन फी शून्य आहे.
  •  यु एस डी टी (USDT)  मार्केटमध्ये सर्वात जास्त लिक्विडिटी उपलब्ध करून देते.
  • सर्वात कमी किमतीच्या क्रिप्टो करेंसी वजीर एक्स वरती असतात.
  • यांची स्वतःची क्रिप्टो करेंसी आहे ज्यामध्ये ट्रांजेक्शन केल्यास काही सूट मिळते.
  • खूप जास्त क्रिप्टो करेंसी ट्रेडिंग साठी उपलब्ध आहे, त्याचबरोबर नवीन आलेली क्रिप्टो लवकर या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते.

नकारात्मक घटक:

  • मेकर आणि टेकर फी ही 0.20% पर्सेंट आहे.
  • चार्ट नवीन लोकांना समजण्यास अवघड जातात.
  • मधील काही काळामध्ये वॉलेट मध्ये पैसे जमा करण्यासाठी अडचण येत होती.

कॉइन स्विच कुबेर | COINSWITCH KUBER

                  हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. ज्याद्वारे क्रिप्टो करेंसी ची म्हणजेच बिटकॉइन ची खरेदी विक्री केली जाऊ शकते. यामध्ये जगातील खूप सार्‍या क्रिप्टो करेंसी उपलब्ध आहेत नवीन ट्रेडर ला समजण्यासाठी सर्वात सोपे असे हे ॲप्लिकेशन आहे. यामध्ये क्रिप्टो करेंसी ची किंमत भारतीय रुपयांमध्ये दर्शविले जाते.

सकारात्मक घटक:

  • समजायला अतिशय सोपे ॲप्लिकेशन आहे किमती भारतीय रुपया मध्ये असल्यामुळ प्रत्येक वेळी डॉलर टू रुपया बदल करून पहावा लागत नाही.
  • डिपॉझिट आणि विड्रॉल चार्जेस नाहीत.
  • मेकर्स आणि टेकर फी नाही.
  • अगोदरच्या सर्व क्रिप्टो करेंसी असण्याबरोबरच नवीन क्रिप्टो करेंसी ही लवकरात लवकर उपलब्ध होतात.
  •  शंभर रुपयापासून क्रिप्टो करन्सी ची खरेदी विक्री सुरू करू शकता.
  •  पैसे आपल्या बँक अकाउंट मध्ये कधीही विड्रॉल करू शकता

नकारात्मक घटक:

  • विड्रॉल चार्जेस जरी नसले तरी छुपे चार्ज 1-2% एवढे आहेत. आणि कधीकधी ते खूप जास्त होतात.

3. कॉइन डीसी एक्स |  COINDCX 

                            या क्रिप्टो करेंसी एक्सचेंज  ची सुरुवात 2018 मध्ये झालेली आहे. तुलनेने नवीन असलेले क्रिप्टो करेंसी वॉलेट आहे. परंतु कमी वेळातच सिक्युरिटी आणि हाताळण्यास सोपे असल्याकारणाने क्रिप्टो करेंसी ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्स मध्ये लोकप्रिय झालेले आहे.
सकारात्मक घटक:
  • अतिशय सोपे ॲप्लिकेशन आहे. ज्याद्वारे क्रिप्टो करेंसी ची खरेदी-विक्री करू शकता.
  •  शंभर रुपयापासून गुंतवणूक करू शकता.
  •  तुमचे पैसे भारतीय रुपया मध्ये पेट्रोल करू शकता तेही विना चार्ज.
  •  दहा हजारापर्यंत च्या गुंतवणुकीसाठी केवायसी व्हेरीफिकेशन ची गरज नाही.
  •  प्राईस अलर्ट ची सोय आहे ज्याने क्रिप्टो करेंसी ची जसे की बिटकॉइन, इथेरियम यांच्या किंमतीवर नजर ठेवू शकता.
नकारात्मक घटक:
  • नवीन असल्या कारणाने मार्केटचा पुरेसा अनुभव नाही
  • नवीन क्रिप्टो करेंसी प्लॅटफॉर्म वरती यायला बाकीच्यांच्या तुलनेत वेळ लागतो. 
  • मेकर आणि टेकर फी 0.10 टक्के आहे.

झेबपे | ZEBPAY 

                   भारतातील सर्वात जुने क्रिप्टो करेंसी एक्सचेंज आहे परंतु मध्ये काही काळ हे बंद होते. आणि त्यावळेस अकाउंट मधील पैसे काढण्यासाठी काही बंधने आली होती, त्यामुळे याची विश्वासहर्ता काही प्रमाणात कमी झालेले आहे. आता पुन्हा एकदा नव्याने या क्रिप्टो करेंसी वॉलेट ने सुरुवात केलेली आहे.
सकारात्मक घटक:
  • सर्वात जुने  क्रिप्टो करेंसी एक्सचेंज आहे. म्हणजेच भारतातील सर्वात अनुभवी क्रिप्टो वॉलेट पैकी एक आहे. 
  • खूप सार्‍या क्रिप्टो करेंसी या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. तसेच नवीन लॉन्च झालेल्या क्रिप्टो करेंसी लवकरात लवकर उपलब्ध होतात.
  • भारतीय रुपयांमध्ये पैसे जमा करू शकता किंवा विड्रॉल करू शकता.
नकारात्मक घटक:
  • मेकर फी  0.10%  एवढी आहे.
  • टेकर फी 0.25 एवढी आहे.
  • इतर चार्जेस मध्ये 0.0001 BTC|बिटकॉइन किंवा काही महिन्याचे चार्जेस लावले जातात
  • डिपॉझिट चार्जेस हे ₹5-15 आहेत. तर बिटकॉइन विड्रॉल साठी 0.0006 BTC | बिटकॉइन एवढा चार्ज आहे.

5. बायनांस | BINANCE 

                             हे जगातील सर्वात मोठे क्रिप्टो करेंसी एक्सचेंज आहे. यावर जवळ जवळ सर्वच क्रिप्टो करेंसी उपलब्ध आहेत. यांचे स्वताचे कॉईन आहे ज्यामध्ये  बायनांस वपरकर्त्यला काही सुट मिळु शकते.
सकारात्मक घटक :
  • सर्वात मोठे आहे त्यामूळे तरलता ( liquidity) जास्त असते.
  • नवीन ट्रेडर्स ला वापरायला सोपे आहे.
  • पैसे जमा करायला कोणतेही चार्ज लागत नाही.
नकारात्मक घटक:
  • भारतीय रुपया मधे व्यवहार करु शकत नाही. प्रत्येक वेळी  डॉलर मधुन रुपया मधे बदल करावे लागते.
  • मेकर आणि टेकर फी 0.10% एवढी आहे.I
  • NR- USD बदल साठी काही चार्ज दयावे लागतात.
  • डिपॉझिट चार्ज नाही परंतु विड्रॉल साठी 0.0005 BTC  चार्ज आहे.

क्रिप्टो वॉलेट तुलनात्मक माहिती ।  COMPARATIVE INFORMATION ABOUT CRYPTO WALLETS 

Cryptocurrency wallet comparison

आपुलकीचा सल्ला : वरती  क्रिप्टो करेंसी वॉलेट विषयी जी माहिती दिलेली आहे ती अगदी थोडक्यात म्हणजे एप्लीकेशन ची ओळख इतकीच मर्यादित आहे त्यामुळे अगोदर पूर्ण माहिती घेऊनच एखाद्या वॉलेट मधून गुंतवणुकीला सुरुवात करा क्रिप्टो करेंसी मार्केट हे अतिशय चढ-उताराचा आहे त्यामुळे आपल्या पूर्ण गुंतवणुकीच्या 45 टक्के पेक्षा जास्त गुंतवणूक यामध्ये करू नका क्रिप्टो करेंसी वॉलेट निवडणे अगोदर सर्व रूपे चार्ज विषयी माहिती करून घ्या. इतर माहिती साठी तुम्ही टेलेग्राम , फेसबुक आणि ट्विटर वर फॉलो करू शकता. 
इतर वाचावे असे :
 

Leave a Comment