12 JULY NIFTY BANK NIFTY WEEKLY ANALYSIS| 12 जुलै निफ्टी आणि बँक निफ्टी वीकली अँनालिसिस

 

 WEEKLY ANALYSIS  12 JULY TO 16 JULY  2021|12 जुलै ते 16 जुलै स्टॉक मार्केट अँनालिसिस|स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 

PREDICTION 16 :-

05 जुलै  ते 09 जुलै स्टॉक मार्केटचा आढावा : 

             आजचा  majhemarket.com  चा मार्केट विषयीचा सोळावा साप्ताहिक अंदाज आहे. यापूर्वी दिले गेलेल्या पंधरापैकी फक्त एकदा आपला अंदाज चुकलेला आहे.( ते सर्व prediction तुम्ही पाहू शकता.) गेल्या आठवड्यातील शेअर मार्केट वीकली  अनालिसिस मध्ये व्यक्त केलेला अंदाज पुन्हा एकदा तंतोतंत बरोबर आलेला आहे. अगदी दोन्ही बाजूच्या निफ्टीच्या लेवल पाहायला मिळाल्या त्याप्रमाणेच ग्लोबल मार्केट कडून निफ्टी / भारतीय मार्केटला खूप अधार मिळण्याची शक्यता नाही, हेही बरोबर ठरले आहे. टेक्निकली विकली चार्ट वरती निफ्टी मध्ये बेरीश कॅन्डल स्टिक पॅटर्न बनवत असलेले आपण पाहिले होते. अगदी त्याच प्रमाणे या आठवड्यातील मार्केट ची चाल राहिलेली आहे. दिले गेलेले सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन्ही ठिकाणी मार्केट मध्ये कामकाज पाहायला मिळाले. बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्स सर्विस यांच्याशी लेबल सपोर्ट आणि प्रतिष्ठान या भावाजवळ काम करताना पाहायला मिळाले.
नवीन लोक डिमॅट विषयी माहिती मराठी मधून याठिकाणी वाचू शकतात शकतात.
  इथे 👉 डिमॅट अकाउंट UPSTOX ओपन करून ट्रेडिंग सुरू करू शकता.
Majhemarket

सर्व संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत |MARKET POSITIVE TRIGGERS 

  1. US bond yield 1.31 आहे. हा कमालीचा खाली आलेला दिसून येत आहे. याचा फायदा अमेरीकन मार्केट बरोबरच आपल्यालाही होऊ शकतो.
  2. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची  ९५ अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक निर्यात झालेली आहे. याचाच अर्थ आपला देशातील आर्थिक परिस्थिती हळू हळू कोविड मधून सावरत आहे.
  3. Q4 चे रिझल्ट संपले असून ते बऱ्यापैकीं लागलेले आहेत आता या आठवडय़ापासून Q1 चे रिझल्ट यायला सुरवात होईल हे पण चांगले येण्याची शक्यता असेल.
  4. लसीकरणाने जवळपास 37 कोटींचा टप्पा पार केला आहे. लसीकरण वेग कमालीचा वाढला आहे.
  5.  us ने  infra structure मधे $953 billion मदत जाहीर केली आहे. 
  6. आर्थिक वर्ष 2021/22 च्या पहिली तिमाही संपताना डायरेक्ट टॅक्स 1.85 लाख करोड इतके जमा झाले आहे.
  7. जून मध्ये परकीय गुंतवणूक दाराचा indian equity  मध्ये कल वाढत आहे, 5848.76 करोड  इंडियन मार्केट मध्ये आले आहेत.
  8. अपेक्षेप्रमाणे  रिझर्व्ह  बँकेने तिच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवले,सलग सहाव्यांदा रेपो दर किमान अशा ४ टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे जाहीर केले.
  9. युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे.
  10. केंद्र सरकारने 18 वर्षावरील लसीकरण पूर्णपणे मोफत सुरू केलेले आहे. शिवाय लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी खाजगी मधे कमी किमती मधे लस उपलब्ध होत आहे.
  11. जीएसटी (GST) कलेक्शन मे महिन्यात 1.02 लाख करोड झाले आहे, जुन चे आकडे सकारात्मक येण्याची अपेक्षा आहे.
  12. डॉलर इंडेक्स 92.102आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  13. रिलायन्स बरोबरच hdfcbank या आठवडय़ात पून्हा बुलिश होऊ शकतो. निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेले निफ्टी ला वरती घेऊन जावू शकतात.
  14. FII ने सतत दोन महिने विक्री केल्यानंतर जूनमध्ये 3162 करोड  खरेदीचे आकडे दिलासा देणारे वाटताहेत. DII ने सलग तिसऱ्या महिन्यात खरेदी दर्शविलेली आहे.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत | MARKET NEGATIVE TRIGGERS 

  1. इंडिया वीक्स ( VIX)12.94  एवढा आहे.  मार्केट जास्त बेअरिश/बुलिश होण्याचा धोका संभावत असतो.
  2. मार्केटचा पीई (PE) 28.27 एवढा आहे. 
  3. मुडीज ने 2021/22 या वर्षांचा GDP ग्रोथ रेट कमी केलेला, इतरही संस्था भारताचा वार्षिक वृद्धिदर कमी करू शकतात.
  4. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे सतत वाढून येणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
  5. भारतीय रुपया 74.487 आहे तो सतत वाढतांना दिसून येत आहे याने चालू खात्यावर दबाव येऊ शकतो.
  6. crude oil $75.59 वर आले आहे, शिवाय ते जवळपास $80 पर्यत जाण्याचि  शक्यता आहे. या वाढत जात असलेल्या किमती भारतीय मार्केट साठीची धोक्याची घंटा होऊ शकते.
  7. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो  जवळपास -2.23% (nifty upside 1.98% & down side -4.4%)तर बँक निफ्टी साठी जवळपास -0.08% (upside 2.55 & down side -0.22)एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो
  8. आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 0.66 एवढा आहे. तर जूलै महिन्याचा पीसीआर 1.25 एवढा आहे.
  9. Covid-19 चा धोका कमी होत असतानाच नवीन डेल्टा प्लस व्हेरीअंट मुळे चिंता पुन्हा वाढत आहेत. काही ठिकाणी निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच WHO ने हा विषाणू 100 देशात पसरला असल्याचा जाहीर केलं आहे,

12 जुलै  ते 16 जुलै स्टॉक मार्केट ची दिशा काय असेल ? | WHAT IS STOCK MARKET DIRECTION ON 12-16 JULY ?

                             जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात स्टॉक मार्केट ची दिशा ठरवताना सर्वात अडचणीची बाब म्हणजे गेल्या चार ते पाच आठवड्यापासून मार्केट एका ठराविक रेंज मध्येच कामकाज करत आहे. निफ्टी 15900 रेजिस्टन्स तोडून वरती बंद व्हायला तयार नाही, तर खालीही 15600 हा सपोर्ट तोडून कामकाज करू इच्छित नाही. त्यामुळे या ऊण्या- पुऱ्या 300 पॉईंट चा रेंजमध्ये मार्केट वर खाली  कामकाज करताना पाहायला मिळत आहे. ग्लोबल मार्केट कडूनही पाहिजे तसा सपोर्ट मिळताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा या आठवड्यातही मार्केट आपला रेजिस्टन्स तोडून वरती बंद होण्याची शक्यता कमी आहे त्याच बरोबर सपोर्ट थोडा खाली म्हणजे 15 475 च्या आसपास घेण्याची शक्यता आहे. कोरोना कमी होत असल्याने जो दिलासा मार्केट साठी मिळत आहे त्यावरती रेटींग एजन्सीच्या नकारात्मक टिप्पण्या मार्केट च्या चालीवर विरजण घालत आहे. इंडिया विक्स हा अतिशय कमी म्हणजे अकरा बाराच्या रेंजमधे आलेला आहे. विक्स चा ऐतिहासिक चार्ट निफ्टीच्या एतिहासिक चार्ट बरोबर पाहिला तर लवकरच मोठा चढ-उतार होण्याची शक्यता तयार झालेली आहे. तो चढ उतार दोन्ही बाजूला असू शकतो, टेक्निकली चार्ट वर निफ्टीने बेरीश कॅन्डल बनवलेली आहे हे आपण अगोदरच नमूद केले आहे. त्याच बरोबर ऑप्शन डेटा आणि इतर संकेत लक्षात घेऊन या वेळेचा मार्केट ची दिशा काय असेल याविषयी अंदाज व्यक्त केलेला आहे. तो मागील काही आठवड्या प्रमाणेच आहे यावेळेस फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरती लक्ष असायला हवे. दोन्हीपैकी एक बाजू तोडून बंद झालं तर मार्केटचा ट्रेंड  बदलला जाईल.
           या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि चार्टचा टेक्निकली अभ्यास करता या आठवड्यासाठी आपला अंदाज हा…
 कन्सोलिडेशन असा असेल Volatile  CONSOLIDATION   
   

 निफ्टी 12 ते 16 जुलै अंदाज |12-16 JULY NIFTY ANALYSIS 

  • निफ्टी 50 PE 26.31 आहे.
  • निफ्टीचा बंद भाव हा 15690 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव 15721आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम 31 पॉइंट एवढा आहे.
  • वीकलि PCR 0.66 आणि मंथली PCR 1.25 असलेला आपणास दिसून येतो.
  • ऑपशन चैन चा विचार केला तर  या आठवडयात:            15700 च्या कॉल वरती 4683900, तर 15800 च्या कॉल वरती 4908900. त्याच बरोबर 15700 PE वर 3352950, 15600 PE 2955075 एवढा ओपन इन्टेरेस्ट आहे.         
  • मंथली सेरिजचा ऑप्शन डाटा वरती 15800 ce वर 1872950, तर16000 ce वर 2794150. तसेच 15500 PE वर 3164700, 15000 PE वर 2680300 एवढा ओपन इन्टेरेस्ट असलेला दिसून येतो.

निफ्टी अपसाईड लेवल |NIFTY UPSIDE LEVEL

                निफ्टीने तिच्या बंद भाव  15690 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15810/20 हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे.यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 15895/15910 येउ शकते हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल( जर या लेव्हलला मार्केट sustain झाले तर आपण 16200 च्या दिशेने जाऊ ). शिवाय बँक निफ्टी आणि ग्लोबल मार्केट सकारात्मक असेल तर 16000 लेव्हल येऊ शकते परंतु हि शक्यता फारच कमी असेल.

निफ्टी डाउन साईड लेवल | NIFTY DOWN SIDE LEVEL 

      निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15590/15600असेल. या खाली एक तासाची किंवा एक दिवसाचि कॅन्डल स्टिक बंद झाली तर 15460/70( जर या लेवलच्या खाली मार्केट sustain होत असेल तर निफ्टी पुढील काही दिवसांत 15050/14950 च्या लेव्हल कडे जाऊ शकते) हि लेवल येऊ शकते, हे या आठवड्याचे टार्गेट असू शकते. या खाली एक दिवस बंद झाले तर 15200/15190हि लेवल येऊ शकते
शिवाय खूपच  नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 15050 पर्यंत जाऊ शकते.
जे डेटामध्येेे दिसतंय तेच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

NIFTY 50 @ 15690

    R1-15810/30   R2 -15900/20-WT     R3- 16000

   S1 –
15620/590    S2- 15470/50 WT    S3-15230/190 

बँकनिफ्टी 12ते 16 जुलै अंदाज| 12-16JULY BANKNIFTY ANALYSIS

  • या आठवड्यात निफ्टी बँक upside ratio हा 2.65 आहे तर down side -0.20 असेल.
  • बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर  0.72 आहे. तर महिन्याचा 0.98 आहे.
  • बँक निफ्टी चा पीई 24.64 ( PE)  आहे.
  • बँक निफ्टी चा बंदभाव 35072 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 35275 एवढा आहे  म्हणजेच  प्रिमीयम  203 पॉईंट चा आहे.
  • ऑप्शन डाटा चा विचार करता बँक निफ्टी च्या विकली सेरिज मधे 35000 CE वर 1210750, 36000 CE वर 1373800 तसेच 35000 PE वर 52515 आणि 34500 PE वर 34529 एवढा ओपन इंटरेस्ट असून,
  • मंथली सीरीज़ मध्ये 36000 CE वर 574675, 37000 CE वर  657875 आणि 34000 PE वर 410900, तर 33000 PE वर 379525 एवढा ओपन इन्टेरेस्ट असलेला दिसून येतो.

बँक निफ्टी अप साइड लेवल |BANKNIFTY UPSIDE LEVEL 

           बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 35072 पासुन वरती जायला सुरुवात केली तर 35500/50ही लेवल असेल जि कि मार्केट साठी अतिशय महत्वपुर्ण आहे. 35500 वर जर बँक निफ्टी  sustain झाली तर निफ्टी बँक वर जाण्याची शक्यता असेल. (हि आपली पहिली लेवल असेल.) यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 35850/35870 ही दुसरी लेवल असेल जे कि हे या आठवड्याचे टारगेट असेल यावरती 1 दिवस बँक निफ्टी बंद झाली तर 36000/36100 हि लेवल येऊ शकते.

बँक निफ्टी डाऊन साइड लेवल | BANKNIFTY DOWN SIDE LEVEL 

            बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  35072 खाली जायला सुरुवात केली तर पहिला सपोर्ट  34950/70 ही लेवल असेल. जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली तर  34650/70 ही लेवल येण्याची शक्यत आहे. या वीकचे  खालचे टार्गेट असेल मार्केटची सद्यस्थिती पाहता बँक निफ्टी 34400 या लेवल पर्यंत येण्याची श्क्यता नाकारता येत नाही.
BANK NIFTY @ 35072

R1- 35500/50 IMP   R2- 35850/70-WT  R3- 36000/100  

    S1- 34970/50       S2- 34675/25-WT   S3- 34400 

 खूप वेळा माहिती मधे कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी जाणुन घ्यायचं असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्विस 12 जुलै ते 16 जुलै अंदाज:


NIFTY financial services: @ 16590

future @16665

R1 – 16650/75   R2- 16750/75 – WT    R3- 16900 
S1 – 16500/475    S2- 16350/25 -WT     S3- 16250

महत्त्वाची बाब:

     यावेळी मार्केटमध्ये इंडिया विक्स वरती लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे यामुळे मार्केटमध्ये एखादा शार्प मुव्हमेंट  येऊ शकते.( यासाठी मार्च 2020 मध्ये निफ्टी आणि विक्स यांचा परस्पर संबंध याचा अभ्यास करू शकता) ती या आठवड्यात येईल किंवा पुढील काही दिवसात येईल. परंतु अशी मोठी मुव्हमेंट  येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे स्टॉपलॉस शिवाय कुठलाही ट्रेड करू नका आणि काही दिवस आपल्या कॉन्टिटी कमी करून ट्रेड  केला तर चांगलेच आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेबल पाळल्या गेल्या पाहिजेत कारण त्या तोडल्या गेल्यानंतर अचानक मोठा चढ-उतार होऊ शकतो.

1 thought on “12 JULY NIFTY BANK NIFTY WEEKLY ANALYSIS| 12 जुलै निफ्टी आणि बँक निफ्टी वीकली अँनालिसिस”

  1. इंट्राडे वरती एकाद स्पेशल कन्टेन्ट टाका. लोकांना खूप उपयुक्त माहीती मिळेल.

    Reply

Leave a Comment