JUNE 2021 STOCK MARKET MONTHLY EXPIRY | जुन 2021 स्टॉक मार्केट मंथली एक्सपायरी

 

Stock Market jun monthly expiry Prediction|स्टॉक मार्केट जुन मंथली  प्रेडिकशन |स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 

PREDICTION 13 :-

14 जुन ते 18 जुन स्टॉक मार्केटचा आढावा : 

       आतापर्यंत माझे मार्केट यावर आपण बारा अंदाज व्यक्त केलेले आहेत. त्यापैकी गेल्या आठवड्याचा पकडून अकरा अंदाज बरोबर आलेले आहे. मार्केटमध्ये होणारे चढ-उतार समजून दोन्ही बाजूची संधी मिळण्यासाठी आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स अशा दोन्ही बाजूच्या लेवल देण्याचा प्रयत्न करत असतो. मागील आठवड्यात आपण दिलेल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स या लेवल मार्केटमध्ये पुन्हा एकदा बरोबर आलेल्या  आहेत. निफ्टीचा भाव जरी सर्वोच्च स्तरावर असले तरी वरती जाण्यात तिला अडथळे निर्माण होत आहे. एका करेक्शन ची मार्केटमध्ये आवश्यकता आहे ते या आठवड्यात येण्याचा प्रयत्न झाला. मार्केट एका रेंज मध्ये काम करत आहे हे आपले अनालिसिस सांगत होते आणि त्याच प्रमाणे मार्केट पुन्हा एकदा 15700 या लेवलच्या  जवळच बंद झालेले दिसले. निफ्टी बरोबरच बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्स सर्विस यांच्या लेवल ही आपण नमूद केलेल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्येच ट्रेड करताना पाहायला मिळाल्या, तसेच ग्लोबल मार्केट च्या तेजीला ही अडथळा निर्माण झाल्याचा पाहायला मिळाला. नाही म्हणायला यु एस बॉंड़ काही प्रमाणात कमी होऊन मार्केट साठी दिलासादायक झाला आहे. नवीन लोक डिमॅट विषयी माहिती मराठी मधून याठिकाणी वाचू शकतात शकतात.
  इथे 👉 डिमॅट अकाउंट UPSTOX ओपन करून ट्रेडिंग सुरू करू शकता.
Stock market prediction

सर्व संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत:

  1. देशात सुरू असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेनं  २७ कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत लसीच्या २७ कोटी २३ लाख ८८ हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.  लसीकरण मोहिमेच्या कालच्या १५४ व्या दिवशी सुमारे ३३ लाख जणांचं लसीकरण झालं आहे.
  2. आर्थिक वर्ष 2021/22 च्या पहिल्या तिन् महिन्यांतून डायरेक्ट टॅक्स 1.85 लाख करोड इतके झाले आहे.
  3. जून मध्ये परकीय गुंतवणूक दाराचा indian equity  मध्ये कल वाढत आहे 5848.76 करोड  इंडियन मार्केट मध्ये आले आहेत.
  4. अपेक्षेप्रमाणे  रिझर्व्ह  बँकेने तिच्या दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिरच ठेवले. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दर किमान अशा ४ टक्क्यांवर कायम ठेवत असल्याचे जाहीर केले.
  5.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
  6. कोविड लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी, केंद्रानं  डिसेंबरपर्यंत १२५ कोटी लसींच्या मात्राची केली व्यवस्था केली गेली आहे.
  7. नुकतेच केंद्र सरकारने 18 वर्षावरील लसीकरण पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत जसे लसीकरण वाढत जाईल ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
  8. देशात Covid चि स्थिती सुधारत आहे गेल्या आठवड्यात दैनंदिन रुग्ण संख्या 60,000 च्या आसपास आहे देश अनलॉक च्या दिशेने वाटचाल करत आहे.
  9. जीएसटी (GST) कलेक्शन मे महिन्यात 1.02 लाख करोड झाले आहे, या महिन्यासाठी चे जीएसटी कलेक्शनमध्ये घट जरी झालेली असली (एप्रिल1.41cr) तरी यामध्ये समजून घेण्यासारखा दुसरा पैलू म्हणजे कोरोना मुळे सर्व उद्योगधंदे प्रभावित झाले असताना देखील  जीएसटी गेले काही महिने वाढत चालला आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत हळू हळू सकारात्मक पणा येत आहे. याचा अर्थ कोरोना मधून बाहेर पडल्यानंतर अर्थव्यवस्था धावायला तयार आहे. हे येणाऱ्या काळात मार्केट साठीचे सर्वातसकारात्मक घटक असू शकतात.
  10. डॉलर इंडेक्स 92.325आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  11. भारतीय रुपया 73.23आहे. रुपयाचा भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा वाढला आहे. परंतु एकंदरीत स्थिर असल्याकारणाने आयात-निर्यात खाते स्थिर आहे. त्यामुळे जास्त चढ-उतार न होणे हे मार्केट साठी चांगले संकेत असतात.
  12. रिलायन्स बुलिश झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कन्सोलिडेशन मध्ये असलेला रिलायन्सने तेजीच्या बाजूचा ब्रेक आऊट दिलेला आहे.निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
  13. निफ्टी मधील बऱ्याचशा कंपन्यांचे Q4 रिझल्ट संपत आहेत. ते बर्‍यापैकी चांगले लागले आहेत.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:

  1. इंडिया वीक्स ( VIX) 14.80 एवढा आहे.कमी जास्त होत असला तरी सतर्क राहणे गरजेचे आहे.
  2. मार्केटचा पीई (PE) 29.08 एवढा आहे. पीई  दिसायला जरी कमी असला. तरी हा नवीन पद्धतीने मोजण्यात येणारा पीई आहे जर तो जुन्या पद्धतीने ऍडजेस्ट केला तर तो 38-40 च्या आसपास येईल.
  3. यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.443एवढा आहे. काही प्रमाणात कमी होत असलेला बॉंड़ यील्ड या लेवल ला स्थिर होण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु us मध्ये मंदी सद्रुश्य् परिस्थिती जाणवत आहे  या आठवड्यात us मार्केट नकारात्मक असेल.
  4. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे वाढणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
  5. यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे. यु एस मधील कॉर्पोरेट गेन टैक्स ( CGT) वाढवण्याची तयारी चालू आहे याचाही परिणाम अमेरिकन  मार्केटवर होऊ शकतो.
  6. crude oil च्या वाढत जात असलेल्या किमती भारतीय मार्केट साठीची धोक्याची घंटा होऊ शकते.
  7. शिवाय येणाऱ्या आठवडाभरात जागतिक मार्केट कन्सोलडेशन फेज मध्ये असतील याचा खूप मोठा परिणाम भारतीय मार्केट वर पडू शकतो, त्यामुळे proffit booking कधीही होऊ शकते त्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.
  8. या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 1.02 एवढा आहे. तर जूलै महिन्याचा पीसीआर 1.65 एवढा आहे. मागील आठवड्याचा विचार करता थोडासा वाढलेला दिसून येतो . 
  9. Covid-19 साथीच्या तडाख्यात सापडलेल्या चालू आर्थिक वर्षातील देशाचा एकूण विकास दर अंदाज  रिझर्व्ह  बँकेने कमालीचा खाली  आणला आहे.
  10. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो  जवळपास -2.20 %तर बँक निफ्टी साठी जवळपास -0.40%एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो.
  11. मे महिन्यात एफ आय आय ( FII) ने  8,427.73 करोडची विक्री केलेली आहे. एप्रिल महिन्यातील विक्री नंतर पुन्हा FII  कडून विक्रीचे आकडे चिंता वाढवणारे अहेत.
  12. या आठवडय़ात खासकरून FII आणि DII यांच्या खरेदी विक्रीवर मार्केटचि दिशा बदलू शकते.

21 जून ते 25 जून मार्केट ची दिशा काय असेल ?

             मार्केट विषयी उपलब्ध असणारा डेटा, काही टेक्निकल अनालिसिस केल्यावर तसेच त्याच्या साथीला असणाऱ्या ग्लोबल आणि आपल्या देशातील घडामोडींचं एकत्रित विचार करता, आपण आठवड्यासाठी दिशा ठरवत असतो. कोरोनाची रुग्ण संख्या कमी कमी होत आहे. या सर्वांबरोबर रेटिंग एजेन्सि कडून रेटिंग कमी होण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही.याआठवड्यात ग्लोबल मार्केट कडून जास्त तेजीची अपेक्षा नाही, जास्त करून us फेड बँकेनं केलेल्या स्टेटमेन्ट मुळे,
Dow मार्केट शुक्रवारी जवळपास 533 अंकानि कोसळले जर us मार्केट असेच कोसळत राहिले तर याचा परिणाम भारतीय शेअर मार्केट वर होत राहील.
महाराष्ट्र व इतर राज्यात  बंधनात काही प्रमाणात शिथीलता आणली आहे. थोडक्यात आपण अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्याचा सकारात्मक परिणाम उद्योगधंद्यांवरती दिसू लागलेला आहे.  भारतीय मार्केट शुक्रवारी रिकव्हर होऊन  बंद झालेले आहे. परंतु नकारात्मक बाबी लक्षात घेता या आठवड्यासाठी तरी 15750/60 हि लेवल खुप महत्वपुर्ण असेल कारण हि लेवल मार्केटचि पुढील दिशा ठरवू शकते.
या आठवड्यासाठी मार्केटचा आपला अंदाज थोडासा कन्सोलडेशन असणार आहे. ( buy on deep)

निफ्टी 21जुन ते 25 जुन अंदाज :

  • पी सी आर ( PCR ) आहे. 1.02
  • निफ्टी चा पी ई ( PE)   26.63 एवढा आहे.
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केलातर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 15800(CE) च्या कॉलवर  3929925एवढा आहे. तर 16000 च्या कॉल वर (CE)4465800 वर ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 15500PE वर 3807000 तर 15000 PE वर 5249475एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • निफ्टीचा बंद भाव हा 15683.35 आहे, तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 15727.50 आहे. म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम 44.15 पॉइंट एवढा आहे.

 निफ्टी अपसाईड लेवल :

                निफ्टीने तिच्या बंद भाव  15683.35 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15730/50 हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे.यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 15820/40 येउ शकते हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल. शिवाय बँक निफ्टी आणि ग्लोबल मार्केट सकारात्मक असेल तर 16000 लेवल येऊ शकते परंतु हि शक्यता फारच कमी असेल.

निफ्टी डाउन साईड लेवल : 

      निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15550/70असेल  जोपर्यंत या खाली एक तासाची किंवा एक दिवसाचि कॅन्डल स्टिक  बंद होत नाही तोपर्यंत मार्केट बुलिश आहे.जर त्याखाली बंद झाले, तर 15470/80 हि लेवल येऊ शकते, या खाली एक दिवस बंद झाले तर 15230/50 हा भाव येऊ शकतो, जे कि या आठवड्याचे टार्गेट असू शकते.
शिवाय खूपच  नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 14950 पर्यंत जाऊ शकते.
निफ्टी जरी शुक्रवारी रिकव्हर झाली असली तरी सध्य स्थिती पाहता खालचेे टारगेट येण्याची शक्यता आहे. परंतु जे डेटामध्येेे दिसतंय तेच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

NIFTY 50 @ 15683.35

    R1-15730/50   R2 -15820/40-WT     R3- 16000/25

   S1 –
15575/50    S2- 15480/50 WT    S3-15230/50 

बँक निफ्टी 21 जून ते 25 जून अंदाज:

  • बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर  0.78 आहे. तर जुलै  महिन्याचा 1.08 आहे.
  • बँक निफ्टी चा पीई 24.11 ( PE) आहे.
  • बँक निफ्टी चा बंदभाव 34558 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 34714 एवढा आहे 156 म्हणजेच प्रिमीयम पॉईंट चा आहे.
  • ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी जे की. 35500 CE कॉल वरती 1224075  तर 35500 कॉल वर 1024850. तर 34500 PE वर 760875 आणि 34000 PE वर97420  एवढा ओपन इंटरेस्ट आहे.

बँक निफ्टी अप साइड लेवल : 

           बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 34558 पासुन वरती जायला सुरुवात केली, तर 34825/50 ही लेवल असेल जि कि मार्केट साठी अतिशय महत्वपुर्ण आहे. हि आपली पहिली लेवल असेल. यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 35350/70 ही दुसरी लेवल असेल जे कि हे या आठवड्यासाठीचे वरचे टारगेट असेल. यावरती 1 दिवस बँक निफ्टी बंद झाली तर 35650/75 हि लेवल येऊ शकते.

बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : 

            बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  34558 खाली जायला सुरुवात केली तर पहिला सपोर्ट  33920/40 ही लेवल असेल.
जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, आणि एखादी वाईट बातमी आली तरच 33700 ही लेवल येण्याची शक्यता असेल. हे या वीकचे  खालचे टार्गेट असेल मार्केटचि सद्यस्थिती पाहता बँक निफ्टी या लेवल पर्यंत येण्याची श्क्यता नाकारता येत नाही.
BANK NIFTY @ 3458

    R1- 34825/50     R2- 35350/75-WT     R3- 35650/700  

    S1- 33950/900       S2- 33700/650-WT   S3- 33000 
वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्विस 21 जून ते 25 जुन अंदाज :

FTY financial services: @ 16419.25

future @16490.75

R1 – 16550/600   R2- 16725/50 – WT    R3- 16850 
S1 – 16220/50    S2- 16130/100 -WT     S3- 15980/50

महत्वाचे काही:

                      वरील सर्व लेवल पाहता आपणास असे जाणवत असेल कि जरी या वीक चा PCR कमी असल्यामुळे मार्केट वरती जाण्याची शक्यता वाटतं असेल. परंतु पुढे नवीन महिना चालू होत आहे त्याचा PCR जास्त आहे. शिवाय जागतिक मार्केट या आठवड्यात सकारात्मक राहण्याची शक्यता फारच कमी आहे. जर जागतिक मार्केट सकारात्मक राहिले तर आपल्या वरच्या लेवल हि येऊ शकतात. निफ्टीचि वीकली candle जर ग्रीन बंद झाली तर निश्चितच आपण 16500 च्या दिशेने वाटचाल करत असेल.
                 मार्केटमध्ये जर पडझड झालीच तर फंडामेंटल चांगले असणारे स्टॉक धरून ठेवायला काही हरकत नाही. परंतु मागील काही महिन्यात कैश ( cash) स्टॉक खूपच वरती गेलेले आहेत, त्या मधून बाहेर पडणे किंवा काही नफा पदरात पाडून घेणे आणि स्टॉप लॉस चा वापर करणे योग्य राहील. मार्केट साठी 15200 ही लेवल खूप महत्त्वाची आहे त्यावरती लक्ष असू द्या.

Leave a Comment