SHARE MARKET WEEKLY ANALYSIS 05 JULY TO 09 JULY 2021|05 जुलै ते 1 जुलै स्टॉक मार्केट अँनालिसिस

SHARE MARKET WEEKLY ANALYSIS  05 JULY TO 09 JULY  2021|05 जुलै ते 1 जुलै स्टॉक मार्केट अँनालिसिस|स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 

PREDICTION 15 :-

28 जुन ते 01 जुलै स्टॉक मार्केटचा आढावा : 

                     मार्केट विषयीचा पंधरावा साप्ताहिक अंदाज व्यक्त करण्या अगोदर मागील आठवड्याचा आढावा घेऊया. मागील आठवड्यातील अंदाज अगदी तंतोतंत बरोबर जरी आलेला नसला तरी माझे मार्केट ने व्यक्त केलेले लेवल मार्केट कडून रिस्पेक्ट करताना पाहायला मिळाले. गेले दोन-तीन आठवडे आपण कन्सोलिडेशनचा जो अंदाज व्यक्त करत आहोत तो खरा ठरताना दिसत आहे. या आठवड्यातील निफ्टी तसेच बँक निफ्टीही एका रेंज मध्ये कामकाज करताना पाहायला मिळाले. व्यक्त केलेल्या रेजिस्टन्स आणि सपोर्ट लेवल यामध्येच या दोघांचेही चाल राहिलेली आहे. ग्लोबल मार्केट काहीसे सकारात्मक राहिले परंतु त्याप्रमाणे भारतीय मार्केट राहिले नाही. आठवड्याच्या कॅन्डल स्टिक वर एक बेरीश पॅटर्न बनल्याचे दिसून येत आहे, यासाठी कॅन्डल स्टिक विषयी माहिती असणे आवश्यक आहे. याबरोबरच निफ्टी फायनान्स सर्विस या इंडेक्सनेही एका ठराविक रेंजमध्ये कामकाज केले आहे.
नवीन लोक डिमॅट विषयी माहिती मराठी मधून याठिकाणी वाचू शकतात शकतात.
  इथे 👉 डिमॅट अकाउंट UPSTOX ओपन करून ट्रेडिंग सुरू करू शकता.
Majhemarket

सर्व संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.

 मार्केट साठीचे सकारात्मक संकेत |MARKET POSITIVE TRIGGERS 

  1. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची  ९५ अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक निर्यात झालेली आहे याचाच अर्थ आपला देशातील आर्थिक परिस्थिती हळू हळू कोविड मधून सावरत आहे.
  2. Q4 चे रिझल्ट संपले असून ते बऱ्यापैकीं लागलेले आहेत आता पुढच्या आठवडय़ापासून Q1 चे रिझल्ट यायला सुरवात होईल हे पण चांगले येण्याची शक्यता असेल.
  3. मुडीजने भारताचा GDP ग्रोथ रेट 2021/22 मध्ये चांगला राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे, शिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा थोडासाच परिणाम Q1 रिझल्टवर होईल असाही अंदाज व्यक्त केलेला आहे.
  4. लसीकरणाने जवळपास 34 कोटींचा टप्पा पार केला आहे. लसीकरण वेग कमालीचकमालीचा वाढला आहे.
  5. आर्थिक वर्ष 2021/22 च्या पहिली तिमाही संपताना डायरेक्ट टॅक्स 1.85 लाख करोड इतके झाले आहे.
  6. जून मध्ये परकीय गुंतवणूक दाराचा indian equity  मध्ये कल वाढत आहे 5848.76 करोड  इंडियन मार्केट मध्ये आले आहेत.
  7. अपेक्षेप्रमाणे  रिझर्व्ह  बँकेने तिच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवले. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दर किमान अशा ४ टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे जाहीर केले.
  8.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
  9.  केंद्र सरकारने 18 वर्षावरील लसीकरण पूर्णपणे मोफत सुरू केलेले आहे. शिवाय लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी खाजगी मधे कमी किमती मधे लस उपलब्ध होत आहे.
  10. जीएसटी (GST) कलेक्शन मे महिन्यात 1.02 लाख करोड झाले आहे, जुन चे आकडे सकारात्मक येण्याची अपेक्षा आहे.
  11. डॉलर इंडेक्स 92.248 आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  12. रिलायन्स पून्हा बुलिश झालेला आहे निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
  13. FII ने सतत दोन महिने विक्री केल्यानंतर जूनमध्ये 3162 करोड  खरेदीचे आकडे दिलासा देणारे वाटताहेत. DII ने सलग तिसऱ्या महिन्यात खरेदी दर्शविलेली आहे.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत | MARKET NEGATIVE TRIGGERS 

  1. इंडिया वीक्स ( VIX)12.09  एवढा आहे  ओव्हरसोल्ड  दिसत असला तरी सतर्क राहणे गरजेचे आहे. कारण विक्स 10 ते 12 दरम्यान असल्यास मार्केटचि दिशा बदलु शकतो किंबहुना मार्केट जास्त बेअरिश/बुलिश होण्याचा धोका संभावत असतो.
  2. मार्केटचा पीई (PE) 28.33 एवढा आहे. 
  3. यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.431 एवढा आहे.
  4. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे सतत वाढून येणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
  5. भारतीय रुपया 74.76 आहे तो सतत वाढतांना दिसून येत आहे याने चालू खात्यावर दबाव येऊ शकतो.
  6. crude oil $76.06 वर आले आहे, शिवाय ते जवळपास $80 पर्यत जाण्याचि  शक्यता आहे. या वाढत जात असलेल्या किमती भारतीय मार्केट साठीची धोक्याची घंटा होऊ शकते.
  7. या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 0.80 एवढा आहे. तर जूलै महिन्याचा पीसीआर 1.28 एवढा आहे.
  8. Covid-19 चा धोका कमी होत असतानाच नवीन डेल्टा प्लस व्हेरीअंट मुळे चिंता पुन्हा वाढत आहेत. काही ठिकाणी निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच WHO ने हा विषाणू 100 देशात पसरला असल्याचा जाहीर केलं आहे,
  9. या आठवडय़ात खासकरून FII आणि DII यांच्या खरेदी विक्रीवर मार्केटचि दिशा बदलू शकते.

05 जुलै  ते 09 जुलै स्टॉक मार्केट ची दिशा काय असेल ? | WHAT IS STOCK MARKET DIRECTION ON 5-9 JULY ?

          जुलै महिन्याची सुरुवात काहीशी सावध झालेले आहे, मागील काही वर्षांचा ऐतिहासिक डेटा पाहता जुलैची मंथली सेरिज बहुतेक मार्केट साठी सकारात्मकपर राहिलेली आहे. या आठवड्यासाठी साठी ग्लोबल मार्केट कडून मिळणारा सहारा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तसेच निफ्टी विकली चार्ट वरही बेरीश कॅन्डल स्टिक बनलेली आहे. हे सर्व लक्षात घेऊन त्याच बरोबर डेल्टा व्हेरीअँट  चा धोका काही प्रमाणात वाढत आहे, हा धोका लक्षात घेतला तरी लसीकरणाचा वेग कमालीचा वाढलेला दिसत आहे याने मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटीमेंट तयार होण्यासाठी मदत होणार आहे. गेले काही आठवडे मार्केट एका ठराविक रेंजमध्ये कामकाज करत आहे. या आठवड्यातही तीच शक्यता आहे, त्याबरोबरच मार्केट आपल्या सपोर्ट लेवल वरती एकदा जाण्याची शक्यता आहे. सर्व रिझल्ट संपले आहे आणि Q1 चे रिझल्ट साठी काही वेळ बाकी आहे त्यामुळे बातम्यांचा आधारही या आठवड्यासाठी नसेल. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे कच्च्या तेलाचे सतत वाढणारे भाव ही आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि चार्टचा टेक्निकली अभ्यास करता या आठवड्यासाठी आपला अंदाज हा…
कन्सोलिडेशन ते काहीसा नकारात्मक असा असेल CONSOLIDATION TO SLIGHTLY BEARISH  
   

 निफ्टी 5 ते 9 जुलै अंदाज |5-9 JULY NIFTY ANALYSIS 

  • निफ्टी 50 PE 29.79 आहे.
  • निफ्टीचा बंद भाव हा 15722 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 15747आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम25 पॉइंट एवढा आहे.
  • वीकलि PCR 0.80 आणि मंथली PCR 1.28 असलेला आपणास दिसून येतो.
  • ऑपशन चैन चा विचार केला तर  या आठवडयात:
    15800 च्या कॉल वरती 4226550,
    16000 च्या कॉल वरती 3188355, 
    15600 PE वर 2720175,
    15500 PE 2736600 एवढा ओपन इन्टेरेस्ट आहे.                   
  • मंथली सेरिज च्या कॉल वरती 15800 ce वर 1453200,                 16000 ce वर 2656950 तर 15500 PE वर 305600,   15000 PE वर 3021350 एवढा ओपन इन्टेरेस्ट असलेला दिसून येतो.
आपल्या सर्व अंदाजामधे आपण ऑप्शन चेन विषयी आकडेवारी देत असतो. पण बहुतेक लोकांना ऑप्शन चेन म्हणजे काय ? ती कशी वाचातात आणि ट्रेडिंग साठी तिचा काय उपयोग असतो? हेच माहिती नसते आणि जर त्या विषयी मराठी मधे सविस्तर माहिती हवी असल्यास  खाली comment मधे किंवा telegram channel वर कळवा. आपण लवकरच माहिती प्रकाशित करु

 निफ्टी अपसाईड लेवल :

                निफ्टीने तिच्या बंद भाव  15722 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15820/30 हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे.यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 15900/20 येउ शकते हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल. शिवाय बँक निफ्टी आणि ग्लोबल मार्केट सकारात्मक असेल तर 16000 लेव्हल येऊ शकते परंतु हि शक्यता फारच कमी असेल.

निफ्टी डाउन साईड लेवल : 

      निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15610/20असेल. या खाली एक तासाची किंवा एक दिवसाचि कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद झाली तर 15450/60 हि लेवल येऊ शकते  हे या आठवड्याचे टार्गेट असू शकते. या खाली एक दिवस बंद झाले तर 15200/50 हि लेवल येऊ शकते
शिवाय खूपच  नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 15140/50 पर्यंत जाऊ शकते.
निफ्टी जरी शुक्रवारी रिकव्हर झाली असली तरी सध्य स्थिती पाहता खालचेे टारगेट येण्याची शक्यता आहे. परंतु जे डेटामध्येेे दिसतंय तेच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

NIFTY 50 @ 15722

    R1-15820/30   R2 -15900/20-WT     R3- 16000

   S1 –
15600/20    S2- 15450/70 WT    S3-15200/50         

S4- 15100/150 

बँक निफ्टी 5 ते 9 जुलै अंदाज| 5-9 JULY BANKNIFTY ANALYSIS

  • बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर  0.79 आहे. तर महिन्याचा 0.97 आहे.
  • बँक निफ्टी चा पीई 23.78 ( PE)  आहे.
  • बँक निफ्टी चा बंदभाव 34810 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 34971एवढा आहे  म्हणजेच  प्रिमीयम 161 पॉईंट चा आहे.
  • बँक निफ्टी च्या विकली सेरिज मधे 35000 CE वर 1135325,      35500 CE वर 1126300 तसेच 34000 PE वर   829125 आणि 34500 PE वर 839550 एवढा ओपन इंटरेस्ट असून,  मंथली सीरीज़ मध्ये 36000 CE वर 448125, 37000 CE वर 578425  आणि  34000 PE वर 490850,  तर 33000 PE वर 346450 एवढा ओपन इन्टेरेस्ट असलेला दिसून येतो.

बँक निफ्टी अप साइड लेवल : 

           बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 34810 पासुन वरती जायला सुरुवात केली तर 35300ही लेवल असेल जि कि मार्केट साठी अतिशय महत्वपुर्ण आहे. 35300 वर जर मार्केट sustain झालि तर निफ्टी बँक वर जाण्याची शक्यता असेल. (हि आपली पहिली लेवल असेल.) यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 35490/35510 ही दुसरी लेवल असेल जे कि हे या आठवड्यासाठीचे वरचे टारगेट असेल यावरती 1 दिवस बँक निफ्टी बंद झाली तर 35800/900 हि लेवल येऊ शकते.

बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : 

            बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  34810 खाली जायला सुरुवात केली तर पहिला सपोर्ट  34450/70 ही लेवल असेल.
जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली तर  34900 ही लेवल येण्याची शक्यता असेल हे या वीकचे  खालचे टार्गेट असेल मार्केटची सद्यस्थिती पाहता बँक निफ्टी 33600 या लेवल पर्यंत येण्याची श्क्यता नाकारता येत नाही.
BANK NIFTY @ 34810

 R1- 35300 IMP     R2- 35500/550-WT    R3- 35800/900  

    S1- 34450/500    S2- 33900/75-WT   S3- 33600 
वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्विस 05 जुलै ते 09 जुलै अंदाज:


NIFTY financial services: @ 16438.3

future @16480.35

R1 – 16550/75   R2- 16750/75 – WT    R3- 16900 
S1 – 16325/300    S2- 16200/175 -WT     S3- 16100

महत्त्वाची बाब:

          
           वरील सर्व लेवल पाहता आपणास असे जाणवत असेल कि जरी या वीक चा PCR कमी असल्यामुळे मार्केट वरती जाण्याची शक्यता वाटतं असेल तरी मंथली PCR जास्त आहे. शिवाय जागतिक मार्केट या आठवड्यात सकारात्मक राहण्याची शक्यता (US मार्केट वगळता  ) फारच कमी आहे. जर जागतिक मार्केट सकारात्मक राहिले तर आपल्या वरच्या लेवल हि येऊ शकतात.  या वीक मध्ये  निफ्टी वीकली candle जर ग्रीन बंद झाली तर निश्चितच आपण 16500 च्या दिशेने वाटचाल करत असेल.
                 यावरून आपणास असे दिसून येते कि  या आठवडाभरात निफ्टी, बँकनिफ्टी जुलै महिन्याची दिशा ठरवणारा वीक असेल.
याही आठवडाभरात आपणास दोन्हीकडे ट्रेडिंग करण्याची संधी मिळू शकते. हे weekly prediction असल्यामुळें काही नवीन बाबी समोर आल्या आणि त्यांचा थेट मार्केट वर परिणाम होत असेल तर आपण तसी सूचना वेळोवेळी टेलिग्राम चॅनल वर देत असतो.
DISCLAIMER :  वरील सर्व एनालिसिस दिसणार्‍या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.

Leave a Comment