- मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय ? | WHAT IS MUHURAT TRADING
- मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास | HISTORY OF MUHARAT TRADING
- मुहूर्त ट्रेडिंग वेळ 2022 | MUHURAT TRADING TIMINGS 2022
- मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र कसे काम करते ? | HOW DOES MUHRAT SESSION WORK?
- मुहूर्त ट्रेडिंग कोणासाठी ?
- मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्रा दरम्यान कोणती काळजी घ्यावी ? | DOS & DONTS IN MUHARAT TREDING SESSION
अतिशय विविधतेने नटलेल्या आपल्या देशात स्थानिक खुप सारे सण साजरे केले जातात परंतु दिवाळी हा सर्व भारतभर उत्साहाने साजरा केला जाणारा दिव्यांचा सण आहे. दीपावली म्हणजे उजेडचा अंधारवर सत्याचा असत्यवर , ज्ञानाचा अज्ञानावर , प्रॉफिटचा लॉस वर विजय होय. सर्वत्र शुभ आणि अशुभ या बाबी मात्र समान धागा आहेत. त्याचा प्रकार काही अंशी वेगळा असु शकतो पण अस्तित्वात आहेत. अमुक एका वेळेस अमुक एखादी सुरवात केली तर ती फलदायी ठरते ही श्रद्धा पूर्वापार चालत आली आहे आणि त्या वेळेलाच मुहूर्त असे मानले जाते. आणि दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर जे काही अल्पवेळ ट्रेडिंग केले जाते त्याला मुहूर्त ट्रेडिंग असे म्हणतात.
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय ? | WHAT IS MUHURAT TRADING
हिंदु संस्कृती नुसार कोणत्याही नवीन कामाची सुरवात करण्यासाठी जी शुभ वेळ असते त्यावेळेस शुभ मुहूर्त मनाला जातो. स्टॉक मार्केट मध्ये जेव्हा नवीन वर्षाची सुरवात करण्यासाठी दीपावलीच्या शुभ मुहूर्तवर जेव्हा सर्व गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स हे रोजच्या 9 AM ते 3.30 PM प्रमाणेच 1 तासांसाठी गुंतवणूक किंवा ट्रेड करतात त्या 1 तासाच्या ट्रेडिंग ला मुहूर्त ट्रेडिंग असे म्हणतात. हा प्रकार फक्त भारतीय मार्केट मध्येच पाहायला मिळतो
दिवाळी हा पवित्र हिंदु सण आहे त्यामुळे या दिवशी केलेली गुंतवणूक किंवा ट्रेड हा पुढील पूर्ण वर्षभर ट्रेडिंग मध्ये सकारात्मकता आणि नफा मिळवून देईल अशी आस्था शेअर मार्केट मधे काम करणाऱ्यांची असते. म्हणूनच इतर कोणत्याही दिवशी जसे कामकाज होते तसेच कामकाजाची विंडो दीपावलीच्या सुट्टीच्या दिवशी 1 तासांसाठी स्टॉक ब्रोकर आणि वायक्तिक गुंतवणूकदार , ट्रेडर्स यांच्यासाठी सुरू केली जाते ज्यामुळे त्यांनाही या शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग म्हणजेच मुहूर्त ट्रेडिंग करता येईल.
मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास | HISTORY OF MUHARAT TRADING
भारतातील जवळ जवळ सर्व व्यावसायिक , लहान मोठे व्यापारी असोत की दुकानदार हे दिवाळी मधे नवीन वर्ष सुरू करतात म्हणजे नवीन वही पुढील आर्थिक वर्षासाठी पूजन करतात यालाच चोपडा पूजन असेही म्हणाले जाते. ब्रोकिंग समुदाय सुद्धा नवीन आर्थिक वर्षासाठी चोपडा पूजन करून नवीन खाते सुरू करतात. धन , समृद्धी आणि सौभाग्याची देवी लक्ष्मी चे पूजन यावेळेस केले जाते
मुहूर्त ट्रेडिंग विषयी वेग-वेगळी मत आहेत. परंतु एक सामान्य प्रचलित बाब म्हणजे शेअर मार्केट मधील दोन अग्रेसर समाज, मारवाडी आणि गुजराती ब्रोकर्स यांमधील मारवाडी ट्रेडर्स मानतात की दिवाळीत सेक्यूरिटीज विकावे तर गुजराती गुंतवणूकदार यांचा नवीन खरेदीवर विश्वास असतो.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( BSE ) हा भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात जुना एक्सचेंज आहे. याच BSE ने 1957 मधे सर्वप्रथम मुहूर्त ट्रेडिंग ही परंपरा सुरू केली जी नंतर 1992 मधे नॅशनल स्टॉक एक्सचेंजने ( NSE ) सुद्धा स्वीकारली. ही परंपरा आजतागायत सुरु असून रीटेल ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी हे एक प्रतीकात्मक संकेत बनलेले आहे.
मुहूर्त ट्रेडिंग वेळ 2022 | MUHURAT TRADING TIMINGS 2022
तुम्हाला जर यावर्षी मुहूर्त ट्रेडिंग मधे सहभागी होऊन शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग करायचे असेल किंवा काही शेअर्स खरेदी करायचे असतील तर वेळ आहे, सोमवार दिनांक 24 ऑक्टोबर 2022 सविस्तर सत्र खालील प्रमाणे असेल.
मुहूर्त ट्रेडिंग सत्र | कॅपिटल मार्केट (तासांमध्ये) |
ब्लॉक डील सत्र | 5.45 PM to 6.00 PM |
मार्केट प्री-ओपनिंग सत्र | 6.00 PM to 6.08 PM |
सामान्य बाजार सत्र | 6.15 PM to 7.15 PM |
कॉल ऑक्शन सत्र | 6.20 PM to 7.05 PM |
क्लोजिंग सत्र | 7.25 PM to 7.35 PM |
मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र कसे काम करते ? | HOW DOES MUHRAT SESSION WORK?
सामान्य दिवशी जसे मार्केट मध्ये कामकाज असते म्हणजे ज्याप्रमाणे 9 AM ते 3.30 PM मधे जसी काय सत्र विभागणी असते तशीच मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी ही विभागणी 1 तासात केलेली असते. खालील प्रमाणे सत्र असतात.
- ब्लॉक डील सत्र – मुख्यत्वे दोन संस्थागत गुंतवणूकदार या प्रकारे व्यवहार करतात यामधे खरेदीदार आणि विक्रेता एक किमतील व्यवहारास मान्यता देतात. यामधे कमीत कमी 5 लाख शेअर्स किंवा किमान मूल्य 5 कोटी आहेत असे व्यवहार होतात. सामान्य बाजार सुरू होण्याअगोदर हे सत्र असते.
- मार्केट प्री-ओपनिंग सत्र – साधारणपणे सर्व व्यवहाराचे योग्य आकलन करून समतोल किमती या सत्रामधे केल्या जातात . हे सत्र सामान्य मार्केट आणि मुहूर्त ट्रेडिंग दोन्ही कडे 8 मिनिटाचेच असते.
- सामान्य बाजार सत्र – सर्व प्रकारचे व्यवहार या सत्रामधे केले जातात. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी हे 1 तासांचे सत्र असते.
- कॉल ऑक्शन सत्र – लिलाव कालावधी हा खास करून तरलता म्हणजेच लिक्विड सिक्युरिटीस मधे ट्रेड करण्यासाठी असतो या दरम्यान ऑर्डर प्रविष्ट करणे,सुधारित करणे किंवा ऑर्डर कॅन्सल केले जावू शकतात.
- क्लोजिंग सत्र – या सत्रामद्धे संपूर्ण कामकाजा नंतर अंतिम किमतींचे सेटलमेन्ट केले जाते.
मुहूर्त ट्रेडिंग कोणासाठी ?
शेअर मार्केट मधे नवीन आहात ? अगोदर कुठलीही गुंतवणूक मार्केट मधे केलेली नाही आणि तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु करण्यासाठी मुहूर्त वर विश्वास ठेवता तर या दीपावली मधे मुहूर्त ट्रेडिंग पेक्षा दूसरी योग्य वेळ असूच शकत नाही. या मुहूर्त ट्रेडिंग सत्रात तुम्ही काही चांगले शेअर्स निवडून तुमच्या गुंतवणुकीला आणि मार्केट मधील प्रवासाला नक्कीच सुरवात करु शकता . या नवीन प्रवासात कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला मार्गदर्शन करतील.
मुहूर्त ट्रेडिंगमधे फक्त 1 तासाचे सत्र असते आणि खूप सारे गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स या वेळेत व्यवहार करतात त्यामुळे या काळात जास्त व्हॉल्युम पाहायला मिळतो त्याच बरोबर चढ उतार ही जास्त असण्याची शक्यता असते. या सर्वांचा फायदा अनुभवी ट्रेडर्स असाल तर योग्य खरेदी आणि विक्री करून घेवू शकता. आणि नवीन असाल तर अनुभव मिळवू शकता त्याबरोबरच योग्य संधी शोधून काही गुंतवणूक करु शकता. तसेच एखादा जलद ट्रेड ही उरकून घेवू शकता. त्यासाठी टेक्निकल अँनलिसिस कळायला हवे आणि समजत असेल तरच यामधे धाडस करा.
ट्रेडर्सचा सर्वात आवडीचा प्रकार म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग हो तुम्हाला ही संधी आहे कमी वेळ आणि चढ उतार यामुळे स्कालपर | scalper ला चांगली संधी भेटू शकते. रोजच्या प्रमाणे ऑप्शनचा ट्रेड करु शकता फक्त जास्त हाव ठेवू नका. हो आणि यामधे हात घालण्या अगोदर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय ? हे समजून घ्यावे.
मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्रा दरम्यान कोणती काळजी घ्यावी ? | DOS & DONTS IN MUHARAT TREDING SESSION
मुहूर्त ट्रेडिंगच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडिंग करायचे याचा अर्थ असा नाही की कोणत्याही स्टॉक मधे किंवा काहीही ट्रेडिंग करून फक्त हा दिवस साधायचा या दिवशी सुध्दा अभ्यासपूर्ण निर्णय घ्यायला हवा खासकरून जे दीर्घ काळासाठी गुंतवणुकीचा विचार करतायत त्यांनी तर ट्रेडिंग सुरु होण्याआधीच तयार असायला हवे. म्हणूनच खालील काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
- मुहुर्त ट्रेडिंग सत्र 24 ऑक्टोबर 2022 रोजी 6.15 PM ते 7.15 PM पर्यंत असेल.
- बहुतेक गुंतवणूकदार गुंतवणूसाठी वर्षातील सर्वात अनुकूल काळ म्हणून मुहूर्त कडे पाहत असतात म्हणून खुप सारे मोठे गुंतवणूकदार स्क्रीन वर असतात हेही नवीन ट्रेडर्स ने लक्षात घ्यायला हवे.
- मुहूर्त ट्रेडिंग च्या सत्रातील सर्व खुल्या पोझिशन या सेटलमेन्ट प्रतिबद्धता मधे असतात.
- या 1 तासाच्या वेळेत काही स्टॉक्स अगदीच जास्त वर खाली होत असतात किंवा विनाकारणच एका दिशेने जात आहेत असा भास निर्माण होवू शकतो.
- या काळातील खूप साऱ्या ट्रेड मुळे काही अफवा ही पसरल्या जातात आणि मार्केट किंवा एखाद्या स्टॉक मधील अचानक चढ उतरमुळे त्या खऱ्या ही वाटू शकतात.
- जर तुम्ही नवीन गुंतवणूक करणार असाल तर सर्वप्रथम कंपनीच्या फंडामेंटल विषयी जाणून घ्या आणि त्यानंतरच गुंतवणूक करा.
- गुंतवणुकी विषयी स्वत:चे काही नियम असतील तर त्याप्रमाणेच गुंतवणुकीला प्राधान्य द्या.
- अतिशय चढ उतार असणाऱ्या ट्रेडिंग सत्राचा जर फायदा करून घ्यायचा असेल तर जास्त vollume असलेले स्टॉक मुहूर्त ट्रेडिंग साठी निवडा कारण हे फक्त 1 तासाचे सत्र आहे त्यामुळे जोखीमही जास्त असु शकते.
आपुलकीचा सल्ला :- दिवाळी म्हणले की खरेदी, मिठाई, फटाके, रोषणाई हे आलेच आणि ते असायला ही हवे पण त्याबरोबरच एक नवीन सुरवात म्हणुन यावेळेस थोडीफार का होईना गुंतवणुकीचे रोपटे नक्की लावून पाहा. ट्रेडिंग किंवा गुंतवणूक ही कोणत्याही दिवशी असली तरी त्यासाठी मार्केट विषयीच अभ्यास आणि अनुभव खूप महत्वाचा असतो. मुहूर्त ट्रेडिंग आहे म्हणून उत्साहाच्या भरात कुठेही गुंतवणूक किंवा ट्रेड करु नये. इक्विटी बरोबरच gold etf , niftybees असे पर्याय ही शोधून पाहू शकता ज्यामध्ये तुलनेने कमी जोखीम असेल.
मुहूर्त ट्रेडिंग साठी चांगले स्टॉक आणि रोजच्या मार्केट विषयी च्या माहिती साठी MAJHEMARKET या youtube चॅनेल ला subscribe करा आणि MAJHEMARKET या टेलिग्राम चॅनेल ही जॉइन करा आणि हो ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या सूचना तसेच तक्रारी comment मधे नक्की कळवा.