STOCK MARKET LEVEL COMING WEEK 24 MAY 2021 | 24 मे 2021या आठवडयात स्टॉक मार्केट लेवल

 

Stock Market Weekly Prediction 24 – 28 MAY 2021 |स्टॉक मार्केट विकली प्रेडिकशन 24 – 28 मे २०२१

PREDICTION 09 :-

17 मे ते 21 मे स्टॉक मार्केटचा आढावा : 

          17 मे ते 21 मे हा आपण दिलेला आठवा आठवड्यासाठी चा अंदाज होता. या अंदाजामध्ये आपण स्टॉक मार्केट ची दिशा बेरिश टु साइड वेज अशी व्यक्त केली होती ती अगदी चुकीची ठरलेली आहे. आठ पैकी हे पहिले चुकीचे परीक्षण आहे. या लेखामध्ये आपण मार्केट साठीच्या ज्या वरच्या लेवल दिल्या गेल्या होत्या त्या अगदी तंतोतंत बरोबर आलेल्या आहे. परंतु आपली दिशा ही बेरीश होती आणि मार्केट वरती बंद झाले. त्यामुळे हा अंदाज आपण चुकीचा ठरलेला आहे असे स्पष्ट करतो.
             यामधील काही बाबी समजून घेताना अगोदरच्या बऱ्याच लेखामध्ये उल्लेख केलेला आहे, कि मार्केट मध्ये काम करताना शंभर टक्के बरोबर येणे शक्य नाही. त्यामुळे आपण दोन्ही बाजूच्या लेवल देत असतो. त्यामुळे मार्केट मध्ये होणारे बदल लवकर समजावेत आणि त्यानुसार आपले ट्रेड बदलता यावे. निफ्टी चे वरचे टार्गेट 15125 हे दिले होते आणि या जवळ मार्केटने दोन दिवस कामकाज केले. तसेच बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्स सर्विस यांनीही त्यांचे वरच्या लेवल पूर्ण केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण रिलायन्स विषयी तेजीचे संकेत दिले होते ते अगदी बरोबर ठरले आहेत. आपला अंदाज जरी चुकीचा ठरलेला असला तरीही बऱ्याच याबाबतीत तो बरोबरही आलेला आहे. या ठिकाणी पुन्हा उल्लेख करत आहे मार्केट विषयीच्या प्रिडिक्शन मधे दोन्ही बाजूच्या लेवल दिल्या जातात त्यांच्यावर ती लक्ष असू द्या, सपोर्ट- रेजिस्टन्स जवळ नवीन ट्रेड ठरवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मार्केट विषयी येणाऱ्या बातम्या आणि ग्लोबल मार्केट चे संकेत पाळा.
Stock market weekly levels

सर्व संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच मार्केटच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केट अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत.

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत:

  1. आरबीआयकडून अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत सी पी आय ( CPI) 4% एवढा आहे, 6% च्या वरती जात नाही तोपर्यंत मार्केट साठी ते फायदेशीर आहे.
  2.  युएस फेडने 2023 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचे सांगितले आहे .
  3. यूएस मध्ये स्टिम्युलस पॅकेजचा पैसा लोकांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खर्च वाढत आहे.उत्पादनांची मागणी वाढत आहे. त्यामुळेच युएस मार्केट बुलिश आहे. आणि ते आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कामकाज करत आहे.
  4. लसीकरण हे कोरोना घालवण्यासाठी आणि मार्केटच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. 18 वर्षावरील लसीकरण जोमाने करण्याचा प्रयत्न केंद्र तसेच राज्य सरकारे करत आहेत याचा वेग वाढणे गरजेचे आहे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जसे लसीकरण वाढत जाईल ही बाब मार्केट साठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
  5. कोरोनाची रुग्ण संख्या गेल्या पुर्ण आठवड्यात 3 लाखाच्या खाली आलेले आहे. ही एक दिलासा देणारी बाब आहे परंतु अजूनही कोरोना धोक्याच्या पातळी वर आहे.
  6. जीएसटी (GST) कलेक्शन एप्रिल साठी 1.41 लाख करोड झाले आहे. हे ऐतिहासिक उच्च कलेक्शन आहे. मेच्या शेवटच्या  आठवड्यात प्रवेश करताना आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या महिन्यासाठी चे जीएसटी कलेक्शनमध्ये घट होऊ शकते याचा मार्केटला अंदाज येत आहे यामध्ये समजून घेण्यासारखा दुसरा पैलू म्हणजे कोरोना मुळे सर्व उद्योगधंदे प्रभावित झाले असताना जीएसटी गेले काही महिने वाढत चालला आहे. ( मार्च 1.21 लाख कोटी) म्हणजेच अर्थव्यवस्थेत काहीतरी सकारात्मक पणा येत आहे. याचा अर्थ कोरोना मधून बाहेर पडल्यानंतर अर्थव्यवस्था धावायला तयार आहे. हे येणाऱ्या काळात मार्केट साठीचे सर्वात सकारात्मक घटक असू शकतात.
  7. डॉलर इंडेक्स 89.90 आहे. हा भारतीय मार्केट साठी फायदेशीर आहे.
  8. भारतीय रुपया 72.91 आहे. रुपयाचा भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी झाला आहे. परंतु एकंदरीत स्थिर असल्याकारणाने आयात-निर्यात खाते स्थिर आहे. त्यामुळे जास्त चढ-उतार न होणे हे मार्केट साठी चांगले संकेत असतात.
  9. रिलायन्स कन्सोलिडेशन ते बुलिश राहण्याची शक्यता आहे. निफ्टी मधील सर्वात जास्त भर असलेला रिलायन्स निफ्टी ला वरती घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
  10. निफ्टी मधील बऱ्याचशा कंपन्यांचे Q4 रिझल्ट येत आहेत. ते खूपच चांगले येत नसले तरी अपेक्षा कमी असल्याकारणाने अपेक्षे पेक्षा ते बर्‍यापैकी चांगले लागत आहे. त्यामुळे हा एक मार्केट साठी चांगला संकेत आहे.
  11. निफ्टीचा बंद भाव 15175.30 हा आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव हा 15222 आहे म्हणजेच 46.7 पॉईंटचा प्रीमियम आहे. हा प्रीमियम हा मार्केट साठी सकारात्मक संकेत आहे
  12. मे महिन्यामध्ये डी आय आय ( DII) ने 2210 करोडची खरेदी केलेली आहे. ही खरेदी खूप जास्त नाही.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत:

  1. इंडिया वीक्स ( VIX) 19.08 एवढा आहे.
  2.  मार्केटचा पीई (PE) 29.48 एवढा आहे. पीई  दिसायला जरी कमी असला. तरी हा नवीन पद्धतीने मोजण्यात येणारा पीई आहे जर तो जुन्या पद्धतीने ऍडजेस्ट केला तर तो 38-40 च्या आसपास येईल. गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय तो सतत कमी होत आहे.
  3.  यु एस 10 इयर बॉंड़ यील्ड ( BOND YEILD) 1.623 एवढा आहे.काही प्रमाणात कमी होत असलेला बॉंड़ यील्ड या आठवड्यात मध्ये 1.667 अचानक खूप वरती गेला होता. 
  4. अमेरिकेमध्ये बेरोजगारीचे वाढणारे आकडे अमेरिकन मार्केट बरोबरच युरोपियन तसेच अशियन मार्केटवर दबाव निर्माण करत आहेत.
  5.  यूएस मध्ये बायडन सरकारने कार्पोरेट टॅक्स 21.28 टक्के पर्यंत वाढवण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच अतिश्रीमंत लोकांवर रिच टॅक्स लावणार असल्याचे सांगितले आहे.
  6. यु एस मधील कॉर्पोरेट गेन टैक्स ( CGT) वाढवण्याची तयारी चालू आहे. 5-6 हे दोन मुद्दे गेल्या दोन तीन आठवड्यापासून सतत येत आहे. मार्केट ने या दोन्ही वरती रिअक्शन दिलेली आहे. परंतु हे मुद्दे अजूनही पूर्णत्वाला गेले नाहीत, ते कधीही निर्णय होऊ शकतात आणि पुन्हा मार्केट मध्ये त्या अनुषंगाने बदल होऊ शकतो म्हणून पुन्हा पुन्हा देत आहोत.
  7. या आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 1.24 एवढा आहे. तर जून  महिन्याचा पीसीआर 1.73 एवढा आहे. आठवड्यासाठी चा पी सी आर जरी काहीसा सकारात्मक असला तरी जूनचा पीसीआर जास्त असल्याकारणाने आपण याला नकारात्मक संकेत मधे ठेवला आहे.
  8. पुन्हा या आठवड्यासाठी ही सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे तो म्हणजे कोरोना रुग्णसंख्या कालच्या आकडेवारीनुसार देशामध्ये प्रति दिवस 259000 रुग्णसंख्या पोहोचलेली आहे तर दररोज 4000 पर्यंत मृत्यू कोरोनामुळे देशात होत आहे. गेल्या काही दिवसातील ही संख्या जरी कमी वाटत असले तरीही अजून हि खूप जास्त आहे. 
  9. Covid-19 व्हॅक्सिनेशन मध्ये पुन्हा अडथळे येतान दिसतायत, बऱ्याच ठिकाणी 18 वर्षावरील जे लसीकरण सुरू केले होते ते स्थगित करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे लसीकरणाचे उद्दिष्ट वरती खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. लसीकरणाची गती ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होती, त्या प्रमाणात वाढ झालेली नसली तरी काही प्रमाणात लसीकरण चालू झालेले आहे. 
  10. कोरोना बरोबरच ब्लॅक फंगस ( MUCORMYCOSIS ) चा खूप मोठा धोका उद्भवलेला आहे. यामध्ये मृत्यूदर ही जास्त असल्या कारणाने हा आजार धोकादायक बनला आहे.
  11. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो -3.62 तर बँक निफ्टी साठी -4.09 एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो.
  12. क्रुड ऑईल ही काही प्रमाणात वाढत आहे. त्याचा बंद भाव $66.68 एवढा आहे. अगोदरच वाढलेल्या तेलाच्या किमतीत यामुळे वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसू शकतो.
  13. मे महिन्यात एफ आय आय ( FII) ने  10467 करोडची विक्री केलेली आहे. एप्रिल महिन्यातील विक्री नंतर पुन्हा FII  कडून विक्रीचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.
  14. जगातील काही  मुख्य रेटिंग एजन्सी भारताचे रेटिंग कमी करण्याची शक्यता आहे. ही एक भारतीय मार्केट साठी चिंताजनक बाब आहे. फिचने तर भारतीय सोवरिन बॉण्डची रेटिंग BBB  केलेली आहे. कदाचित याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून एफ आय आय विक्री करताना दिसत आहे.

24 मे ते 28 मे मार्केट ची दिशा काय असेल ?

      मार्केट विषयी उपलब्ध असणारा डेटा, काही टेक्निकल अनालिसिस केल्यावर तसेच त्याच्या साथीला असणाऱ्या ग्लोबल आणि आपल्या देशातील घडामोडींचं एकत्रित विचार करता, आपण आठवड्यासाठी दिशा ठरवत असतो. यावेळेस विकली एक्सपायरी बरोबरच मंथली एक्सपायरी ही आहे हा एक घटक लक्षात घेऊन दिशा ठरवावी लागते कोरोनाची रुग्ण संख्या ही मार्केट साठी एक चिंताजनक बाब आहे त्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आलेले आहे याने एक दिलासा मिळाला आहे परंतु त्या बरोबर आहे ब्लॅक फंगस याचा धोका समोर उभा राहिलेला आहे या सर्वांबरोबर रेटिंग कमी होण्याची संभाव्य शक्यता नाकारता येत नाही व्हॅक्सिनेशन लसीकरण यची गती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न यावर पुढील दिशा अवलंबून राहील या आठवड्यात ग्लोबल मार्केट कडून जास्त तेजीची अपेक्षा नाही.
   भारतीय मार्केट  पॉझिटिव्ह ब्रेक आउट देऊन वरती बंद झालेले आहे. परंतु नकारात्मक बाबी लक्षात घेता या आठवड्यासाठी तरी मार्केट वरती सुरू झालेत तर खाली येण्याची आणि खाली सुरू झाले तर वरती जाण्याची शक्यता आहे.
या आठवड्यासाठी मार्केटचा आपला   SIDEWAYS   असणार आहे. म्हणजे एका रेंज मध्ये काम करू शकते.

निफ्टी 24 मे ते 28 मे अंदाज :

  • पी सी आर ( PCR ) 1.24 आहे. 
  •  निफ्टी चा पी ई ( PE) 29.79 एवढा आहे. हा अजून थोडा खाली येणे गरजेचे आहे.पहिला अंदाज व्यक्त केला होता तेव्हा PE कीती हा खरेदी साठी योग्य आहे याची माहीती दिली आहे.
  • ऑप्शन चैन ओपन इंटरेस्ट (OI) चा विचार केला तर, या आठवड्यासाठी चा ओपन इंटरेस्ट 15400 च्या कॉल (CE) वर 2483250 एवढा आहे. तर 15500  च्या कॉल  (CE) वर 4403250 ओपन इंटरेस्ट आहे. 
  •  15000 PE वर 4588050 तर 14800 PE 3007050 एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • निफ्टीचा बंद भाव हा 15175.30 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद बंद भाव 15222 आहे म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम  46.7 पॉइंट एवढा आहे.
  •  अपसाईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भाव 15175.3 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 15250/85 हा आहे. हीच आपली पहिली लेवल आहे यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर आपली दुसरी लेवल 15350/70 ही येऊ शकते. यावर 1 तासाची किंवा 1 दिवसांचा कॅन्डल स्टिक बंद झाली तर 15430 हा सर्वोच्च स्तर निफ्टी प्राप्त करू शकते. आणि हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल. जर खुपच काही चांगली बातमी आली तर 15650 ते 15700 ही लेवल येऊ शकते परंतु ही शक्यता खूपच कमी आहे.
  • डाउन साईड लेवल : निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर तिचा पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15030/15000 हा असेल जोपर्यंत एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅन्डल स्टिक त्याच्याखाली बंद होत नाही, तोपर्यंत खालची लेवल येण्याची शक्यता कमी आहे. दुसरी लेवल 14800/775 ही असण्याची शक्यता आहे. नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 1470/400 पर्यंत जाऊ शकते. हीच या आठवड्यासाठी चे खालचेे टारगेट असू शकते.
  •  निफ्टीने पॉझिटिव ब्रे्कआउट दिलेला आहे त्यामुळे खालचेे टारगेट येण्याची शक्यता कमी आहे. परंतु जे डेटामध्येेे दिसतंय तेच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
  • NIFTY 50 @ 15175.30

    R1- 15250/85   R2 – 15360/380   R3- 15430 WT


    S1 – 15030       S2- 14800/775     S3- 14470/400 
– WT

बँक निफ्टी 24 ते 28 मे अंदाज:

  • बँक निफ्टी पीसीआर  1.11 आहे.
  • बँक निफ्टी चा पीई ( PE) 22.3 एवढा आहे.
  • बँक निफ्टी चा बंदभाव 34606.90 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 34850 एवढा आहे म्हणजेच प्रिमीयम 240.1 पॉईंट चा आहे.
  • ओपन इंटरेस्ट चा विचार करता या आठवड्यासाठी जोकी  मे महिन्याची एक्सपायरी आहे. 35000 CE कॉल वरती 1168525 तर 36000 कॉल वर 1062875. तर 34000 PE वर 853350 आणि 33500 PE वर 704050  ओपन इंटरेस्टआहे.
  • बँक निफ्टी अप साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 34606.90 पासुन वरती जायला सुरुवात केली तर पहिला रेजिस्टन्स 35250/300 ही लेवल असेल. यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 35700/775 ही दुसरी लेवल असेल आणि हे या आठवड्यासाठीचे वरचे टारगेट असेल. या वरती जर एक तासाची किंवा एक दिवसाची कॅण्डल स्टिक बंद झाली तर 36200/300 ही लेवल येण्याचीही शक्यता आहे परंतु ती कमी आहे.
  • बँक निफ्टी डाऊन साइड लेवल : बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  34606.9  खाली जायला सुरुवात केली, तर पहिला सपोर्ट  33900/800 या लेवल वरती आहे. जर या खाली एक तासाची कॅण्डल बंद झाली. तर दुसरी लेवल 33300/200 ही असेल . हे या वीक साठीचे टारगेट असेल आणि जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली, आणि एखादी वाईट बातमी आली तरच 32700 ही लेवल येण्याची शक्यता असेल परंतु याठिकाणी येण्याची शक्यता कमी आहे.

  • BANK NIFTY @ 34606.90

    R1- 35250/300       R2- 35700/775-WT     R3- 36250 


    S1-  33900/800      S2- 33300/200- WT   S3- 32700


वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे जर तुम्हाला कॅन्डल स्टिक विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्वीस 24 ते 28 मे अंदाज:

NIFTY financial services: @ 16339.85  
future @16430

R1 – 16500/25   R2- 16800/850 – WT       R3- 17000 
S1 – 16050/16000    S2- 15800       S3- 15450/400-WT 


महत्वाच्या बाबी: 
    वरती दिलेल्या सर्व या आठवड्यासाठीच्या त्याबरोबरच मे महिन्याच्या मंथली एक्सपायरी साठीच्या लेवल आहेत. या आठवड्यात निफ्टी पुन्हा आपला सर्वोच्च स्तर बनवण्याच्या तयारीत आहे. परंतु दोन्ही बाजूची ट्रेड ची संधी मिळण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे काम करावे रिझल्ट संपत आलेले आहेत. त्यामुळे पुढील फायनान्शियल ईयर साठी काही चांगले स्टॉक शोधून पोर्टफोलिओ बनवण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करूनच  वेल्थ तयार होऊ शकते. त्यामुळे ट्रेडिंग करतानाच गुंतवणुकीला ही प्राधान्य द्या.
     आठवड्याच्या मध्ये होणाारे बदल याविषयी आपण टेलिग्राम चैनल वर अपडेट करत असतो. तुम्ही तिथे भेट देऊ शकता किंवा फेसबुक वर आपल्या पेजला लाईक करू शकता. नवीन लोकांसाठी डिमॅट ची सर्व माहिती या अगोदरच्या लेखांमध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी तिथेे भेट दयावेे.
DISCLAIMER :  वरील सर्व एनालिसिस दिसणार्‍या डेटा वरून केलेले आहे मार्केटमध्ये चढ-उतार होऊ शकतात त्यामुळे खरेदी किंवा विक्री करताना तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.

1 thought on “STOCK MARKET LEVEL COMING WEEK 24 MAY 2021 | 24 मे 2021या आठवडयात स्टॉक मार्केट लेवल”

Leave a Comment