WEEKLY ANALYSIS 16 AUGUST TO 20 AUGUST 2021|16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट स्टॉक मार्केट अँनालिसिस|स्टॉक मार्केट साप्ताहिक अंदाज
PREDICTION 18 :-
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्टॉक मार्केटचा आढावा :
हा आपण 18 वा अंदाज व्यक्त करत आहोत. या अगोदर व्यक्त केलेले सतरा अंदाजा पैकी सोळा अंदाज अगदी बरोबर आलेले आहेत. ते तुम्ही भेट देवुन पाहू शकता. गेले काही दिवस आपण या विकली सीरिजमध्ये ब्रेक घेतलेला होता त्याबद्दल दिलगिरी परंतु TELEGRAM CHANEL वर आपण वेळोवेळी माहिती देत होतो. मागील दोन आठवडे मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. परंतु त्याच बरोबर स्मॉल कॅप मध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाले आहे. हा विरोधाभास मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे बरेच पोर्टफोलिओ नफ्या मधून नुकसानीकडे गेलेले या दिवसात अनुभवास आले. या तेजी मध्ये ग्लोबल मार्केट मधील तेजीच्या आधारा बरोबरच ब्लू चिप आणि हेवीवेट स्टॉक यांचा खूप मोठा वाटा आहे. Q1 रिझल्ट लागल्यानंतर कन्सोलिडेशन चा ब्रेक आऊट होऊन मार्केटच्या तेजीला सुरुवात झाली. रिलायन्स पुन्हा एकदा बुलिश झालेला आहे. तसेच आयटी सेक्टर हे वरच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सर्वांच्या अनुषंगाने आपण येणाऱ्या आठवड्यात मार्केटमधील घडामोडींवर लक्ष देणार आहोत.
मार्केट मधे सुरवात करणारे डिमॅट विषयी माहिती मराठी मधून याठिकाणी वाचू शकतात शकतात.
इथे 👉 डिमॅट अकाउंट UPSTOX ओपन करू शकता.
मार्केट साठीचे नकारात्मक संकेत | MARKET NEGATIVE TRIGGERS
- इंडिया वीक्स ( VIX) 12.99 एवढा आहे.
- मार्केटचा पीई (PE) 26.51 एवढा आहे.
- आठवड्यासाठी पी सी आर ( PCR) 1.67 एवढा आहे. तर ऑगस्ट महिन्याचा पीसीआर 1.79 एवढा आहे. यातुन मार्केट ओवरबॉट असल्याचे संकेत मिळतात.
- मुडीज रेटींग संस्थेने 2021/22 या वर्षांचा GDP ग्रोथ रेट कमी केला आहे, इतरही संस्था भारताचा वार्षिक वृद्धिदर कमी करू शकतात.
- भारतीय रुपया 74.22 आहे. तो स्थिर होत आहे.
- crude oil $ 70.20 वर आले आहे, पाठीमागील आठवड्याच्या तुलनेत काहीसा कमी असला तरीही चिंताजनक स्तरावरती आहे.
- टेक्निकली पाहता निफ्टी साठी डाउन-अप रेशो जवळपास 1% (nifty upside 0.18 % & down side -0.18 %) तर बँक निफ्टी साठी जवळपास – 0.20 % (upside 2.30 % & down side -0.47 )एवढा आहे. हा रेशो ऑप्शन चैन वरून काढला जातो. यावरून एक गोष्ट लक्षात येते अतिशय कमी रेंज मध्ये मार्केट आलेले आहे. निफ्टी पेक्षा बँक निफ्टी जास्त वाढू शकते.
मार्केट साठीचे सकारात्मक संकेत |MARKET POSITIVE TRIGGERS
- US bond yield 1.34 आहे. 1.66 चा स्तर जावुन पुन्हा 1.3 ते 1.35 च्या आसपास राहत आहे.
- चालू आर्थिक वर्षाच्या जुलै मधे निर्यात ही 50% ने वाढ झालेली दिसत आहे
- Q1 चे रिझल्ट अनुमान प्रमाणे चांगले लागत आहेत याचा मार्केटला वाढण्यासाठी आधार मिळत आहे.
- लसीकरणाने भारतात वेग पकडलेला आहे, सरकारी बरोबरच खाजगी दवाखान्यात लस उपलब्ध झालेली आहे
- कोरोना रुग्ण संख्या आता प्रतिदिन 40 हजाराच्या आसपास आलेले आहे. त्याबरोबरच सर्व कामधंदे पुन्हा सुरू होत आहे.
- जीएसटी (GST) कलेक्शन जुलै महिन्यात 92849 करोड झाले आहे.
- डॉलर इंडेक्स 92.50 आहे.
- रिलायन्स आणि hdfcbank हे दोन निफ्टी मधील महत्त्वाचे स्टॉक या आठवडय़ात पून्हा बुलिश झालेले आहेत.
- FII आणि DII ने ऑगस्ट मध्ये अनुक्रमे 3400 आणि 1600 करोड खरेदीचे आकडे दर्शविले आहेत. यावरुन शार्प डाउन होण्याची शक्यता कमी होते.
सर्व सकारात्मक तसेच नकारात्मक संकेत, टेक्निकल अनालिसिस , काही टेक्निकल इंडिकेटर्स चा तसेच बनणाऱ्या काही चार्ट पॅटर्नचा अभ्यास करता या वीक साठी मार्केटची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहोत.
16 ऑगस्ट ते 20 जुलै स्टॉक मार्केट ची दिशा काय असेल ? | WHAT IS STOCK MARKET DIRECTION ON 16-20 AUGUST ?
मार्केटमध्ये टेक्निकली मोठी तेजी दिसत असली, तरी मार्केटचा पीसीआर हा OVERBOUGHT स्थिती दर्शवित आहे. सर्व ग्लोबल मार्केट हे तेजी मध्ये आहेत. त्याबरोबरच गेल्या दोन-तीन महिन्यातील कन्सोलिडेशनचा ब्रेक आऊट भारतीय मार्केटमध्येही पाहायला मिळाला आणि दोनच आठवड्यात सहाशे ते सातशे पॉईंट ची रॅली निफ्टी मध्ये दिसून आली. परंतु आता कधीही प्रॉफिट बुकिंग किंवा वेळेचे कन्सोलिडेशन होऊ शकते, यासाठी तयार राहायला हवे. या आठवड्यात चारच दिवस कामकाज आहे. यामध्ये निफ्टी पेक्षा बँक निफ्टी मध्ये तेजी जास्त दिसत आहे आणि निफ्टी एका रेंज मध्ये काम करण्याचे संकेत देत आहे. बँक निफ्टी ही निफ्टी ला खाली जाण्यापासून रोखण्यात थोडाफार हातभार लावेल. युरोपियन मार्केट तसेच अमेरिकन मार्केट हे सकारात्मक असल्यामुळे याचा काहीच फायदा भारतीय मार्केटला हे दिसू शकतो. परंतु सावधानता बाळगण्याचे लेवल वरती मार्केट सध्या उभे आहे.
सर्व डेटा ऑप्शन चैन आणि टेक्निकल अनालिसिस नुसार या आठवड्यासाठी आपला अंदाज काहीसा मिळताजुळता आहे. सोमवारच्या बंद नंतर जास्त स्पष्ट पणे नमूद करता येईल.ते teligram chanel वर अपडेट केले जाईल तरीही…
कन्सोलिडेशन ते बेरिश | CONSOLIDATION TO SLIGHTLY BEARISH
निफ्टी 16 ते 20 ऑगस्ट अंदाज |16-20 AUGUST NIFTY ANALYSIS
- निफ्टी 50 PE 26.31 आहे.
- निफ्टीचा बंद भाव हा 16529 आहे, तर निफ्टी फ्युचर चा बंद भाव 16518 आहे, म्हणजेच फ्युचर चा डिस्काउंट -11 पॉइंट एवढा आहे.
- वीकलि PCR 1.67 आणि मंथली PCR 1.79 असलेला आपणास दिसून येतो.
- ऑपशन चैन चा विचार केला तर या आठवडयात: 16500 च्या कॉल वरती 30.7 लाख, तर 16800 च्या कॉल वरती 38.5 लाख. त्याच बरोबर 16500 PE वर 41.1 लाख तर 16400 PE 60.6 लाख एवढा ओपन इन्टेरेस्ट आहे. 16300 PE वर 53.6 लाख .
- मंथली सेरिजचा ऑप्शन डाटा वरती 16500 ce वर 25.6 लाख, तर 17000 ce वर 15.7 लाख. तसेच 16500 PE वर 28.6 लाख, 16000 PE वर 35.6 लाख एवढा ओपन इन्टेरेस्ट असलेला दिसून येतो.
निफ्टी अपसाईड लेवल |NIFTY UPSIDE LEVEL
निफ्टीने तिच्या बंद भाव 16529 पासून वरच्या बाजूला जायला सुरुवात केल्यानंतर पहिला सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स 16600/20 हा आहे, हीच आपली पहिली लेवल आहे. आणि हेच या आठवड्यासाठी चे टारगेट असेल. यावरती जर एक तासाची किंवा एक दिवसाचे कॅण्डल बंद झाली तर दुसरी लेवल हि 16700 येउ शकते. यावर 1 दिवस निफ्टीने बंद दिले तर 16800 लेव्हल येऊ शकते. जे डेटा मधे आहेत आणि वरती गेले तर तयारी असावी म्हणुन या लेवल देत आहोत.
निफ्टी डाउन साईड लेवल | NIFTY DOWN SIDE LEVEL
निफ्टीने तिच्या बंद भावापासून खालच्या बाजूला जायला सुरुवात केली तर पहिलाच महत्त्वाचा सपोर्ट 16475 आहे पण हा ब्रेक होऊ शकतो. म्हणुन पहिली लेवल ही 16425/400 ही असेल. या खाली एक तासाची किंवा एक दिवसाचि कॅन्डल स्टिक बंद झाली तर 16330/300 हि लेवल येऊ शकते, हे या आठवड्याचे टार्गेट असू शकते. या खाली एक दिवस बंद झाले तर 16225 ही लेवल येऊ शकते.
शिवाय खूपच नकारात्मक बाब समोर आली तर निफ्टी 16050 हा स्तर पाहायला मिळु शकतात.
NIFTY 50 @ 16529
R1-16600/ 25- WT R2 -16700 R3- 16800
S1 –16425/400 S2- 16320/300 WT S3-16225
बँकनिफ्टी 16 ते 20 ऑगस्ट अंदाज| 16-20 AUGUST BANKNIFTY ANALYSIS
- या आठवड्यात निफ्टी बँक upside ratio हा 2.30 आहे तर down side -0.47 असेल.
- बँक निफ्टी या आठवडयात पीसीआर 0.97 आहे, तर मंथली 1.1 आहे.
- बँक निफ्टी चा पीई 24.64 ( PE) आहे.
- बँक निफ्टी चा बंदभाव 36169 तर बँक निफ्टी फ्युचर चा बंदभाव 36192 एवढा आहे. म्हणजेच प्रिमीयम 23 पॉईंट चा आहे.
- ऑप्शन डाटा चा विचार करता बँक निफ्टी च्या विकली सेरिज मधे 36000 CE वर 10 लाख, तर 36500 CE वर 9.3 लाख तसेच 36000 PE वर 13.7 लाख आणि 35500 PE वर 8.4 लाख एवढा ओपन इंटरेस्ट आहे.
- मंथली सीरीज़ मध्ये 36000 CE वर 6.2 लाख, तर 37000 CE वर 8.4 लाख आणि 36000 PE वर 4.6 लाख, तर 35000 PE वर 6 लाख एवढा ओपन इन्टेरेस्ट असलेला दिसून येतो.
बँक निफ्टी अप साइड लेवल |BANKNIFTY UPSIDE LEVEL
बँक निफ्टी ने तिच्या बंद भावापासून 36169 पासुन वरती जायला सुरुवात केली तर 36300/50 ही लेवल असेल. यावरती जर बँक निफ्टी sustain झाली तर निफ्टी बँक वर जाण्याची शक्यता असेल. (हि आपली पहिली लेवल असेल.) यावरती जर एक तासाची कॅण्डल बंद झाली तर 36600/50 ही दुसरी लेवल असेल. जे कि या आठवड्याचे टारगेट असेल. 1 दिवस बँक निफ्टी यावर बंद झाली तर 37000 हि लेवल येऊ शकते.परंतु याची शक्यता कमी आहे.
बँक निफ्टी डाऊन साइड लेवल | BANKNIFTY DOWN SIDE LEVEL
बँक निफ्टी ने तिच्या बंद भावा पासून 36169 खाली जायला सुरुवात केली तर पहिला सपोर्ट 35850/800 ही लेवल असेल. जर या खाली एक दिवसाची कॅण्डल बंद झाली तर 35450/400 ही लेवल येण्याची शक्यत आहे, आणि हेच या वीकचे बँक निफ्टी साठी खालचे टार्गेट असेल. मार्केटची सद्यस्थिती पाहता बँक निफ्टीचा 34600 ही सपोर्ट लेवल आहे, पण याठिकाणी येण्याची श्क्यता कमी आहे. काही बातमी आली तरच या लेवल चा विचार करावा
BANK NIFTY @ 36169
R1- 36300/50 R2- 36600/50 WT R3- 37000
S1- 35850/800 S2- 35450/25-WT S3- 35000
वरती खूप वेळा कॅन्डल स्टिक चा उल्लेख झालेला आहे. जर तुम्हाला कॅन्डल स्टिक म्हणजे काय? हे जाणुन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही कॅन्डल स्टिक भाग-1 आणि कॅन्डल स्टिक भाग-2 या ठिकाणी ती मिळवू शकता.
निफ्टी फायनान्स सर्विस 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट अंदाज:
NIFTY financial services: @ 17350
future @17369
R1 – 17450/75 R2- 17670/700 -WT R3- 17800
S1 – 17230/200 S2- 17125/100 -WT S3- 16950