NIFTY AND BANKNIFTY 19 JULY WEEKLY OVERVIEW IN MARATHI

 

WEEKLY ANALYSIS  19 JULY TO 23 JULY  2021|19 जुलै ते 23 जुलै स्टॉक मार्केट अँनालिसिस|स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज 

PREDICTION 17 :-

12 जुलै  ते 16 जुलै स्टॉक मार्केटचा आढावा : 

     सतरावे विकली अनालिसिस सुरु करण्या अगोदर मागील आठवड्यातील सोळाव्या विकली एनालिसिस चा थोडक्यात आढावा घेऊ. मागील आठवड्यामध्ये मार्केट volatile  राहील हा आपला अंदाज तितकासा बरोबर आलेला नाही. परंतु निफ्टी तसेच बँक निफ्टी साठी दिलेल्या सपोर्ट आणि रेजिस्टंस साठीचे लेवल बरोबर आलेले आहेत. त्याबरोबरच रिलायन्स आणि एचडीएफसी बँक हे बुलिश राहणार हेही योग्य ठरले आहे. मार्केट सर्वोच्च स्तरावरती असताना वरच्या लेबल ह्या फक्त डेटा च्या आधारे काढाव्या लागतात, कारण त्याला ऐतिहासिक आधार नसतो. आपण त्याप्रमाणेच त्या लेवल दिलेल्या होत्या आणि त्या योग्य होत्या याचे समाधान आहे. निफ्टी फायनान्स सर्विस विषयी अजूनही खुप डेटा उपलब्ध होत नाही तरी उपलब्ध डेटा नुसार लेवल दिल्या जातात ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स इंडेक्स द्वारे रिस्पेक्ट केले जात आहेत. एकंदरच मागील आठवड्याचा अनालिसिस अगदी तंतोतंत बरोबर आले असे नाही परंतु सर्व लेवल बरोबर आलेल्या आहेत.
मार्केट मधे सुरवात करणारे  डिमॅट विषयी माहिती मराठी मधून याठिकाणी वाचू शकतात शकतात.
  इथे 👉 डिमॅट अकाउंट UPSTOX ओपन करू शकता.

मार्केट साठीचे नकारात्मक संकेत | MARKET NEGATIVE TRIGGERS 

  1. इंडिया वीक्स ( VIX) 11.7  एवढा आहे.  मार्केट मधे कधीही शार्प मुव्हमेंट येऊ शकते त्यासाठी तयार होण्याचे हे संकेत आहे.
  2. मार्केटचा पीई (PE) 28.23 एवढा आहे. अमेरिकन मार्केटचा PE 23 च्या आसपास आहे, त्यावरुन अंदाज लावू शकता.
  3. मुडीज रेटींग संस्थेने  2021/22 या वर्षांचा GDP ग्रोथ रेट कमी केला आहे, इतरही संस्था भारताचा वार्षिक वृद्धिदर कमी करू शकतात.
  4. भारतीय रुपया 74.61 आहे. तो सतत दबाव वाढवत आहे.
  5. crude oil $73.14 वर आले आहे, पाठीमागील आठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी असला तरीही चिंताजनक स्तरावरती आहे.
  6. टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो  जवळपास -1.60 % (nifty upside 0.48 % & down side -0.77%)तर बँक निफ्टी साठी जवळपास -1.02 % (upside 0.69 & down side -0.70 )एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो. यावरून एक गोष्ट लक्षात येते अतिशय कमी रेंज मध्ये मार्केट आलेले आहे. यानंतर मोठा स्पाईक येण्याची शक्यता आहे तो अप साईड  किंवा डाऊन साईड यापैकी कोणताही असू शकतो.
  7. Covid-19 चा धोका कमी होत असतानाच नवीन डेल्टा प्लस व्हेरीअंटचा वाढणाऱ्या प्रसारामुळे  चिंता पुन्हा वाढत आहेत. तसेच  लसीकरणाला हावेरी हंट किती प्रतिसाद देईल याविषयी अजून तरी काही शंका आहेत.नुकतेच WHO ने हा विषाणू 100 च्या वर  देशात पसरला असल्याचा जाहीर केलं आहे.
  8. FII ने जुलै मध्ये 6198 करोड  विक्रीचे आकडे  दर्शविले आहेत.

मार्केट साठीचे सकारात्मक संकेत |MARKET POSITIVE TRIGGERS 

  1. US bond yield 1.3 आहे. 1.66 ला जावुन पुन्हा 1.3 ते 1.35 च्या आसपास राहत आहे. हे मार्केट साठी फायदेशीर आहे.
  2. आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 1.03 एवढा आहे. तर जूलै महिन्याचा पीसीआर 1.29 एवढा आहे.
  3. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची  निर्यात ही ऐतिहासिक ९५ अब्ज डॉलर्सची  झालेली आहे. याचाच अर्थ आपली  आर्थिक परिस्थिती सावरत असल्याचे दिसून येत आहे.
  4.  Q1 चे रिझल्ट यायला सुरवात झाली आहे. आयटी (IT) सेक्टर मधील काही रिझल्ट आले आहेत. हे पण चांगले येण्याची शक्यता असेल.
  5. लसीकरणाने जवळपास 40 कोटींचा टप्पा पार केला आहे. परंतू लसीकरण वेग काही प्रमाणात कमी होत आहे.
  6.  कोरोना रुग्ण संख्या आता प्रतिदिन 40 हजाराच्या खाली आलेले आहे. त्याबरोबरच सर्व कामधंदे पुन्हा सर्व ताकतीने सुरू होण्याची तयारी करत आहे.
  7. केंद्र सरकारने लसीकरण हे जास्त होण्यासाठी पूर्णपणे मोफत सुरू केलेले आहे. शिवाय खाजगी मधे कमी किमती मधे लस उपलब्ध होत आहे.
  8. जीएसटी (GST) कलेक्शन जुन महिन्यात  92849 करोड झाले आहे.
  9. डॉलर इंडेक्स 92.72 आहे. 
  10. रिलायन्स बरोबरच hdfcbank या आठवडय़ात पून्हा बुलिश झालेले आहेत.
  11. DII ने जुलै मध्ये 5136 करोड  खरेदीचे आकडे  दर्शविले आहेत.
सर्व सकारात्मक तसेच नकारात्मक संकेत,  टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा  तसेच  बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केटची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

12 जुलै  ते 16 जुलै स्टॉक मार्केट ची दिशा काय असेल ? | WHAT IS STOCK MARKET DIRECTION ON 12-16 JULY ?

     गेल्या काही महिन्यांपासून 15900 ही लेवल पार करणे मार्केट साठी अवघड जात होते.परंतु या आठवड्यामध्ये मार्केट त्या लेवल वरती बंद होण्यास यशस्वी झाले आहे. हा एक पॉझिटिव्ह ब्रेक आऊट भेटलेला असतानाच या आठवड्यासाठीचा डेटा काहीतरी वेगळे चित्र उभे करत आहे. वरती नमूद केल्याप्रमाणे मार्केट एका छोट्या रेंजमध्ये अडकून पडलेले आहे. त्यातही अपसाईड खूपच कमी दिसत आहे, भरीस भर म्हणून इंडिया वीक्स अगदी 11ला येऊन ठेपला आहे. यानंतर मार्केट्मधे  एक शार्प मुव्हमेंट  येण्याची दाट शक्यता निर्माण झाले आहे.  जरी ती कोणत्याही बाजूला येऊ शकत असेल पण  सध्यातरी डाउन साईड येण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. या आठवड्यात मार्केटमधे कामकाजाचे फक्त चार दिवस आहेत. खाली निफ्टी आणि बँक निफ्टी साठी ज्या लेवल दिल्या आहेत,  त्यावरती लक्ष ठेवा परंतु जर सोमवारी निफ्टी 15923 च्या वरती बंद होऊ शकले, तरच वरची लेवल येण्याची शक्यता आहे. जर तसे झाले नाही तर डाऊन साईड लेवल साठी तयार रहावे. इंडिया विक्स वरती एक नजर नेहमी असायला हवी. ग्लोबल मार्केट कडून या आठवड्यात भारतीय मार्केटला जास्त साथ मिळण्याची अपेक्षा न केलेलीच बरी तरीही अमेरिकन मार्केट कडे लक्ष असू द्यावे.
                सर्व डेटा ऑप्शन चैन आणि टेक्निकल अनालिसिस नुसार या आठवड्यासाठी आपला अंदाज काहीसा मिळताजुळता आहे. सोमवारच्या बंद नंतर जास्त स्पष्ट पणे नमूद करता येईल.ते teligram chanel वर अपडेट केले जाईल तरीही…
कन्सोलिडेशन ते बेरिश | CONSOLIDATION TO SLIGHTLY BEARISH 

निफ्टी 19 ते 23 जुलै अंदाज |19-23 JULY NIFTY ANALYSIS 



  • निफ्टी 50 PE 26.31 आहे.
  • निफ्टीचा बंद भाव हा 15923 आहे तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव 15936 आहे, म्हणजेच फ्युचर चा प्रिमीयम 13 पॉइंट एवढा आहे.
  • वीकलि PCR 1.02 आणि मंथली PCR 1.29 असलेला आपणास दिसून येतो.
  • ऑपशन चैन चा विचार केला तर  या आठवडयात:            16000 च्या कॉल वरती 40 लाख, तर 16200 च्या कॉल वरती 32.7 लाख. त्याच बरोबर 15900 PE वर 34.4 लाख तर 15800 PE 30.5 लाख एवढा ओपन इन्टेरेस्ट आहे.         
  • मंथली सेरिजचा ऑप्शन डाटा वरती 16000 ce वर 29.7 लाख, तर 16500 ce वर 18.4 लाख. तसेच 15500 PE वर 29.2 लाख, 15000 PE वर 37 लाख एवढा ओपन इन्टेरेस्ट असलेला दिसून येतो.

निफ्टी अपसाईड लेवल |NIFTY UPSIDE LEVEL



                निफ्टीने तिच्या बंद भाव  15923 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 16025/50 हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे. आणि हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल  यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 16200 येउ शकते. यावर 1 दिवस निफ्टीने बंद दिले तर 16300 लेव्हल येऊ शकते परंतु हि शक्यता फारच कमी असेल. परंतु जे डेटा मधे आहेत आणि वरती गेले तर तयारी असावी म्हणुन या लेवल देत आहोत.


निफ्टी डाउन साईड लेवल | NIFTY DOWN SIDE LEVEL 



      निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 15850/30असेल. या खाली एक तासाची किंवा एक दिवसाचि कॅन्डल स्टिक बंद झाली तर 15770/50( जर या लेवलच्या खाली मार्केट sustain होत असेल तर निफ्टी पुढील काही दिवसांत 15050/14950 च्या लेव्हल कडे जाऊ शकते) हि लेवल येऊ शकते, हे या आठवड्याचे टार्गेट असू शकते. या खाली एक दिवस बंद झाले तर 15630/600 ही लेवल येऊ शकते.

शिवाय खूपच  नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 15500/450 हा स्तर पाहायला मिळु शकतात.


NIFTY 50 @ 15923

  R1-16025/50 – WT           R2 -16200      R3- 16300

   S1 –
15850/30    S2- 15750/20 WT    S3-15630/600
 


   
 

बँकनिफ्टी 19 ते 23 जुलै अंदाज| 19-23 JULY BANKNIFTY ANALYSIS


  • या आठवड्यात निफ्टी बँक upside ratio हा 0.69 आहे तर down side -0.70 असेल.
  • बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर 1.09 आहे. 
  • बँक निफ्टी चा पीई 24.64 ( PE)  आहे.
  • बँक निफ्टी चा बंदभाव 35752 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 35856 एवढा आहे  म्हणजेच  प्रिमीयम  104 पॉईंट चा आहे.
  • ऑप्शन डाटा चा विचार करता बँक निफ्टी च्या विकली सेरिज मधे 36000 CE वर 16.7 लाख, तर 36500 CE वर 10.8 लाख तसेच 35500 PE वर 14.5 लाख आणि 35000 PE वर 8.7 लाख एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
  • मंथली सीरीज़ मध्ये 36000 CE वर 6.8 लाख, तर 37000 CE वर  6.5 लाख आणि 35000 PE वर 4.4 लाख, तर 34000 PE वर 4.4 लाख एवढा ओपन इन्टेरेस्ट असलेला दिसून येतो.

बँक निफ्टी अप साइड लेवल |BANKNIFTY UPSIDE LEVEL 


           बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 35752 पासुन वरती जायला सुरुवात केली तर 36100/50 ही लेवल असेल. जे कि हे या आठवड्याचे टारगेट असेल यावरती 36100 वर जर बँक निफ्टी  sustain झाली तर निफ्टी बँक वर जाण्याची शक्यता असेल. (हि आपली पहिली लेवल असेल.) यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 36500/550 ही दुसरी लेवल असेल 1 दिवस बँक निफ्टी बंद झाली तर 3700 हि लेवल येऊ शकते.परंतु याची शक्यता खूपच कमी आहे.


बँक निफ्टी डाऊन साइड लेवल | BANKNIFTY DOWN SIDE LEVEL 


            बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून  35752 खाली जायला सुरुवात केली तर पहिला सपोर्ट  35450/400 ही लेवल असेल. जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली तर  34975/25 ही लेवल येण्याची शक्यत आहे, आणि हेच या वीकचे बँक निफ्टी साठी खालचे टार्गेट असेल मार्केटची सद्यस्थिती पाहता बँक निफ्टी 34400 या सपोर्ट लेवल पर्यंत येण्याची श्क्यता नाकारता येत नाही.

BANK NIFTY @ 35752

R1- 36100/50 WT    R2- 36450/500       R3- 37000 

S1- 35450/400       S2- 34975/25-WT   S3- 34400 


 वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे. जर तुम्हाला कॅन्डल स्टिक म्हणजे काय? हे जाणुन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.

निफ्टी फायनान्स सर्विस 19 जुलै ते 23 जुलै अंदाज:


NIFTY financial services: @ 16884

future @16955

R1 – 16970/17000 – WT    R2- 17100/50    R3- 17300 

S1 – 16775/50    S2- 16650/25 -WT     S3- 16450

Leave a Comment