Stock Market Weekly Prediction 31MAY2021 |स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 31मे २०२१

 

Stock Market Weekly Prediction 31MAY – 04JUNE |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन 31मे – 4जुन २०२१|स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 

PREDICTION 10 :-

24 मे ते 28 मे स्टॉक मार्केटचा आढावा : 

                                      गेल्या आठवड्यातील स्टॉक मार्केटचा साप्ताहिक अंदाज हा आपला 9वा अंदाज होता यामधील आठ अगदी बरोबर आलेले आहे. गेल्या सप्ताहातील प्रेडिक्शन मध्ये माझे मार्केटने दिलेल्या लेवल तंतोतंत आलेल्या आहे, त्या तुम्ही पाठी मागील लेखात जाऊन पाहू शकता. 15250 ते 285 या आपल्या पहिल्या रेजिस्टन्स वर मार्केट ने पहिले दोन दिवस घालवले आणि त्यानंतरही मार्केटचा /निफ्टीचा बंद भाव हा अगदी आपल्या विकली टारगेट च्या जवळच आहे. त्याचप्रमाणे बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्स सर्विस यांच्याही लेवल जवळपास आलेल्या आहेत. बर्‍याच जणांचा हा प्रश्न असतो की दोन्ही बाजूच्या लेवल का दिल्या जातात त्यासाठी सांगणे आहे, मार्केटमध्ये जसा डेटा महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे आठवड्याच्या मध्ये घडणाऱ्या घटना आणि बाकीचे मार्केट वरती परिणाम करणारे घटक हेही तेवढेच महत्त्वाचे असतात त्यामुळे जर आपल्या अंदाजाचा विपरीत मार्केट ची दिशा होत असेल, तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने त्या परिस्थितीला हाताळले पाहिजे किंवा त्यामध्ये ही नफा कमावता आला पाहिजे यासाठी दोन्ही बाजूच्या लेवल दिल्या जातात. त्याचबरोबर मार्केट मध्ये एकच दिशा घेऊन चालता येत नाही मार्केट बरोबर बदलण्याची लवचिकता जर अंगी आली तरच मार्केटमध्ये टिकता येईल. रिलायन्स विषयी गेल्या दोन-तीन लेखांमध्ये आपण कन्सोलिडेशन मधून रिलायन्स बाहेर पडतोय याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे रिलायन्स ने शुक्रवारच्या एका सत्रात सहा टक्के तेजी दर्शविली. जे वाचक मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी डिमॅट विषयी सर्व माहिती या लेखात मिळेल. – डिमॅट माहिती मराठी मधे 
Stock market weekly prediction

सर्व संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत:

  1. आरबीआयकडून अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत सी पी आय ( CPI) 4.29% एवढा आहे.6% च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट साठी ते फायदेशीर आहे.
  2.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
  3. यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे.उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच अमेरिकन मार्केट आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कामकाज करत आहे.
  4. लसीकरण हे कोरोना घालवण्यासाठी आणि मार्केटच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. 18 वर्षावरील लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत याचा वेग वाढणे गरजेचे आहे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जसे लसीकरण वाढत जाईल ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते. गेल्या आठवड्यात नोंदवल्या गेलेल्या आकडेवारी अनुसार दररोज भारताने सरासरी 1,603,332 डोस दिलेले आहेत अगदी या दराने देशातील 10% लोकांना लसीकरण करण्यासाठी 171 दिवस लागतील. ही एक दिलासा देणारी बाब आहे परंतु अजूनही कोरोना धोक्याच्या पातळी वर आहे.
  5. जीएसटी (GST) कलेक्शन एप्रिल साठी 1.41 लाख करोड झाले आहे. हे ऐतिहासिक उच्च कलेक्शन आहे. मे महिन्याची आकडेवारी लवकरच प्रकाशित होईल, या महिन्यासाठी चे जीएसटी कलेक्शनमध्ये घट होऊ शकते याचा मार्केटला अंदाज येत आहे यामध्ये समजून घेण्यासारखा दुसरा पैलू म्हणजे कोरोना मुळे सर्व उद्योगधंदे प्रभावित झाले असताना देखील  जीएसटी गेले काही महिने वाढत चालला आहे. ( मार्च 1.21 लाख कोटी) म्हणजेच अर्थव्यवस्थेत काहीतरी सकारात्मक पणा येत आहे. याचा अर्थ कोरोना मधून बाहेर पडल्यानंतर अर्थव्यवस्था धावायला तयार आहे. हे येणाऱ्या काळात मार्केट साठीचे सर्वात सकारात्मक घटक असू शकतात.
  6. डॉलर इंडेक्स 90.04आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  7. भारतीय रुपया 72.39आहे. रुपयाचा भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी झाला आहे. परंतु एकंदरीत स्थिर असल्याकारणाने आयात-निर्यात खाते स्थिर आहे. त्यामुळे जास्त चढ-उतार न होणे हे मार्केट साठी चांगले संकेत असतात.
  8. रिलायन्स बुलिश झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कन्सोलिडेशन मध्ये असलेला रिलायन्सने तेजीच्या बाजूचा ब्रेक आऊट दिलेला आहे.निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
  9. निफ्टी मधील बऱ्याचशा कंपन्यांचे Q4 रिझल्ट संपत आहेत. ते खूपच चांगले येत नसले तरी अपेक्षा कमी असल्याकारणाने अपेक्षे पेक्षा ते बर्‍यापैकी चांगले लागले आहेत. 
  10. निफ्टीचा बंद भाव  15435.65 हा आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव हा 15478 आहे म्हणजेच 42.35 पॉईंटचा प्रीमियम आहे. हा प्रीमियम हा मार्केट साठी सकारात्मक संकेत आहे.
  11. मे महिन्यामध्ये डी आय आय ( DII) ने 1887.45 करोडची खरेदी केलेली आहे.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:

  1. इंडिया वीक्स ( VIX) 17.40 एवढा आहे.
  2. मार्केटचा पीई (PE)  28.98 एवढा आहे. पीई  दिसायला जरी कमी असला. तरी हा नवीन पद्धतीने मोजण्यात येणारा पीई आहे जर तो जुन्या पद्धतीने ऍडजेस्ट केला तर तो 38-40 च्या आसपास येईल. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय तो सतत कमी होत आहे. जवळ जवळ सकारात्मक लेवल ला आला आहे.
  3.  यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.583 एवढा आहे. काही प्रमाणात कमी होत असलेला बॉंड़ यील्ड या लेवल ला स्थिर होण्याचा प्रयत्न करत आहे. 
  4. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे वाढणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
  5. यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे. यु एस मधील कॉर्पोरेट गेन टैक्स ( CGT) वाढवण्याची तयारी चालू आहे.परिणामी अमेरिकन  मार्केट या आठवड्यात consolation फेज मध्ये राहण्याची शक्यता आहे.
  6. 4-5 हे दोन मुद्दे गेल्या दोन तीन आठवड्यापासून सतत येत आहे. मार्केट ने या दोन्ही वरती रिअक्शन दिलेली आहे. परंतु हे मुद्दे अजूनही पूर्णत्वाला गेले नाहीत, ते कधीही निर्णय होऊ शकतात आणि पुन्हा मार्केट मध्ये त्या अनुषंगाने बदल होऊ शकतो म्हणून पुन्हा पुन्हा देत आहोत.
  7. या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 1.07 एवढा आहे. तर जून  महिन्याचा पीसीआर 1.52 एवढा आहे. 
  8. Covid-19 व्हॅक्सिनेशन मध्ये पुन्हा अडथळे येतान दिसतायत, बऱ्याच ठिकाणी 18 वर्षावरील जे लसीकरण सुरू केले होते ते स्थगित करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट वरती खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. लसीकरणाची गती ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होती, त्या प्रमाणात वाढ झालेली नसली तरी काही प्रमाणात लसीकरण चालू झालेले आहे. 
  9. कोरोना बरोबरच ब्लॅक फंगस ( MUCORMYCOSIS ) चा खूप मोठा धोका उद्भवलेला आहे. यामध्ये मृत्यूदर ही जास्त असल्या कारणाने हा आजार धोकादायक बनला आहे. याबरोबरच व्हाईट फंगस चा धोका वाढत आहे.
  10. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो – 1.66 (nifty upside 3.65% & down side -6.06%)तर बँक निफ्टी साठी -0.16(upside 2.44 & down side -0.40)एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो.
  11. क्रुड ऑईल ही काही प्रमाणात वाढत आहे. त्याचा भाव $69.01 एवढा आहे. 
  12. मे महिन्यात एफ आय आय ( FII) ने  8,427.73करोडची विक्री केलेली आहे. एप्रिल महिन्यातील विक्री नंतर पुन्हा FII  कडून विक्रीचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.
  13. जगातील काही  मुख्य रेटिंग एजन्सी भारताचे रेटिंग कमी करण्याची शक्यता आहे. ही एक भारतीय मार्केट साठी चिंताजनक बाब आहे. फिचने तर भारतीय सोवरिन बॉण्डची रेटिंग BBB  केलेली आहे. कदाचित याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून एफ आय आय विक्री करताना दिसत आहे.

31 मे ते 4 जून मार्केट ची दिशा काय असेल ?

      मार्केट विषयी उपलब्ध असणारा डेटा, काही टेक्निकल अनालिसिस केल्यावर तसेच त्याच्या साथीला असणाऱ्या ग्लोबल आणि आपल्या देशातील घडामोडींचं एकत्रित विचार करता, आपण आठवड्यासाठी दिशा ठरवत असतो. यावेळेस जून महिन्यासाठीची मंथली सिरीज ही चालू होत आहे. त्यामुळे मे महिन्यातील किती रोल ओवर झालेला आहे हा एक घटक लक्षात घेऊन दिशा ठरवावी लागते. कोरोनाची रुग्ण संख्या ही मार्केट साठी एक चिंताजनक बाब आहे, त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आलेले आहे. याने एक दिलासा मिळाला आहे परंतु त्या बरोबर आहे ब्लॅक फंगस-व्हाईट फंगस याचा धोका समोर उभा राहिलेला आहे. या सर्वांबरोबर रेटिंग कमी होण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही व्हॅक्सिनेशन लसीकरण यची गती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न यावर पुढील दिशा अवलंबून राहील या आठवड्यात ग्लोबल मार्केट कडून जास्त तेजीची अपेक्षा नाही. महाराष्ट्र व इतर राज्यात एक जून पासून बंधनात काही प्रमाणात शिथीलता येण्याची शक्यता आहे त्याचा सकारात्मक परिणाम उद्योगधंद्यांवरती दिसू शकतो.

   भारतीय मार्केट  पॉझिटिव्ह ब्रेक आउट देऊन वरती उच्च स्तरावर   बंद झालेले आहे. परंतु नकारात्मक बाबी लक्षात घेता या आठवड्यासाठी तरी मार्केट वरती सुरू झालेत तर खाली येण्याची आणि खाली सुरू झाले तर वरती जाण्याची शक्यता आहे.

या आठवड्यासाठी मार्केटचा आपला अंदाज थोडासा सकारात्मक (SIDEWAYS TO SLIGHTLY BULLISH) असणार आहे.

निफ्टी 31मे ते 4 जुन अंदाज :

  • पी सी आर ( PCR ) 1.07आहे. 
  • निफ्टी चा पी ई ( PE) 28.98 एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे. पहिला अंदाज व्यक्त केला होता तेव्हा PE कीती हा खरेदी साठी योग्य आहे याची माहीती दिली आहे.
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 16000 च्या कॉल (CE) वर 4061850 एवढा आहे. तर 15500  च्या कॉल  (CE) वर 2704350ओपन इंटरेस्ट आहे. तसेच 15300PE वर 2564250 तर 15000 PE वर  2363850 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • या जुन महिन्याचा विचार करता 16000 CE वर 2509350 तर 15500 CE वर 1564800 आणि 14500 PE वर 2729625 तर 15000 PE वर 2228325 एवढा ओपन इंटरेस्ट आहे. यातुन या महिन्यासाठी 14500 ते 16000 ही रेंज दिसुन येते.
  • निफ्टीचा बंद भाव हा 15435.65 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 15448 आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम  42.35 पॉइंट एवढा आहे.

 निफ्टी अपसाईड लेवल :

  •  निफ्टीने तिच्या बंद भाव 15435.65 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15520/15550 हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे. यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 15620/15645 येउ शकते यावरती 1दिवस मार्केट बंद झाले. तर आपली तिसरी लेवल 15760/785 ही येऊ शकते. हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल. यावर 1 तासाची किंवा 1 दिवसांचा कॅन्डल स्टिक बंद झाली तर 16000 हा सर्वोच्च स्तर निफ्टी प्राप्त करू शकते. निफ्टी 16000 पर्यत पोहोचण्याची या आठवडयात तरी शक्यता कमीच आहे.

निफ्टी डाउन साईड लेवल : 

  • निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15285/250 हा असेल जोपर्यंत एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद होत नाही, तोपर्यंत खालची लेवल येण्याची शक्यता कमी आहे. दुसरी लेवल 15100/075 ही असण्याची शक्यता आहे. नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 14950/14970 पर्यंत जाऊ शकते. हीच या आठवड्यासाठी चे खालचेे टारगेट असू शकते.
  •  निफ्टीने पॉझिटिव ब्रे्कआउट दिलेला आहे त्यामुळे खालचेे टारगेट येण्याची शक्यता कमी आहे. परंतु जे डेटामध्येेे दिसतंय तेच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.

NIFTY 50 @ 15435.65

    R1-15520/50    R2 – 15620/45      R3- 15750 –WT

   S1 –
15285/50      S2- 15100/075     S3- 14950/70 – WT

बँक निफ्टी 31 मे ते 4 जून अंदाज:

  • बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर  0.72 आहे. तर महिन्याचा 0.82.
  • बँक निफ्टी चा पीई ( PE) 22.15
  • बँक निफ्टी चा बंदभाव 35141 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 35394 एवढा आहे म्हणजेच प्रिमीयम 253 पॉईंट चा आहे.
  • ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी जे की  जुन् महिन्याची  सुरवात आहे. 35000 CE कॉल वरती 936975 तर 36000 कॉल वर 911175. तर 35000 PE वर 891800 आणि 34500 PE वर  752425 एवढा ओपन इंटरेस्टआहे.
  • जुन महिन्याच्या एक्सपायरी विचार करता 36000 CE वर 320700 आणि 35000 CE वर 283425  तसेच 33000 PE वर 417500 आणि 34000 PE वर 235125 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.

बँक निफ्टी अप साइड लेवल : 

  • बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 35141 पासुन वरती जायला सुरुवात केली तर पहिला रेजिस्टन्स 35775/825 ही लेवल असेल. यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 36125 /175 ही दुसरी लेवल असेल आणि हे या आठवड्यासाठीचे वरचे टारगेट असेल. या वरती जर एक तासाची किंवा एक दिवसाची कॅण्डल स्टिक बंद झाली तर 36750 ही लेवल येण्याचीही शक्यता आहे परंतु ती कमी आहे.

बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : 

  • बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  35141.45  खाली जायला सुरुवात केली, तर पहिला सपोर्ट  34700 या लेवल वरती आहे. जर या खाली एक तासाची कॅण्डल बंद झाली. तर दुसरी लेवल 34100 ही असेल .जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली तर 33500 हेही टार्गेट येऊ शकते. हे या वीक साठीचे टारगेट असेल आणि जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, आणि एखादी वाईट बातमी आली तरच 32700 ही लेवल येण्याची शक्यता असेल परंतु याठिकाणी येण्याची शक्यता कमी आहे.
  • BANK NIFTY @ 35141.45

    R1- 35775/825       R2- 36125/75 -WT     R3- 36750 


    S1-  34750/700      S2- 34125/100- WT   S3- 33500

वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्विस 31 मे ते 4 जून अंदाज:

FTY financial services: @ 16495.30

future @16572.05

R1 – 16775/800   R2- 17100/150 – WT       R3- 17300 
S1 – 16250/16200    S2- 16000       S3- 15850/800-WT 


महत्वाच्या बाबी: 
                         वरती दिलेल्या सर्व या आठवड्यासाठीच्या लेवल आहेत. सर्वोच्च स्तरावर ती असलेली निफ्टी पुन्हा या आठवड्यात सर्वोच्च स्तर बनवण्याच्या शक्यता आहे. परंतु दोन्ही बाजूची ट्रेड ची संधी मिळू शकते, त्याप्रमाणे काम करावे. रिझल्ट संपत आलेले आहेत. त्यामुळे पुढील फायनान्शियल ईयर साठी काही चांगले स्टॉक शोधून पोर्टफोलिओ बनवण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करूनच  वेल्थ तयार होऊ शकते. त्यामुळे ट्रेडिंग करतानाच गुंतवणुकीला ही प्राधान्य द्या.
     आठवड्याच्या मध्ये होणाारे बदल याविषयी आपण टेलिग्राम चैनल वर अपडेट करत असतो. तुम्ही तिथे भेट देऊ शकता किंवा फेसबुक वर आपल्या पेजला लाईक करू शकता. नवीन लोकांसाठी डिमॅट ची सर्व माहिती या अगोदरच्या लेखांमध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी तिथेे भेट दयावेे.
DISCLAIMER :  वरील सर्व एनालिसिस दिसणार्‍या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.

2 thoughts on “Stock Market Weekly Prediction 31MAY2021 |स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 31मे २०२१”

  1. खूप अभ्यासपूर्ण विवेचन, धन्यवाद! शेअर बाजारात नव्याने प्रवेश करणारांना
    उपयुक्त!

    Reply

Leave a Comment